Saturday, 12 August 2023

परमपूज्य नंदाईला जन्मदिवसाच्या शुभेच्छा- डाॅ प्रिया कर्णिक.




 दिपूनी टाकिती  नयने माझी 

तेज अलौकिक  तुझे असे

सात्विक,  सुंदर, दैवी  रूप  हे

साठवू मी डोळ्यात कसे?॥ 


कधी घेतसी  रूप सखीचे

कधी  भक्तमाता  होई

रूप तुझे प्रत्येक  पाहूनी 

हर्ष मनी  दाटुनी  येई॥ 


कोमल आणिक  कणखर  असती 

तुझ्या शक्तीची  दोन रूपे

प्रचिती  येई पदोपदी अन्

भानचि सकलांचे हरपे॥ 


आज शुभेच्छा जन्मदिनाच्या 

देते मी तुजला माते

वाहुनी मजला तव चरणांसी 

धन्य धन्य  गे मी  होते॥ 


-डाॅ प्रिया  कर्णिक.

No comments:

Post a Comment