*भक्ति बाभुळवनीची वाट l*
*खांचा खळगे अति बिकट l*
*एकपावली परी ती l*
*हरीनिकट नेई की ll16ll*
*कांटा टाळूनि टाका पाय l*
*हाचि एक सुलभ उपाय l*
*तरीच निजधाम पावाल निर्भय l* *निक्षूनि गुरुमाय वदे हे ll 17 ll*
*ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग.* हे परमात्म्य प्राप्तीचे चार मार्ग, त्यातील भक्तिमार्ग हा सर्वात सोपा मार्ग, म्हटला जातो. भक्ती प्रेमयुक्त विश्वासातुन प्रकटते. या मार्गात सगुण साकार अशा परमात्म्याच्या लिला पहावयास मिळतात.
सगुणाचे रुप समोर असते. त्याच्याशी बोलता येते. त्याचे शब्द कानी पडतात. जीवनात मार्गदर्शन मिळते. काय चूक काय बरोबर? कसे असावे कसे असु नये, याचे उदाहरणासहीत दाखले मिळतात. यामुळे जीवनात सहजता येते. जीवनात सहजता आली की आचरण धर्माधिष्ठीत रहाते.
सहजता म्हणजेच धर्माने केलेले आचरण. जिथे धर्म आहे तिथे तो आहेच. कारण धर्मासनावर फक्त तो एकच बसतो. *माझ्या देहातले हे धर्मासन म्हणजे माझे मन.*
या सगुण साकाराच्या दर्शनाने जीवनातील सर्व चिंता सहज हरतात. यात पतन भयही नाही. कारण करता करविता तो एकच हा भाव असतो. त्यामुळे मीपणाचा अहंभाव नाही. जिथे अहं भाव नाही तिथे " हं " आहे. *" हं "* हे हनुमंताचे बीज आहे *जे हनुमंत म्हणजे दास्यभक्तीचे मुर्तीमंत स्वरुप, भक्तीच्या वाटेवर अविरतपणे मार्गदर्शक. बोट धरुन चालवणारे* म्हणुन हा *हनुमंत मार्ग* आहे असे मला वाटते.
मग हेमाडपंत या सहज सोप्या मार्गाला *बाभुळ वनीची वाट* आणि यात *खाचा खळगेही बिकट* म्हणजे खुप कठीण असे म्हणतात म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी वेगळे असणार..........
बापू आपल्याला सांगतात *पावित्र्य* हेच प्रमाण ह्या तत्वाला पाळणारा प्रत्येक जण माझा आहे. *या तत्त्वाला न मानणारा दुरान्वयानेही माझा कोणी नाही.* याचाच अर्थ भक्तीमध्ये पावित्र्य हवे. सावधानता असावी. सावध रहावे नामस्मरणी......
*भक्ती मनाने केली जाते. पण तेच भरकटत असते म्हणजे सावध नसते.* पण याच मनामध्येच भावही प्रकटत असतो आणि भक्ती ही *भावगम्य* आहे.
भक्तीमध्ये *समबुद्धी* आवश्यक आहे. म्हणजे मिळाले किंवा न मिळाले ते माझ्या भल्यासाठीच हा दृढ विश्वास. नाही मिळाले म्हणुन कुठेही तर्क कुतर्क नसावेत.
विश्वासपुर्ण श्रद्धा असली की शंका-कुशंकांना जागाच नाही. *हेच भक्तीमार्गातील खांचा खळगे* असावेत असे वाटते. या सगळ्याना टाळुन पाय टाकायचा आहे. म्हणजेच सावध रहायचे आहे.
*एकपावली परी ती l*
*हरीनिकट नेई की-*
*निकट*नेते म्हणजे *माझ्यातले आणि माझ्या सदगुरुमधले अंतर कमी* करते.
*एक पावली* म्हणजे बापु म्हणतात ते पहिले एक पाउल, विश्वासाचे, श्रद्धेचे, सबुरीचे म्हणजेच *देवयान पंथस्य होण्याची इच्छा.* सदगुरु माउली बोट धरुन चालवते *पण माझे बोट त्याच्या हाती देणे म्हणजेच एक पाउल.* माझ्या या एका पावलातच ती हरीच्या निकट नेईल कारण बाकीची सदगुरु चालत येतात. तसेच *हे एकच पाउल ठाम निश्चयाचे आणि पुर्ण विचाराचेही प्रतिक आहे* असे मला वाटते. आपल्याला नेहमी असे वाटते की मला एक संधी मिळाली असती तर............. ? *तेच हे एक पाउल. मिळालेली संधी साधण्याचे.*
दुसरा अर्थ *एक पाउली वाट म्हणजे चिंचोळी वाट.* जिथे अन्य वाटा फुटत नाहीत. म्हणजे इथे एकदा पाउल टाकले की अन्य ठिकाणी भरकटत बसत नाही. *कारण वाट एकच आणि विचारही एकच. थेट त्याच्याकडे घेउन जाणारी.*
*इथे मनही स्थीर बद्धीही स्थीर त्यामुळे कृतीमध्ये गती आणि वेग आहे.* त्यामुळे हरि आणि मी यामधील आपोआप अंतर कमी होते. याचच अर्थ ही वाट मला हरिच्या निकट नेते आहे.
