Friday 20 November 2020

ADHYAY 34, DR PILLE AND SEVEN NARU STORY

 [15/08, 5:40 pm] Dr Nishikant  Vibhute: #SSCD ADHYAY 34

डॉक्टर पिल्ले आणि सात नारू ह्या कथेचा आमच्या जीवनाशी असणारा संबंध स्पष्ट करून सांगा ।

[16/08, 8:38 am] Sharadaveera Padwale: डाॅक्टर पिल्ले  आणि  सात नारे ह्या  कथेचा  आमच्या  जीवनाशी  असणारा संबंध:                            ज्या  वेळी  डाॅक्टर पिल्ले नारुच्या  यातना  सहन  न होऊन  बाबांना  मरण  मागतात  आणि  विनवणी  करतात कि  पुढच्या  जन्मी  मी या यातना  भोगीन, तेव्हा  बाबा  त्यांना  निरोप  पाठवतात, "दहा  जन्मात  हा भोगावं कशासाठी  हवा!आपण  दोघे ही मिळून  दहा  दिवसातच हा भोग  भोगुन संपवून टाकू ".बाबांची उदी  सेवन  आणि  उदी लावून  दहाव्या  दिवशी  नारू  फुटून  त्यातून  सात बारीक  तंतू सारखे  जीवंत  किडे बाहेर  निघून पिल्ले  यांच्या  भयंकर  वेदना शमल्या आणि  रोगाचा  समूळ नाश झाला.                     आपण म्हणतो  की सातारा जन्माच्या  गाठी,म्हणजेच  घट्ट bonding,तसेच  कालचक्र सतत फिरत  असते,सात दिवसानंतर  परत तोच  वार येत असतो,म्हणजेच परत परत  घेणार्या घटना.  बाबांनी पिल्ले  यांचे ते सात नारुचे  तंतू  म्हणजे ते प्रारब्ध तंतू  मुळासंकट बाहेर  काढून भोग  संपवले, आता पुन्हा  भोग  नाहीत.                             ह्या  सात नारुचे आमच्याही  जीवनाशी  जवळचा संबंध  आहे, हे सात नारुचे  तंतू  म्हणजे  आपले वाईट  प्रारब्ध,जे माझ्या  कर्मांत मुळे  परत परत  येवून  त्रास  देते, भोग  भोगायला  लावते                                         आमच्या ही जीवनात असे  नारुचे  सात तंतू  येत  असतात  आणि  आपणही  निराश  होत असतो पण अशा  वेळी  जर तुमच्या  बरोबर  सदगुरू साईनाथा सारखा  तारणहार  असेल ,तर तो आपले हे सात  तंतू  नष्ट  करून  आम्हाला या प्रारब्ध भोगच्या पेट्यातून मुक्त  करतो,या साठी  मला  मात्र त्याच्या  चरणांची  माझा विश्वास  ठाम  ठेवून, माझे  सप्त चक्र  शुद्ध  ठेवून, नवविधाभक्तीच्या मार्ग  अवलंबून भक्ती भाव चैतन्यात रहायला  हवे                       अंबज्ञ  नाथसंविध                            शारदावीरा पडवळे 🙏🙏

[16/08, 11:09 am] Sharadaveera Padwale: हे नारुचे  जंतू  पावसाच्या  घेणं पाण्यातून  आपल्या  पायात शिरतात  आणि  वाढतात.  ते फार  त्रास लायक असतात, पायावर  सूज  येवून  प्रचंड वेदना  देणार्या  असतात. जो पर्यंत  ते जंतू  बाहेर  निघून  जात नाही  तो पर्यंत  जीव घेणा  त्रास  सहन  करावा लागतो.

[16/08, 11:34 am] Sharadaveera Padwale: नारू  हा रोग  पिण्याच्या  अस्वछ  पाण्या द्वारे  आपल्या  शरीरात  प्रवेश  करतो. याचे जंतू  पांढर्या  रंगाचे असतात.  याचे  मेडिकल  नाव  guinea worm असे  आहे.  याच्यावर  ठोस असा उपाय  नाही.

[16/08, 3:44 pm] Mohiniveera Kurhekar: डॉक्टर पिल्ले/ सात नारु            सा.स.च.अ.३४

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

नारू हा गोल कृमी आहे.लांब वाढणाऱ्या परजीवी कृमीमुळे होणारा रोग आहे.हा किडा घाणेरड्या पाण्यातून मानवाच्या शरीरात जातो.

