विवेक वैराग्य आणि सात्विक अहंकार
Hari Om , here is a group discussion on this topic vivek, vairagya and satvik ahankar .
(Opinions of the different participants are their individual thoughts and opinions).
This is an attempt to understand this topic in reference to Sadguru Shree Aniruddha Bapu's teachings and Shree Sai Saccharit Granth.
[02/07, 5:48 pm] Saurabh Kulkarni: Vairagya he vivekpurna asel tar tyala ishwari adhishthan aste...tyamule te sarvmanya aste..anyatha te lok sahsa manya karayla tayar nastat mag ushwar te kuthun accept karnar..
Granthraj amhala spashtapane sangto ki aplya manatil vivek hach mahavishnucha ansh ahe jo apla palak ahe...
Tyamule tyala sodun kelela kuthlahi vichar, ukti kiva kruti hi nustich chukichi nahi tar dukhdayakach asnaar..karan vivekbuddhishivay ghetle janare kuthlehi nirnay achuk asat nahit..jar nirnayach chukle tar tya jivanachi kaay dasha hoil...arthatach dukh , atrupti,ashantata....
Tyamule vairagya he jari mahan asle tari vivekashivay te ayogyach ahe ,hanikarakach ahe...tya vyaktisathi ani samajasathi suddha.
Ambadnya naathsamvidh
[02/07, 6:22 pm] Sharadaveera Padwale: Vivek asalya shivay vairagyala mahatva nahi ase hemadpant mhanatat karan bairagya hati ale ani tyachya barobar vivek nasel tar tya vairagyachi mati hote. Vivek mhanaje dharm pavitryavar adhisthit asalela. Satya prem anand yanchi nirmiti karnarya sadvivek budhula vivek mhanatat.konalahi n ghabharata sadvivek budhine ghetalela achuk nirnay mhanaje vivek.sadguruni majhya budhi madhe peralele satya,prem,anand ani pavitryache bij mhanaje vivek.vivekach purusharthala janma dete.parantu bhav vivek adhipadun nasato .bhavvivek ha mahapranacha mahapradnyeshi jhalelya anusandhanavar avalambun asato. Kriyamanavar avalambun nasato tar to sadguruchya akaran karunyamule shradhavanachya manat bhavvivek utppan karato. Mhanunch shradhavan jevha sadguruchya darshanasathi yeto tevha sadguruchya ekach bhetine tyanchya drustikshyepane kinva tyanchya ekach sabdane shradhavan antar bahya badalun jato.jasa narad munichyabkarunya mule valya kolyacha bhav vivek jagrur jhala ani valyacha valmiki rushi houn tyanchya hatun ramayan ya sundar granrhachi nirmiti jhali. Shradhavan jevha sadguru shri anirudhachyavdarshanala yeto tevhabshri anirudhachya darshanane shradhavanachya ahankarrupi danavacha nash hoto ani shri anirudhachya akaran karunyane ,shradhavanacha bhav vivek jagrut houn to shradhavan anirudhachya charani sthir hoto. Vivekatunch khare vairagya yete. Vairagya he vivek mukt asayala have. Bhagave kapade ghalane,keshanchya jata vadhavane mhanaje vairagya che natak karane he vairagya navhe ,tar je vivekala dharun asate tech khare vairagya mhanajech satya,prem,anand ani pavitrya hya parmeshwari mulyanshi jo susangat ahe tech vairagya ani tyalach vivekyukt vairagya ase mganatat ani he vivekyukt vairagya sadguru krupashirvadanech prapt hote.vivek ani vairagyachi sangad ahe.ti bandhalyashivay pailtir gathane kathin ahe. Sharadaveera padwale 🙏
[02/07, 6:23 pm] Nandansinh Bhalvankar: .
नेवासकरांना आयुष्यातील शेवटचे तीन दिवस विवेकपूर्ण वैराग्य प्राप्त झाले होते. ते स्वपत्नीस सुद्धा *बाबा* म्हणू लागले.
तर नानासाहेब चांदोरकरांनी विवेकपूर्ण वैराग्य बाबांच्या सान्निध्यात आल्यापासून उपभोगले.
.
[02/07, 7:42 pm] Sonaliveera Bellubi:
हरी ओम.
*विवेक असल्याशिवाय वैराग्याला महत्व नाहीं असें हेमाडपंथ का म्हणतात?*
हरी ओम. श्रीसाई सदचरित या दाभोलकर कृत ग्रंथात अध्याय क्रमांक ३३ मध्ये या ओळींचा उल्लेख येतो.