*कांटा टाळूनि टाका पाय l*
*हाचि एक सुलभ उपाय l*
*टाका पाय म्हणजे कृती करा.*
*कशी?* तर काटे टाळुन. मग हे काटे कोणते?
काटा म्हणजे *माझ्यातील अहंकार/अभक्ती / विभक्ती.* त्याला टाळुन म्हणजे त्याला बरोबर न घेता पाय टाका, कृती करा. *हा एकच सुलभ सोपा उपाय आहे. कारण यांना सोडल्याशिवाय तो अप्राप्त आहे.* दुसरा उपाय नाहीच.
*हरिकी बाट अति सांकरी l वहा दुजा न समाए ..........*
भक्ती मार्गाची वाट खुप चिंचोळी आहे इथे कोणीतरी एकच राहु शकतो. अहंकार रुपी " मी " असतो तेव्हा " तो " नसतो. म्हणुन त्या एकाला वाट मोकळी करणे हाच सुलभ उपाय.
जन्माला येउन जे साध्य करायचे आहे. ते असेच कराल आणि निजधाम पावाल. असे बाबा सांगतात.
*आपल्या प्रत्येकाचे निज धाम त्याचे चरण असले पाहीजे.* तिथे जाण्याचा हा सुलभ उपाय आहे तो अवलंबा. *हे निक्षुनि वदे गुरुमाय.*
*निक्षुनि वदे*- *प्रेमळ ताकीद देणे. जो माझा आहे त्यालाच आपण प्रेमाने पण निक्षुन सांगतो.* बाबा आपल्या प्रत्येकाचे आणि बाबांची *आपण लाडकी बाळे.* म्हणुनच बाबा निक्षुन सांगत आहेत. कारण *माझे जीवन सुधारण्याचा वसा बाबांनी घेतला आहे.* त्यासाठी त्यांचे अवतरण आहे.
*भक्तीमार्ग हा सोपा मार्ग आहे. कारण इथे इतर म्हणजे शारीरिक व बौद्धीक प्रयास नाही लागत. पण तेवढाच कठीणही कारण इथे मानसिक प्रयास लागतात. मन वळवणं कठीण असतं. कारण ते चंचल असतं. त्याला बुद्धीचा लगाम लावण्याचे प्रयास करावयाचे असतात. कारण मनच प्रारब्ध घडवते. पण या मनातच भक्तीचा आविष्कार घडतो. म्हणुनच संत सांगतात " मन करार रे समर्थ सर्व सिद्धीचे कारण."*
सद्गुरु मुखीचे ओव्यांमधिल हे बोल म्हणजे प्रेमळ आज्ञाच. त्याचे पालन करण्याची सदबुद्धी येवो हीच चण्डिकाकुला कडे प्रार्थना.
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ.
जै जगदंब जय दुर्गे.
अंबज्ञ स्वातीवीरा कुडव
...
"कर्म ज्ञान योग भक्ती |
या चौमार्गी ईश्वरप्राप्ती |
जरी हीं चार चौबाजूं निघती |
तरीही पोचविती निजठाया ||१५||"
♦परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे चार मार्ग आहेत.
♦ *१ कर्ममार्ग -* कर्ममार्गी चांगले कर्म करुन परमेश्वर प्राप्तीचे प्रयास करणारे
♦इथे मनुष्य कर्म केल्याचे कर्तृत्व स्वतःकडे घेेतो. तो, कर्म मी करतो म्हणुन होते, मी आहे म्हणुन झाले, मी चांगले कर्म करतो म्हणुन माझे चांगले होते. मी चा पाढा गात असतो. स्वतःचा उद्धार स्वत:च करावा. आपल्याला भक्तीची आवश्यकता नाही या विचारांनी युक्त.
♦हेमाडपंत सुरुवातीला कर्मवादीच होते. म्हणूनच शिरडीत पाउल टाकताच बाळासाहेब भाट्यांबरोबर वादावादी केली.
