Wednesday 29 March 2017

OM KRUPASINDHU SHREE SAINATHAY NAMAH 2 ; ॐ कृपासिन्धु श्री साईनाथाय नमः

हरिः ॐ 🙏

बाबांच्या कृपासागराची उदाहरणं द्यावीत तेवढी थोडीच! प्रापंचिक गोष्टींपासून ते अध्यात्मिक उन्नतीपर्यंत सारंकाही बाबांनी भक्तांना दिलं.

चांदपाटलाची हरवलेली *घोडी* त्यांनी शोधून दिली. निमोणकर बाईंची बेलापूरला राहण्याची *इच्छा* पूर्ण केली. *रोग* तर किती बरे केले त्याला मोजणीचा नाही.  खापर्डेच्या मुलाचा प्लेग, बाळा शिंप्याचा हिमज्वर , बुट्टींची महामारी, भीमाजींचा कफक्षय, चांदोरकरांच्या मुलीची अडलेली प्रसूती ..... उदीचे अनाकानेक चमत्कार.

मिरीकर, बुट्टीचे *सर्पदंशनिवारण* केले आणि माधवरावांचे अहिदंश निवारणंही !

दामुअण्णांना व्यापारातील *सल्लाही* बाबांनी दिला आणि राधाबाईंना गोड *परमार्थाचा उपदेशही*.

प्रापंचिक गोष्टींच्या पुढे जाऊन बाबानी डॉक्टरांना, मद्रासी बाईला *रामरूपदर्शन* दिले. हेमाडपंतांना *अनुग्रह* दिला. दासगणूंची *उपनिषदाबद्दलची शंका* निवारली आणि त्यांना बसल्या स्थळी प्रयाग यात्राही घडवली. पाटणकरांना *नवविधा भक्तीची शिकवण* दिली. पितळेंची सद्गुरू *भक्तीची विस्मृती* दूर केली तर आंबडेकरांना आत्महत्येच्या *पापापासून परावृतकेले.

शाम्याला बळेबळे *विष्णू सहस्रनामाची शिकवण* दिली तर खापर्डे बाईंना 'राजाराम' *मंत्र* दिला.

ह्यातून मी असं शिकते की सिंधुतून कोणी मासे पकडतो, कोणी मीठ काढतो तर कोणी मोती. आणि क्वचित एखादा सागराकडून 'अनंत' म्हणजे काय हे शिकतो. बापूंकडे येताना मी कोणती झोळी घेऊन येते , मी प्रापंचिक गोष्टी तर मागतेच पण त्यापलीकडे मी काय मागायला हवं , काय अनुभवायला हवं हे मला *'कृपासिंधू'* या शब्दातून कळतं.

कारण बाबांनी सांगितलं आहे

*माझा भांडार भरपूर आहे*
*देईन जो जे जे चाहे*
*परी ग्राहकाची शक्ती पाहे*
*देतो मी साहे तेच की*

हरिः ॐ श्रीराम अंबज्ञ

डॉ. माधुरीवीरा ठाकुर

No comments:

Post a Comment