पहिल्यांदा *विवेक* याचा अर्थ बघू:-
आपल्या मेंदूचा असा भाग जो निर्णयक्षम असतो. अर्थात सुशांतमन दुर्गादास.
एखादा निर्णय घेताना मला काय हवं याचा याचा विचार न करता काय करणे उचित होईल याचा सारासार विचार करणे अर्थात पूर्ण परमेश्वरी मार्गाने पुढे जाणे अर्थात पूर्ण विवेक ठेवणे.
कधी कधी असा प्रसंग ही येऊ शकतो की मला घरच्यांच्या किंवा सहकार्या विरोधात जाऊन विवेकपूर्ण निर्णय घ्यावे.
भावनांना प्रथम स्थान न देता उचित मार्गाने पुढे जाणे अर्थात पूर्ण विवेकाने वागणे होय.
आता *वैराग्य* चा अर्थ पाहू:-
पूर्वी साधू संत निष्काम पूर्ण वैराग्याने जीवन त्याच्या चरणी अर्पित असतं पण आपल्या सारख्या सामान्य माणसांना हे कसे काय शक्य होणार बरे?
श्रीसाई सदचरित ग्रंथात आपण असे अनेक भक्त पाहतो जे साई चरणी सेवेत रत असत. फक्त सेवेत नाही तर साई आज्ञापालन चोख करत असत.
मग बाबा जी आज्ञा करीत त्याचे किंतु परंतु न करता आज्ञापालन करीत असत.
बाबा बोलले खर पण घरी काय सांगू असे प्रश्न त्यांच्या मनात येत असतील पण ते कधीच आज्ञापालनात कसूर करीत नसतं.
का त्यांना आयुष्यात प्रॉब्लेम नसतील का? किंवा त्यावेळी दुसरेही काही काम असू शकेल पण नाही साईआज्ञा झाली की त्याच क्षणी पालन करायचे हेच त्यांनी प्रथम स्थानी ठेवलं होतं हे महत्वाचे. आणि हेच ते वैराग्य..!
आपण पाहतो श्रीसाई चे भक्त सर्व वेगवेगळ्या हुद्यावर काम करीत असत. कोणी मामलेदार असे, कोणी शिक्षक तर कोणी डॉक्टर पण साईपुढे सर्व सामान.
जे मिळेल ती सेवा करायला सर्व पुढे असायचे मग त्यात तू मी असा वाद नसायचा. फक्त साई चरणांची सेवा करणे व त्यातून आनंद मिळवणे हेच एकमेव ध्येय.
साई मुखीचा शब्द झेलणे व साई मुखावरील हसू अनुभवणे हेच प्रेम आणि साई चरणांवर डोके ठेवायला मिळणे हाच त्यांच्या साठी मेवा असायचा बस हेच वैराग्य. साई आज्ञा देऊन उदी द्यायचे डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायचे हीच आनंदप्राप्ती.
मला वाटत वैराग्य मिळवायला सर्व काही सोडायची गरज नाही फक्त त्याच्या सत्य प्रेम आनंदाची त्रिसूत्री पाळून स्व कर्तव्य करीत त्याची भक्ति व सेवा करायला मिळणारे भाग्य म्हणजे वैराग्य.
त्याची भक्ती सेवा करीत षड्रिपु वर शक्य तेवढा ताबा मिळवायचा प्रयास करत आयुष्यात पुढे जायला हवं.
काम क्रोधादी विकार आपल्याला सुखाने जगू देत नाही तर त्याच्यावर केलेले नितांत प्रेम आपलं जीवन सुखी, समाधानी व परिपूर्ण बनवितात.
त्याच्या चरणी शरण आल्यावर आपल्याला विवेकपूर्ण वैराग्याने जगण्याचा प्रयास करता येईल अस मला वाटतं.
।।पुष्प उमलले माझे वाहिले तुलाची
तुला तुझचं देऊनि भरून मीच राही।।
जस बापूने सुचवलं तस
अंबज्ञ नाथसंविध्🙏🏻श्रीराम
सोनालीवीरा
[03/07, 10:17 am] Mohiniveera Kurhekar: विवेक असल्याशिवाय वैराग्याला महत्व नाही.
सदगुरू शिष्याला त्याचे कुठे चुकते हे सांगून ती चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतात.व शिष्याचा विवेक जागृत करतात.
सुंदरकाण्ड ओवी 137
जदपि कही कपि अति हित बानी।
भगति बिबेक बिरति नय सानी।
हनुमंत रावणाला विवेक वैराग्याच्या गोष्टी सांगून त्याला तो कुठे चुकत आहे ते सांगतात .