*बुडवुनि आपुली स्वतंत्रता l*
*ओढवून घ्याव्यी का परतंत्रता ll*
*जेथ निजकार्य कर्तव्यदक्षता l*
*काय आवश्यकता गुरुचिll*
*ज्याचे त्याने केले पाहिजे l*
*न करी त्यासी गुरुने काय कीजेll*
*उद्धरेदात्मनात्मानं l गर्जे स्वये स्मुतिवचन ll*
*ज्याचे त्यानेच करावे लागे l लागावे किमर्थ गुरूचे मागे ll*
♦ही सर्व विधाने हेमाडपंत कर्ममार्गी असताना सांगितली आहेत. यात भरलेला अहंकार सहज दिसुन येतो. नंतर हेच हेमाडपंत लिहितात-
*कर्म कदापि न ये त्यागता l*
*कर्म कर्तृत्त्वता ये त्यागू ll*
कर्म कर्तृत्ता त्यागणे म्हणजे हे कर्म मी केले असे न म्हणणे.
♦एक गुरू जीवनी उतरल्यावर हेमाडपंतांचा हा complete transformation. *in practical book we have learnt खोके कधी तुटुन पडेल?*
♦थोडक्यात कर्ममार्गावर राहून मनुष्य अहंकारी बनतो. तसेच हाच मनुष्य जेव्हा चांगले कर्म स्वत:व्यतिरिक्त समाजासाठी करतो तेव्हा समाज सुधारक म्हणुन नावारुपाला येतो. मग अहंकार जरी नसला तरी प्रसिद्धीचा हव्यास असतो. त्यामुळे सेवाभाव असल्यानें पापांचा क्षय होतो पण पुण्यप्राप्ती होत नाही. पण हेच कर्म ईश्वरार्पण जेव्हा करतो तेव्हा दोन्ही फायदे होतात. म्हणजेच भक्तीमार्गी. जसे बापु आपल्याकडुन भक्तिमय सेवा करुन घेतात. भक्ति पुण्याचा साठा वाढवते तर त्याबरोबर केलेली सेवा पापांचे भंजन करते.
♦ *ज्ञानमार्ग -* अनेक ग्रंथांचे पठण पारायण, षटशास्त्रांचा अभ्यास इत्यादी द्वारे केलेली परमेश्वर प्राप्तीचे प्रयास. सामान्य जनासाठी खूपच अवघड मार्ग. ह्या व्यक्ती निर्विकाराचे भजक असतात.
♦ *३ योगमार्ग-* हा मार्गही अत्यंत कठीण. यामध्ये मन बुद्धीच्या स्वाधीन असावे लागते. ते संकल्प विकल्प शून्य असावे लागते. परंतू मानवी मन मुळातच चंचल त्यामुळे ते फक्त मानवी प्रयासानी ताब्यात येणे खूपच कठीण. तसेच ते निर्विकार व चित्त एकाग्र करावे लागते. अनेक वर्षांची तपश्चर्या फळली की त्यांचे प्रयास सफल होताना दिसतात. सामान्य मानवास हे सारे अवघड असते.
♦ *४ भक्तीमार्ग -* म्हणुनच सर्वसामान्य मानवासाठी भक्तीमार्गच उचित आहे. कायावाचामने शरीर आणि वाणीसह पंचप्राणासह सदगुरुचरणी समर्पित व्हावे कारण तोच चराचरात संपूर्ण भरलेला आहे. पण त्याची कृपा प्राप्त होण्यासाठी अपार निष्ठा असावी लागतें तर्क- कुतर्क, शंका-कुशंका याच्या परे जाउन जो शरण जाईल अशा श्रद्धावंताला तो भेटतो. या करिता त्याची एकच प्रेमळ अट असते-
*एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरू ऐसा* l
♦प्रपंच करता करता परमार्थ सोपा करण्याकरिता एक खऱ्या सदगुरुची आवश्यकता असते. तो जेव्हा माझ्या जीवनी कार्यरत असतो तेव्हा मला प्रपंचात काही कमी पडु देत नाही. प्रयास फक्त करावे एका आज्ञापालनाचे.
♦ मग साईनाथ म्हणतात-
*कोणाचे देणे कोणास पुरते l*
*कितीही घ्या सदा अपुरते l*
*माझे सरकार जे देउ सरते l*
*कधी न सरते कल्पांती ll*
♦ अगदी असेच बापुंनी आपल्याला गुरूक्षेत्रमंत्र, श्रीस्वासम, गुह्यसुक्तम, श्रीस्वस्तिक्षेम संवाद हे जे चार स्तंभ दिले आहेत ते अनेक जन्मामध्ये आपल्या सोबत राहणार आहेत.
*(न सरते कल्पांती)*
अशा या माझ्या प्रेमळ लाडक्या सदगुरुना माझ्या प्रिय डॅड ना माझ्या सर्व पोस्ट समर्पित.
llसदगुरु श्रीअनिरुद्धार्पणमस्तु ll
अंबज्ञ स्वातीवीरा कुडव 🙏

No comments:
Post a Comment