नर आत राहतो.मादी बाहेर पडते.शरीरात फिरत राहते.

सात जागी त्वचेतून बाहेर पडते.तिथे फोड येतात. ती बाहेर येते. तिथे सूज येते.तेव्हा भयंकर मरणप्राय यातना होतात.नारू पुन्हा होऊ नये म्हणून त्याचा समूळ नाश होणे जरुरीचे असते.ही नारुची मादी लांब धाग्यासारखी असते.माणूस ह्या रोगाने खूप अशक्त होतो.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*कृपासिंधु* वाचून सात नारूंचा  

 मला समजलेला अर्थ :

मानवाच्या देहातील सप्तचक्रांमध्ये वाहणारा प्रवाह हा मूलत: त्या जीवात्म्याच्या प्रथम जन्माच्या वेळी

शुद्ध ,पवित्र आणि शुभच असतो.पण

मानव प्रज्ञापराध करुन अशुद्ध स्पंदनांनी त्यांत अडथळे निर्माण करतो.(घाणेरड्या पाण्यातून नारुचा प्रवेश-माझ्या प्रज्ञापराधामुळे आसुरी  दुष्ट सप्त चक्राचा माझ्या देहात प्रवेश)

🍁त्यामुळे सप्तचक्रस्वामिनीने दिलेली शुभ उर्जा अनिरुद्धपणे माझ्या जीवनांत प्रवाहित होऊ शकत नाही.परिणामी मला दु:ख- क्लेशांचा

सामना करावा लागतो .

हे सात फोडातून बाहेर आलेले नारू

म्हणजे माझ्या प्रज्ञापराधाने,चुकीच्या वागण्याने,परमेश्वरी नियमांचा भंग करुन ,मर्यादाभंगामुळे मीच तयार केलेला सात आसुरी दुष्ट चक्रांचा प्रवाह.जो माझे संपू्र्ण शरीर खिळखिळे करुन माझ्या शरीराचा समतोल बिघडवून टाकतो.शीत ,रुक्ष

व लघु गुण वाढवून पू्र्ण शरीराचे संतुलन बिघडवतो.

आता ही सप्त चक्रे पुन्हा मूळपदावर

शुद्ध -पवित्र- शुभ करणे मानवाच्या

ताकदीच्या बाहेरची गोष्ट आहे.कारण

आता माझे मनच अध:पतित झालेले

असते.त्याचे चित्तांत रुपांतर करणे जरुरीचे असते.


🍂रामदास म्हणे पतितांचे उणे।

पतितपावने सांभाळावे।

पतितपावना जानकीजीवना।

तेणे माझ्या मना पालटावे।🍂


हे घडण्यासाठी,माझ्या देहातील ओज

प्रबळ व्हायला हवा.सर्व स्तरांवरील

अनुचित बीजे जाळून टाकण्याचे व

उचित बीजांना विकसित करण्याचे

सामर्थ्य फक्त ओजातच आहे.हे ओज

म्हणजे परमेश्वरी भर्गाचा प्रत्येक जीवात्म्याकडे असणारा अंश.आणि ह्या भर्गाचा स्वामी परमात्मा...सद्गुरू.

 श्री साईराम-अनिरुद्ध राम -

त्रिविक्रम.

डॉ.पिल्लेंच्या पायावर अब्दुल्लाचा पाय पडतो.नारु फुटतो.अशा तीव्र वेदना असतानाही ते परमेश्वराचे स्मरण करतात.🍂करम कर मेरे हालपर  तू करीम.🍂

बाबांचे आज्ञापालनही करतात.त्यांचे आचरण शुद्ध आहे.त्यामुळे बाबा ते भोग विभागून घेऊ म्हणतात.

प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार नारु फुटून बाहेर यायला वेगवेगळा अवधि लागणार.पण फक्त सद्गुरुच तो वेळ कमी करु शकतात.म्हणून साईनाथ म्हणतात,


🍁किमर्थ दहा जन्मांचा पांगू।

अवघ्या दहा दिवसांचा भोगू।

भोगूं विभागून परस्पर ।🍁


 🍁🍁 *श्रीश्वासम्                                              श्रीअनिरुद्धगायत्रीमंत्र,आन्हिक, श्रीशब्दध्यानयोग ,सप्तम ओम्कार साधना*

असे अनेक घाट आपल्या सद्गुरुंनी

आपल्यासाठी बांधून ठेवले आहेत.