सद्गुरु भक्तीत असल्यामुळे मिरीकरांचा विवेक जागृत झाल्यामुळे ते चुकत होते तरी त्यांच्या लक्षात येते की बाबा सांगत आहेत तर तेच उचित आहे.व ते उचित निर्णय घेतात.
सदगुरु नारद वाल्या कोळयाचा विवेक जागृत करतात.म्हणून तो उचित निर्णय घेऊ शकला.
विवेक -वैराग्याची जोड । तीच ही विभूती-दक्षिणेची सांगड । बाबा भक्तांना उदीतून वैराग्याचे व दक्षिणेतून त्यागाचे शिक्षण देत आहेत.
असे हेमाडपंत सांगतात.इथे
सदगुरुंच्या चरणी स्वतःला अर्पण केल्याशिवाय मायारुपी भवसागर पार करणे अशक्य आहे.हा अर्थ असावा
असे मला वाटते.
हे भक्त करु शकत नाही. सदगुरुंनी पदरी घेतल्यावर तो सदगुरुच हळू हळू भक्ताची तयारी करुन घेत असतो.त्रिपुरारी त्रिविक्रमच हे करतो.
त्रिपुरारी त्रिविक्रम म्हणजे हरि हर
सद्गुरु तत्व.
हरि -महाविष्णू हर-शिवशंकर
महाविष्णू =विवेक शिवशंकर =वैराग्य
उदीचा आदराने म्हणजे भावाने वापर करता करता उदीचा प्रभाव परमात्म्याचा आहे हे कळू लागते.व त्या भक्ताकडून निष्काम कर्मै घडू लागतात.त्याच्याकडून उचित तेच घडते.मग भोळा शिवशंकर उचित गोष्टींनाच तथास्तु म्हणतो. त्यामुळे त्या भक्ताचा विवेक बळकट होऊ लागतो. त्यामुळे वैराग्य येऊ लागते.वैराग्य आल्यामुळे विवेक अधिक अधिक बळकट होतो.विवेक-वैराग्याची जोड अशी असावी.व साईबाबांचे बनता बनता बनेल हा बोध असा असावा असे माझ्या अल्प बुद्धीला वाटते.
चूकीचे असल्यास क्षमस्व. श्री.सा.स.च. निरुपणातून मला जे समजले ते लिहायचा प्रयास केला आहे.
[03/07, 12:04 pm] Saurabh Kulkarni:
Kahi assumptions chukiche aslyane lok ghabartat....
Konihi post lihili ki khali क्षमस्व. Lihitat...
Itki parayane fukat geli mhanaychi...manatil bhiti kahi jaat nahi...
Lok kaay mhantil,mazi badnami kartil...etc...
Kashasathi kshama magta ani konala kshama magta ugich...
Amhi kon konala kshama karnare...
Hi payri swatachi swatalach cross karaychi aste...
Asa maza mat ahe
Ambadnya naathsamvidh
[03/07, 1:55 pm] Sharadaveera Padwale: Jevha majhyatil sarv udrripu nahise hotil te khare vairgya. Ani varagya yenya sathi vivekachi sangad havi ani he phakt sadguruch karu shakatat.sadguru apalyatil mipana ahankar jalun takun amhala vivekpurn jivan detat.
[03/07, 4:26 pm] Medha Patwardhan Kharghar Upasana. Kharghar: सात्त्विक अहंकार चे उदाहरण ऋषी मुनींच्या कृती तून समजून घेता येईल.आपल्याकडे असलेल्या शापवाणी चा दुरुपयोग. करणं हा सात्त्विक अहंकार चाच. प्रकार. अर्थात ज्यांनी क्रोधावर विजय मिळवला ते अशी कृती करत नाही. मला जे वाटले ते लिहिले चूक भूल क्षमस्व.
[03/07, 4:29 pm] Dr Nishikant Vibhute
: सात्विक अहंकार म्हणजे चांगले कार्य करणे । आणि " मी खूप चांगले कार्य करतो "
म्हणून इतरांनी माझी वाहवा करावी
इतरांनी मला हवा तसा आदर दिलाच पाहिजे
नाहीतर मला राग येतो ।
[03/07, 4:31 pm] Saurabh Kulkarni: Modern technological satvik ahankar mhanje. Mi ekhadi post fb kiva whatsappla keli ki tyala kiti likes milale te baghne...
Na milalyas tya vyakticha manat raag dharne...ase hou shakte ka😃
[03/07, 4:44 pm] Sharadaveera Padwale: Je kam vivekala dharun asate ,satya prem anand ya trisutritiche palan karun kelele asate.tasech majha sadguru phakt majha ahe ani tyache adnya palan mi karinch ha ahankar balagane ,mhanaje satvik.sat+vivek=satvik je satya ani vivekala dharun rahato to satviknahankar.
