Friday 20 November 2020

ADHYAY 33 , NANASAHEB CHANDORKAR SADGUN (Mohiniveera Kurhekar)

 अ.३३ मध्ये नानासाहेब चांदोरकर यांचे कोणते गुणधर्म आपणास दिसुन येतात.

१)वैराग्य :साईबाबांनी त्यांच्याकडून द्वारकामाईचा जीर्णोध्दार करवून घेतला.ते वैराग्याच्या पूर्णावस्थेत होते.

२) परोपकारी: दुस-याच्या दु:खाने ते व्यथित होत.त्यामुळे गरजू व पीडितांना ते मदत  करत.

३)पावित्र्य: सत्य प्रेम व आनंद त्यांच्या आचरणांतून दिसून येते.

४)विवेक: साईभक्तीमुळे त्यांचा विवेक

जागृत होता.त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याआधी माझ्या बाबांना माझे कसे वागणे आवडेल ह्याचा सर्व बाजूंनी विचार करुन ते निर्णय घेत.              ५)समाजोद्धाराची कळकळ: प्रत्येकाला साईचरणी आणून ठेवण्याची उत्कटता होती.

६)श्रद्धा: माझा साई शरणागतवत्सल आहे.संकट कितीही मोठे असले तरी माझा साई त्या संकटापेक्षा अनेक पटीने मोठा आहे.

७)विश्वास: माझा साईच फक्त भक्ताला संकटातून बाहेर काढू शकतो.हा ठाम व अढळ विश्वास त्यांच्याकडे होता.My sadguru will

Take my care  हा विश्वास असल्यामुळे त्यांच्याकडे सबूरी होती.

८)सबूरी: जामनेरला मुलगी प्रसूती च्या वेळी अडली होती.त्यांच्याकडे उदी संपली होती, दुस-यांना उदी वाटल्यामुळे.तरी त्यांना ठाम विश्वास होता की बाबा माझ्या हाकेला धावून येणार.त्यामुळे शांतपणे नामस्मरण करीत वाट पहात होते.

९) स्पष्टवक्तेपणा व प्रांजळपणा:

नानासाहेबांनी कधीही बाबांपासून काहीही लपवले नाही.जे घडले ते व जसे आहे तसे सांगितले.(कांट्याची कथा व बनता बनता बनेल कथा.)

१०)अनसूया: त्यांनी इतर भक्तांबरोबर स्वत:ची तुलना केली नाही.व मी बाबांकडे पाठविलेला भक्त माझ्यापुढे गेला म्हणून असूया नव्हती.

११)निस्पृहता: ते प्रांताधिकारी होते.कीर्ती,

संपत्ती, प्रत,सत्ता सर्वकाही असूनही 

त्यांनी त्या गोष्टीचा दबाव कोणावरही टाकला नाही.स्वत:च्या कोणत्याही गोष्टीचा गैरवापर केला नाही.त्यांनी कित्येकांना बाबांकडे आणले.बाबांचे पाय धरा,तुमचे संकट दूर होईल असे सांगितले .पण त्यात स्वत:चा मोठेपणा व्हावा अशी इच्छा मुळीच नव्हती.अहंकार बिल्कुल नव्हता.

१२)सन्मुखता: ते साईनाथांना सन्मुख होते.अनुसंधान असल्यामुळे त्यांचे आचरण नीतिमर्यादापूर्ण व सुसंस्कृत 

होते.

१३)शारण्य: त्यांनी स्वत:चे अवघे 

जीवनच साईंच्या चरणी अर्पण केले होते.त्यामुळे ते अखंड साईमहिमा गात असत.व इतरांनाही साईभक्तीत

आणत असत.

१४) गुणसंकीर्तन करणे:त्यांना मिळालेला आनंद इतरांना वाटत असत.बाबांना त्याची गरज नाही 

पण बाबांच्या लीलेत मला सहभागी होण्याचे भाग्य लाभत आहे ,मी केवळ निमित्तमात्र आहे ,कर्ता साईनाथच आहेत ह्याची  त्यांना जाणीव होती.

ते त्याचे क्रेडिट घेत नव्हते.साईंच्या प्रभावाचा व लीलेचा प्रभाव आहे असा भाव असे.

१५) आधार:

त्याच्या पवित्र आचरणामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. व ते सर्वांचा आधार बनले होते.त्यांच्या शब्दांचा प्रभाव इतरांवर पडत असे.हेमाडपंतांना त्यांनी बांद्रे स्थानकावर जे सांगितले त्या शब्दांचा प्रभाव  हेमाडपंतांवर झाल्यामुळेच                                         

हेमाडपंतांनी त्वरित शिरडीला जायचा निर्णय घेतला. अर्थात् योजना साईंची होती.ते साईंच्या चरणी स्थिर झाले होते म्हणूनच इतरांना सांगू शकत होते की बाबांचे पायच भवसागरांतून तारणारे आहेत.तोच बाप आहे व तोच माय आहे.पहिला माझा साईनाथ हा त्यांचा भाव होता.

१६) अभिसंवाहन: 

साईबाबा रस्त्याने चालायचे तेव्हा ते बाबांचे चरण जिथे पडले आहेत तिथे बघायचे नाहीत तर बाबांचे चरण रस्त्याला जिथे स्पर्श करणार आहेत तिथे बघून तिथले खडे दूर करायचे बाबांना खडे बोचून त्रास होऊ नये म्हणून.बाबा समर्थ आहेत मग आम्ही पुढे जाऊन काय करणार ? हा विचार ते करत नव्हते.साईबाबांची अंतीम यात्रा निघाली तेव्हा त्यांना किती दु:ख झाले असेल पण त्याही स्थितीत ते साईंना ज्यांनी उचलून घेतले आहे त्यांच्या पायांना काही लागू नये म्हणून त्यांच्या पायांकडे बघत होते.Dad नी हे सांगताना अभिसंवाहन म्हणजे हे,असे सांगितले होते. संपूर्णपणे दाहीदिशांनी बाबांच्या चरणांच्या सुखासाठी केलेले संवाहन म्हणजे अभिसंवाहन-चरणसंवाहन.


इदं न मम! एका श्रेष्ठ साईभक्ताचे गुणसंकीर्तन करायचे भाग्य मिळाले त्याचा लाभ घेतला.


Mohiniveera  Kurhekar

Andheri west, Mumbai.

No comments:

Post a Comment