आसुरी सप्तचक्ररुपी सात नारुंच्या

दुष्ट चक्रास भेद करुन ईश्वरी इष्ट चक्रास आपल्या जीवनांस गतिमान

करण्यासाठी.🍁🍁


 🍁अनिरुद्ध येता अवघा।

जाळे कापत राहिला।

ओझे माझे घेऊनिया।

मला म्हणे बा लेकरा। 🍁


Mohiniveera Kurhekar

Ambadnya.Naathsamvidh.

[16/08, 9:53 pm] Nandansinh Bhalvankar: *===============*


*डॉ. पिल्ले नारू कथेविषयी माझे विचार*



_भूलोकी जन्म घेता_ 

_जन्म मरणाचे चक्र_ 

_नाही चुकले कुणाला_

_भय दुःख मागे लागे_


_ओझी वाहतो कर्माची_ 

_भार वाढतची राहे_ 

_बापूराया धाव घे रे_

_मायबापा धाव घे_



ह्या कलियुगात जन्मलेला अगदी प्रत्येक मानव हा त्याच्या त्यानेच निर्माण केलेल्या प्रारब्धाच्या ओझ्याने खूपच वाकलेला, दु:खी आणि खंगलेला आहे.


सगळ्यातून सुटका तर हवी आहे. पण आपण सारे सामान्य मानव. षडरिपू खचाखच भरलेले असल्यामुळे मोक्षप्राप्ती ही तर फार दूरची गोष्ट आहे. त्यात वाईट कर्मामुळे भोग भोगायचेच आहेत. 


कथेतील डॉ. पिल्लेही त्यातीलच एक. 



*... पण सद्गुरू सोबत असताना, त्याच्या कृपादृष्टीखाली आपला हा प्रवास खूपच सोपा होतो. ह्या जीवनरूपी बाभूळवनीच्या वाटेला मखमली गालिचात रूपांतर करण्याचे सामर्थ्य केवळ ह्या बाबाकडेच ! आणि म्हणूनच बाबा सद्गुरू म्हणून लाभल्यामुळे पिल्ल्यांचा नारू फुटला आणि ते यातनांमधून मुक्त झाले. यासाठीच जीवनात सद्गुरू हवा.*    



_बाभूळवनीच्या पायवाटी_ 

_गालिचा तू मखमली_ 

_रणरणत्या वाळवंटी_ 

_गरूडपंख सावली_ 



ह्या कथेतून काही महत्तवाच्या गोष्टी समजल्या. 



१) पिल्ले हे स्वत: एक डॉक्टर असूनही इतके घाबरले आणि कळवळले की त्यांना हे जीवन नकोसे झाले. मग सामान्यांची काय कथा? 


*हे प्रारब्ध इतके वाईट आहे की जे एका डॉक्टरलाही रुग्ण बनवू शकते. आणि अशा भोगांतून केवळ हा बाबाच बाहेर काढू शकतो.* 



_शुभाशुभ दोन्ही नमिती_ 

_कर जोडूनी_ 

_प्रारब्धाच्या विशाल भिंती_ 

_तूचि तोडीसी_ 



२) हे सात नारू म्हणजे मानवाच्या जीवनातील *साडेसाती.* संकटांचा चक्रवयुहच. तो भेदायाला साईलीलाच हवी. 



*बाबांना चिलीम आणि बिडी ओढायला समोर पिल्लेच लागत. असे करून ह्या बाबाने त्यांचे प्रारब्ध नारू होण्याआधीच आधीच जाळले होते. त्यांच्या भोगांची तीव्रता खूपच कमी केली होती. नाहीतर पिल्लेना हा नारू जाम भारी पडला असता.*          



३) डॉ. पिल्ल्यांचा बाबांवर अगदी अनन्य विश्वास आहे. *इतके सगळे सहन करीत असतानाही त्यांच्या मुखी साईनाम होते.*

 

ह्या नामाच्या प्रभावामुळेच नारुची घाण फुटून बाहेर येऊ शकली.  