[03/07, 10:03 pm] Mohiniveera Kurhekar: Dadni ahankarache 5 prakar sangitle ahet.
अशुद्ध, तामस, राजस,सात्विक, शुद्ध
शुद्ध अहंकार-मी भक्त हा भाव उरत नाही.देवाचा मी हा भाव उरतो. तुलसीपत्र --381.
[04/07, 12:03 am] Saurabh Kulkarni: इथे अजून एक लिहावस वाटत|
आपण जरी आतून निर्मळ असलो किवा शुद्ध असलो तरीही बाहेर व्यवहारामध्ये वावरताना आपला आवश्यक तेवढाच भाग बाहेर दाखवला जातो|
सर्व भाग ओपन केला जात नाही|
कधीकधी तर आपण जसे नसतो तसे सुद्धा वागून जातो|
आपल्यावर नको ते आरोप होतात|
हा खर तर आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा मार्ग असतो|आणि बाकी लोकांसाठी तो एक चक्रव्यूह असतो|
जसे चंद्राची ठराविक दिवशी ठराविक कला आपल्याला दिसते|संपूर्ण चंद्र फक्त पौर्णिमेलाच दिसतो|
अगदी तशाच प्रकारे आपल्या कला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या असू शकतात|
त्यामुळे आपण जसे वागतो तसेच आपण आहोत हे आवश्यक नाही|
म्हणून बापू सारख सांगतात ना बिनधास्त रहा |
विठ्ठल आपल्या कल्पनेच्या बाहेर लबाड आहे😊
[04/07, 12:25 am] Mohiniveera Kurhekar: परमात्म्याचे सामीप्य मिळविण्यासाठी प्रत्येक इच्छुकास आपला अशुद्ध अहंकार नामस्मरणाने दूर करुन ,नंतर तामस अहंकार गुणसंकीर्तनाने दूर करुन ,राजस अहंकार निष्काम भक्तीने दूर करुन मग उरलेला सात्विक अहंकार महाशेषाचा 'परमात्म्यास काय हवे ?हा भाव स्वीकारुन दूर करावा लागतो.
जोपर्यंत हा शेषभाव स्थिर होत नाही तोपर्यंत मनुष्य सात्विक अहंकार असलेला सज्जन सत्पुरुष बनतो,सिद्धही बनतो ,परंतु कृष्णाचा
सवंगडी गोप मात्र बनु शकत नाही.
तुलसीपत्र --३८१
[04/07, 12:40 am] Pallaviveera taishete: हेमाडपंत श्रीसाईसत्चरित्रामध्ये पदोपदी सांगतात, की हे चरित्र मी लिहिले नाही आहे, तर साईनाथ ह्याचे कर्ता आहेत. इथे हेमाडपंतांचा विवेक जागृत आहे. जसे की आपण पेपर लिहितो पंचशीलचा, व मार्क मिळाल्यावर वाचतो तेव्हा जर
1. वा काय छान लिहिला आहे मी- असे विचार आले तर तो सात्विक अहंकार ठरेल.
2. हे मी लिहिले आहे ! असे आश्चार्य व्यक्त होत असेल तर सर्व कर्म सद्गुरुचरणी अर्पण झालेले असेल, कर्ता प्रभू श्रीराम झालेले असतील व हे तेव्हाच घडेल जेव्हा विवेक जागृत असेल.
नानासाहेब चांदोरकरन्च्या कथेत, त्यांचा विवेक जागृत होता म्हणूनच मातीची उदी झाली नाहीतर सर्व मातेरं झाले असते.
साईनाथ सर्वठायी आहेत हा दृढ विश्वासच मातीची उदी करतो.
नाहीतर मानसरोवरी जायला निघालेल्या सन्यशासारखी अवस्था होते.
1. सन्यास घेतला तर मग *मानसरोवरी* डुंबण्याची इच्छा कशी?
2. सन्यास घेतल्यावर आईला भेटण्याची इच्छा कशी?
माझ्याकडे जे काही आहे ते मला माझ्या भगवंताने दिले आहे हे *भगवत् भान* म्हणजेच विवेक असे मला वाटते. माझे कल्याण करण्याचा निश्चय तर माझ्या भगवंतांनी केला आहे माझ्यासाठी, मग चिंता कसली?
तेलियाची भिंत पडणे, म्हणजेच सात्विक अहंकार ही गळून पडणे.
आसक्ती आली की अहंकार आलाच. त्यापेक्षा, 'तेन त्याक्तेन् भुन्जिथा:' म्हणजेच सात्विक अहंकार त्यागून संपुर्ण आनंदाचा उपभोग घे, जसा हेमाडपंत आदिंनी घेतला.
