Friday 20 November 2020

ADHYAY 35 BALA NEVASKAR VARSH SHRADDHA AND UDI KATHA (Group Discussion )

 [08/10, 11:12 am] Dr Nishikant  Vibhute: #SSCD ADHYAY  35 

बाळा नेवासकर यांच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी , त्यांच्या पत्नीने जेवणाचे भांडे उदी टाकल्यानंतर "झाकून ठेव" असे का सांगितले ? 

स्वतः चे मनोगत व्यक्त करा ।

[08/10, 10:33 pm] Medhaveera Patwardhan 


1) ऊदीचा उपयोग इथे  साईबाबांचा  प्रसादरुपी आशिर्वाद  म्हणून श्रध्देने वापर करून घेतला आहे. एकदा पदार्थ ऊदीने  व्यापून ठेवला की त्यात कमतरता रहाणार नाही अशी खात्री आहे.प्रसादाचा एक कणही भूक भागवण्यासाठी  पुरेसा आहे.इथे श्रीकृष्ण द्रोपदी व तुळशी पान  कथेची आठवण येते. 

2)ऊदीचा उपयोग वाढतांना  आदरपूर्वक न सांडता करावा हा उद्देश होता.

3) साईबाबांचा प्रसादरुपी आशिर्वाद सर्व जणांना प्राप्त व्हावा म्हणून  थोडासा  भांड्यात  काढून वाढत राहिला की  पुरवणारा.तो साई समर्थ आहे ही भावना तितकीच महत्त्वाची आहे.

[08/10, 10:53 pm] Medha Patwardhan Kharghar Upasana. Kharghar: 4) इथे व

नेवासकरांच्या पत्नीला विश्र्वास होता की बाबा आपल्या  भक्ताघरी काही कमी पडू देणार नाही.   साईंची उदी हे  साईंचे तिथे असणं  आहे.

[09/10, 9:29 am] Sharadaveera Padwale: बाळा  नेवासकर यांच्या  वर्ष  प्रसिद्धीच्या दिवशी  त्यांच्या  पत्नीने  जेवणाचे भांडे उरी टाकल्या नंतर झाकून ठेव असे सांगितले  कारण त्यांना  माहीत  होते की बाबांची उदी ही संजीवनी  आहे, जी कोणताही  संकट असो की अन्न यावर काम करणारच. आणि त्यांचा बाबांना असलेला  ठाम  विश्वास. त्या उद्देशाने सर्वांना काही कमी  न पडता  उदी मुळे  आशीर्वादच मिळेल.आणि  हे अन्न बाबांच्या  घरचे आणि  त्यांच्या  आशीर्वादानेच  बनलेले  आहे तिथे  बाबा  प्रत्यक्ष  उदी रूपाने  हजर असल्या मुळे  कुठलीच  कमतरता  जाणवणार नाही. हा त्यांचा बाबांना असलेला ठाम विश्वास आणि  द्दढ श्रध्दा.

[09/10, 11:29 am] Dr Nutanveera Bhuyan: झाकून ठेव

ह्याचा अर्थ नेवासकरांच्या पत्नीचा पूर्ण विश्वास होता की बाबा अन्न कमी पडू देणार नाहीत परंतु तिला ही घटना बाबांचा चमत्कार म्हणून प्रसृत व्हावी अशी इच्छा नव्हती कारण बाबा कधीच चमत्कार करीत नसत पण भक्तांच्या कल्याणाचा सत्यसंकल्प धरलेल्या बाबांची उदी,बाबांचा शब्द विलक्षण काम करीत.

बापू ही नेहमी सांगतात की चमत्कार घडवायचाच असेल तर मनात घडवा.

[09/10, 3:45 pm] Mohiniveera Kurhekar: 🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄


नानासाहेब चांदोरकरांनी बाबांचे नामस्मरण करुन  पूर्ण श्रद्धेने व विश्वासाने स्वपत्नीच्या माथीं लावलेल्या मातीने उदीचे काम केले.कारण तिथे नानांकडे 

उदी संपली होती.म्हणून साईसंकल्पाने त्या मातीची उदी झाली#.


*जेथे भक्तीपूर्ण श्रद्धा व प्रेम।*

*तेथे तेथे कर्ता मी त्रिविक्रम।*


इथे नेवासकरांच्या पत्नीनेही तेच केले.

पूर्ण श्रद्धा,प्रेम व भक्तीने साईंचे

नामस्मरण करुन अन्नपात्रांत उदी घातली.त्यामुळे त्या उदीने येथे

अन्नाचे काम केले.साईसंकल्पाने त्या मुठभर उदीचे श्राद्धाचे जेवण बनत होते.हे कोणी पाहू नये म्हणून नेवासकरांच्या पत्नीने सुनेला अन्नपात्रे

झाकून ठेवायला सांगितले.


*एक विश्वास असावा पुरता।*

*कर्ता हर्ता गुरु ऐसा।*


उदीने अन्नाची कमतरता भरुन काढली.हे कशामुळे घडले?


१)नेवासकरांच्या पूर्णसमर्पित

भक्तीमुळे,#


२)बाबांच्या लाभेवीण प्रेमामुळे,#


३)नेवासकरांच्या पत्नीचा बाबा आमच्याबरोबर आहेत ह्या बाबांवरच्या

विश्वासामुळे,#


४)साईनामामध्ये असणा-या शक्तीमुळे,#


उदीचे अन्न बनण्याची ही अद्भुत लीला 

म्हणजे साईनाथांची अपूर्व करणी.

परमात्म्याची कथनी व करणी प्रत्येक भक्ताच्या उचित गरजेनुसार असते. 



Mohiniveera Kurhekar

Andheri west .Mumbai.

No comments:

Post a Comment