_अनिरुद्ध नामे घालता कवच_ 

_घाण सांग कोठुनी कैसी येई_   


_पिपा म्हणे माझा अनिरुद्ध निश्चय_ 

_त्याच्यावीण शुद्ध कोण करी 



खूपच शिकण्यासारखे आहे यातून. जरा जरी मनाविरुद्ध झाले की आपला मात्र विश्वास डळमळीत होतो आणि देवा तू असे का केलेस असे म्हणून 'त्या'ला लगेच नावे ठेवायला आपण पुढे असतो.   



४) "देवा मी कधीच कुणाला त्रास दिला नाही, सगळ्यांशी चांगले वागलो, मग असे कसे काय झाले ?" असा आपल्या सर्वांचाच आवडीचा प्रश्न असतो. 


*पण आधीच्या जन्मात आपण काय करून ठेवले आहे हे केवळ हा बाबाच जाणतो.* आपण नाही. म्हणूनच अशा प्रश्नाला काहीच अर्थ नाही. 


_होते सार्थक जीवाचे_ 

_मिळे सामर्थ्य मनाचे_ 

_टळे पारब्ध कर्माचे_ 

_बापू बोल बापू बोल_ 



आजारामध्ये निराश झालेल्या आपल्या मनाला केवळ हा बाबाच समजून घेऊ शकतो. मानवाची ताकद मर्यादित आहे हे जाणून हा बाबा स्वतःचे सहाय्य आणि सामर्थ्य त्यात मिसळून कमकुवत मनाला बळकटी देतो. 


_जीवनाची भूमी जरी_ 

_जाहली उजाड_ 

_ह्याने नदी पाठविली_ 

_फोडुनी पहाड_ 



५) मानवाचे मन त्याची सारी शक्ती नष्ट करून टाकते. जीवनात नैराश्य आणते. तेव्हाच मानवाला जीवन नकोसे वाटू लागते. पण हा माझा बापूसाई मन:सामर्थ्यदाता आहे. 



_धुवाया इंद्रिय सारवाया मन_

_व्हावया स्वछ दारी आलो_



*शरीराच्या असाध्य रोगाने मानव आधीच खंगलेला असतो. अशा वेळेस त्याचे मन जर strong असेल, तर अशक्याचेही शक्य होऊ शकते. अर्धी लढाई तो तिथेच जिंकतो. म्हणूनच बाबानी त्यांच्या धीराच्या आणि आश्वासक शब्दांनी पिल्ल्याना आधार दिला आहे.* 



_माझा बापू बापू हा आसरा_ 

_जेव्हा जीव होई घाबरा_



६) *हा बाबा भक्तांचे पर्वताएवढे प्रारब्ध राईएवढे करतो. ते भोग भोगू शकतील एवढी ताकद पुरवतो. सारी काही व्यवस्था करतो. आपल्यावर इतके प्रेम केवळ हा बाबाच करू शकतो. म्हणूनच दहा जन्माचे प्रारब्ध केवळ दहा दिवसांवर आणून ठेवतो.*  



_स्पर्श ह्याच्या दृष्टीचा_ 

_गदगद हलवी प्रारब्धा_



७) मानवाला भोग हे भोगावेच लागतात. पण सद्गुरू छायेमध्ये सारेच गणित वेगळे. आपल्या पानात काय वाढायचं, काय उचित हे आपल्यापेक्षा हा बाबाच जाणतो.          


बघायला गेलं तर बाबा पिल्लेंना ताबडतोब मुक्ती देऊ शकलेही असते. परंतु त्यांच्यासाठी त्यांच्या नाथसंविध नुसार जे उचित आहे तेच बाबांनी त्यांना सांगितले. 



८) आपल्या भक्तांना दुःखी बघून ह्याला खूप वाईट वाटते. प्रत्येकाला सुख शांती देण्यासाठी तर हा खाली येतो. 