हेमाडपंतांनी बाबांनी त्यांना दिलेले श्रीसाईसत् चरित्र लिहिण्याचे कर्म केले. त्याच्या फलाशेला चिकटले नाहीत. म्हणूनच ते शुध्द स्वधर्म ठरले.
*मला असे वाटते, सात्विक अहंकार दुसर्याचे नुकसान करत नाही तर माझेच नुकसान करते. माजीच प्रगती रोखते*
सुंदरकाण्डात हनुमंत आधी हे म्हणतात,
*सो सब तव प्रताप रघुराई*
*नाथ न कछु मोरी प्रभुताई*
आणि मग ही ओवी येते,
*प्रभू की कृपा भयहू सबु काजु*
*जन्म हमार सुफल भा आजु*
आधी credit भगवंताला दिले आणि म्हणूनच जीवन सफल झाले.
*उडू रे लावुनिया पंखू* - सात्विक अहंकार
*पिपला पिस ना उरले*- तो ही गळून पडला
आणि मग,
*सुखाचा जाहला अतिरेकु*
|| हरि ॐ|| || श्रीराम || अंबज्ञ ||
- पल्लवीवीरा तायशेटे
[04/07, 12:42 am] Rohitsinh Pimpale AK: बापू वाक्य अर्थात गुरु वाक्य apt असतातच.. म्हणजेच सात्विक अहंकारी माणूस.. सज्जन.. सिद्ध.. बनतो. यालाच असं घेतलं की सिद्ध पुरुष सज्जन मनुष्य यात सात्विक अहंकार असतो.. आणि त्या पुढे बापू म्हणतात तसं गोप गोपी हे कुठलाच अहंकार बाळगत नाहीत अर्थातच अहंकार विरहित अवस्था म्हणजे गोप.. नवविधा निर्धार सांगतो तसं जो रामाचा वानर तोच कृष्णाचा गोप अर्थात निरंतर सामीप्य.. गोकुळाचा रहिवासी... कुठलाही अहंकार आहे अर्थात पूर्ण शुद्ध "हं "कार नाही.. हम बीज हनुमंत याचं... पूर्ण परमात्मा विश्वास प्रतीक.. आणि तोच वानरयुथ मुख्यम अर्थातच आद्य वानर आहे.. लीडर.. त्याच्या कडे अहंकार नाही म्हणून त्याचे उदगार सुंदरकांडात येतात.. सो सब तव प्रताप रघुराई.. नाथ न कछु मोरी प्रभुताई ll.. अहंकार विरहित असलेला मूर्तिमंत हंकार.. हनुमंत.. म्हणून राम त्यास म्हणतो मला तूझ्या ऋणात राहणं आवडेल... निरंतर अंबज्ञ रोहितसिंह पिंपळे शिवाजीनगर पुणे
[04/07, 3:56 pm] Dr Nishikant Vibhute: वैराग्य = वित राग
इथे राग म्हणजे anger क्रोध नसून , मानवी मनाचे भाव राग-रंग ।
अनुराग । ममता , मोह , क्रोध , मत्सर , लोभ , इत्यादी मनाचे भाव हे राग ( संगीतातील राग असतात तसे) .
ह्या रागांच्या पलीकडे , वित राग = रागांच्या पलीकडे , त्यांना पार केल्यावर पुढे एक राग आहे त्याला आपण भक्ती म्हणतो ।
त्या रागामध्ये मध्ये माणूस डुबत जातो तसा इतर रागांच्या पासून आपोआप दूर होत जातो ।
( लोभाचे ब्राह्मज्ञानाशी असणारे वैर) .
भक्ती वैराग्य निर्माण करते ज्याला विवेकाचे अधिष्ठान आपोआप असतेच ।
मद्रासी रामविजय वर वर संन्यासी आहे पण आणखी त्याची मोह ममता बाकी होती । म्हणून तो अस्वस्थ होता ।
बापू म्हणाले
मी लहान आहे की मोठा, श्रीमंत आहे की गरीब विसरून परमात्म्याच्या समोर
मी तुझा आणि तू माझा ह्या अनन्य भावाने उभा राहतो
त्यालाच "उभा क्षणभर "
असे म्हणतात ।
ह्यातूनच वैराग्य निर्माण होते आणि ह्यातूनच अहंकार विलीन होतो ।
म्हणूनच बापू म्हणतात "सर्वोच्च पवित्र कर्म हे श्रद्धा आहे - भक्ती आहे "
हरी ओम श्री राम अंबज्ञ ।
No comments:
Post a Comment