_भक्ताश्रू पाहताच मन तुझे आक्रंदे_

_हळव्या जिवलगांना भावणारा_ 

_भक्तिवेड्या पामरांना तारणारा ..._ 



*बाबा पिल्लेना भोग भोगायचे हे प्रेमाने समजाववून सांगताना स्वतः त्यांच्याबरोबरीने समर्थपणे उभा आहे. या नारूविरुद्धच्या लढाईत तो भक्ताच्या पाठीच नाही, तर त्याच्यासमोर खंबीरपणे सक्षमतेने तयार आहे.*       



९) बाबानी खुद्द स्वतःचा तक्या डॉकटर पिल्लेना आराम पडावा म्हणून दिला आहे. *हा तक्या म्हणजेच बाबांचा विसावा. हीच ती मशीदमाईची छाया.*  



*हीच आपुली द्वारकामाता ।* 

*मशिदीचे या अंकीं बैसतां ।* 

*लेंकुरां देई ती निर्भयता ।*

*चिंतेची वार्ता नुरेचि ॥४८॥*


*मोठी कृपाळू ही मशीदमाई ।*

* भोळ्या भाविकांची ही आई ।* 

*कोणी कसाही पडो अपायीं ।* 

*करील ही ठायींच रक्षण ॥४९॥*


मग असे असताना पिल्लेना कशाला चिंता करायला हवी ? नाही का ? 



१०) इतके सारे मिळूनही पिल्लेंची तक्रार करणे सुरूच आहे. नानांनी नारूवर बांधलेल्या पट्टीने आराम पडत नाही असा जयघोष चालू आहे.


पुढे नारू फुटला तरी बाबांच्या म्हणण्यानुसार कावळा कुठे आहे ज्याने टोचा मारल्यावर नारू बरा होणार आहे हेच पाहात आहेत.


 *सबुरी संपल्यावर प्रत्येक मानव असाच हतबल होतो.*     



११) *बाबांच्या planning ला मनापासून सलाम ! आधी पिल्लेना पाय लांब करायला सांगितले. पुढे त्यावरच अब्दुलचा पाय पडला. बाबांची खेळी अगदीच अगाध ! परिस्थितीला वाकवून हवे ते घडवून आणतो हा बाबा !* 



नुसते कुथत पडून राहण्यापेक्षा एकदाच मोठी कळ येऊन नारू फुटून बाहेर येणे हे खूपच चांगले. बाबांनी अगदी बरोबर टायमिंग साधले. ग्रेट ! बाबा पिल्लेंचा नारू कसाही बरा करू शकले असते. 


पण पिल्लेना मशीदमाईची आणि बाबांची स्पंदने प्राप्त व्हावीत यासाठी बाबांनी त्यांना आपल्या जवळच बोलावून घेतले.   



शेवटी एवढेच वाटते. 



*There is no sorrow on this Earth that the Heavens cannot solve! ...*


*...and for all of us, being His children, our Heaven is here, at the lotus feet of Sadguru Aniruddha Bapu, Nandai and Suchitdada.*   



_Love you Dad Mom Dada_



नंदनसिंह भालवणकर 

दादर उपासना केंद्र

[18/08, 11:10 am] Pranjaliveera Halbe Devrukh: डॉक्टर पिल्ले यांची कथा ३४ व्या अध्यायात येते.३+४=७ सप्त तंतू.डॉक्टर नक्कीच श्रध्दावान आहेत , त्यांची सेवा भक्ती योग्य मार्गावर आहे म्हणूनच त्यांचे भोग स्वत: बाबा विभागून घ्यायला तयार आहेत.अंबज्ञ . आपण चरखा चालवून बारीक सूत काततो.चरख्याला ७ चक्र आहेत . आपल्या शरीरात ही सप्तचक्र आहेत.चरखा चालवताना आपण जप करतो- ऋषभ गौतम दत्तगुरु,नानक मेरी राम स्मरु.हा चरखा दिला बापूंनी.याचे स्मरण ठेवले म्हणजे एकूण ७ नामे आपण घेतो.ह्या सूतापासून शाळकरी मुलांसाठी युनिफॉर्म केले जातात.म्हणजेच चरखा चालवल्याने सेवा भक्ती ही दोन्ही पावले पडतात.त्यामुळेच श्रध्दावानाचे प्रखर प्रारब्ध सौम्य होते आणि त्याला सद्गुरू सहवासही लाभतो.नारुचे सप्तजंतू समूळ उखडले जातात.

[18/08, 11:20 am] Rasikaveera Sant: Hari Om 


सर्व श्रद्धावानांना खूप खूप खूप अंबज्ञ खूपच अंबज्ञ प्रयास केला आहे आपण सर्वांनी🙏🏻🌹


या कथेवर बापूंनी जे सुचवले ते लिहीण्याचा प्रयास... 

.


The moment I read it, Dr Pillai came in front of me!! He was suffering from Naaru...


Comparison between both ie... ANIMAL & HUMAN...

Man ...Suffering from Naaru

Dog ... Suffering from Ticks

The pain is nearly the same!!

We can speak about our sufferings, but all animals can't!!


Saibaba brought ...

Dr Pillai in HIS krupachhaya...

BapuSai brought...

That Dog in HIS krupachhaya...


Treatment of both is done by BAPUSAI...

Saibaba sent HIS Sinh (Medha) in a Crow's disguise to treat Dr Pillai...

Bapu sent HIS a Friend (Viniyaa) to treat that Dog...


Both are treated, free from Prarabdh and Happy at HIS LotusFeet (Anand)...

Anand maaza ahe

Sachhidanand maaza ahe 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Jai jagadamb Jai Durge

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Hari Om Shriram Ambadnya Naathsamvidh

Bapunche lekaru

Rasikaveera Sant


[18/08, 12:00 pm] Manaliveera Pandit: नारु हा रोग माणसाच्या शरीरात शिरल्यानंतर त्याला अतिव वेदना होतात. डाॅ. पिल्ले ना पण पूर्व प्रारब्धानूसार भोग भोगावे लागतात पण ते भक्त असल्यामुळे बाबा त्यांना समजवतात की हे भोग आपण एकत्रच भोगून संपवू . त्यातून सुटका नसते. 


नारू चे जंतू हे एक प्रकारची शरीराला लागलेली कीडच होती कारण सहा षडरिपू आणि सातवा अहंकार असे हे सात दुर्गुण मानवी देहात जेव्हा समतोल बिघडवतात तेव्हा आजारांची सुरूवात होते. ते जंतू पिल्लेंच्या शरीराला आत मध्ये पोखरत होते परंतु आपण स्वतःहून त्याला बाहेर काढणे हे मानवी क्षमतेच्या पलीकडे आहे. तिथेच सद्गुरूंची खरी गरज असते आणि बाबांना हे पूर्ण माहीत होतं की कधी कुठल्या वेळी त्याच्यावर आपला सटका चालवायचा आणि बाबांनी तेच केलं अब्दुल्ला रुपी सटक्याचा दबाव उचित वेळी उचित ठिकाणी देऊन बाबांनी ते जंतू बाहेर काढले आणि अशा रीतीने एका चांगल्या भक्ताला त्याच्या सोबत स्वतः एकत्र येऊन प्रारब्धाचे भोग संपवायला मदत केली . सद्गुरु कृपेची पुली असल्याशिवाय सामान्य माणूस संकटाचा भार इतक्या सहजासहजी उचलूच शकत नाही असे मला वाटते.


अंबज्ञ

मनालीवीरा पंडित

[18/08, 1:47 pm] Sonaliveera Bellubi: *।।जे जे मजसाठी उचित तेचि तू देशील खचित। हे मात्र मी नक्की जाणित 

नाही तक्रार राघवा।।*



Dr. पिल्ले आणि सात नारू

यांचा आमच्या जीवनाशी असणारा संबंध:-


Dr पिल्ले यांना नारू होतो व ते बाबांच्या चरणी शरण येतात.

आता बघा.. 

स्वतः Dr असून ते स्वतःचा इलाज स्वतः करत नाहीत किंवा ते इतर कोठेही जाऊ इच्छित नाहीत तर! जे होईल ते बाबांच्या इच्छेने होईल असा त्यांचा बाबांच्या चरणांवरील पवित्र भाव असतो.


इथेच ते पहिली परीक्षा पास होतात.


*परमात्म्याच्या चरणांवरील दृढ विश्वास*


जे उचित असेल ते माझे बाबा घडवून आणतील.


श्रेयस ची इच्छा धरणे ना की, प्रेयस ची. आज माझेच कर्मभोग नारू रुपाने उदभवले आहेत आणि थोडे थोडके नाहीतर तब्बल ७.


माझे प्रारब्ध किती मोठ असेल मग???


आणि मी आत्ता कुठे तर अगदी proper place वर!

जिथे असायला हवा तिथेच आहे.


मशिदमाई मध्ये आणि बाबांच्या चरणांशी शरण आलेला.

मग मला घाबरायचं काहीच कारण नाही correct?


इथेच पिल्ले दुसरी परीक्षा पास होतात. 


*परमात्म्याच्या चरणी सम्पूर्ण शरणागती*


सात च का?


आपल्याला आपल्या आयुष्यात फक्त आनंद, सुख, सौख्य,आणि आराम पाहिजे असतो.

जो शक्यतो विनासायास मिळावा.


या साठी मी काही ना काही करेन कधी उचित मार्गाने कधी अनुचित मार्गाने. 

मी निवडलेला मार्ग उचित का अनुचित हे मला कोण शकवतो तर माझा सद्गुरू.


मला फक्त माझा फायदा हवा असतो पण त्यातून निर्माण होणारे प्रारब्धभोग त्याचे काय? 


एक त्रास सहन होत नाही आपल्याला आणि हा सात पट त्रास कसा सहन करू शकणार आपण? 


आपले आज वर किमान 372 जन्म झालेत मग आपण किती आपले प्रारब्धभोग वाढवून घेतले असतील ते पण!आपण जाणू शकत नाही. हे सगळं कोण जाणत तर फक्त आपले सद्गुरु.


तो सद्गुरू खुप मोठा असतो

मग आपण कितीही शिकलेलो असलो किंवा वयाने किती ही मोठे असलो तरी त्याची ताकद सर्वात मोठी असते हे आपण लक्ष्यात ठेवायला पाहिजे.


पिल्ले स्वतः Dr असून त्यांना जराही अभिमान नव्हता. जसे बाबा सांगतील तस ते करत गेले.


बाबा बोलले भिंतीला टेकून पाय पसरून बस ते बसले.


मग बाबा बोलले काऊ येऊन टोचेल हा आता आणि कमी होईल. अगदी लहान मुलासारखा ते आकाशाकडे पाहत राहिले की कधी काऊ येईल आणि टोचून माझी सुटका करेल.


प्रारब्धभोगातून सुटका करणारा तर समोरच बसला होता माझा साईनाथ🙏🏻


तेवढयात बाबा अब्दुल्ला रूपाने पुढं आले व पाय दिला पिल्ले च्या पायावर आणि एकच कांठाळी.


त्या क्षणी साई नाथांनी जगातील सर्वात मोठ्या Dr चे काम केलं होतं. सर्व नारू फुटले आणि सर्व सप्त तंतू बाहेर पडले होते.


त्यातही ते गात होतें

*रहम कर मेरे हाल पर रहीम मेरे*

*सारे जग मे नुमाया 'तेरी शान है।*


*सब सोपं दिया है जीवन का अब भार तुम्हारे हाथोंमे*


किती भक्ती खरंच त्यांची साई चरणांवरील!! की, *तेच चरण लावून साईंनी त्यांना रोग मुक्त, चिंता मुक्त, वेदना मुक्त केले*. 


आपण ही सर्वजण प्रारब्धभोगाशी लढत असतो, झुंज देत असतो.


पिल्ले म्हणतात बाबा मला मरण द्या. मी 10 जन्मात हे भोग भोगेन.


*किमर्थ दहा जन्माचा पांगु

अवघ्या दहा दिवसांच्या भोगू

भोग विभागून भोगू*

दहा दिवसांचा तर प्रश्न आहे आणि ते पण मी आणि तू मिळून भोगू


अजून काय हवं?


किती हे त्याचे *अकारण कारुण्य*


दहा जन्माचे भोग कशाला तर फक्त काही वेळाचाच तर प्रश्न आहे गरज फक्त आहे ती त्याच्या चरणांवरील दृढ विश्वासाची आणि  सबुरी ची. जो वर हे दोन्ही दृढ राहील तो वर माझ्या साठी काहीच अशक्य नाही. तो साई माझ्यासाठी, माझ्या वरील प्रेमासाठी सदैव तत्पर असतोच मग माझे प्रारब्धभोग कितीही घोर असोत तो घोरकष्टातून तारणारा आपला उद्धार करणारा साई अनिरुद्ध आपल्या साठी असतोच. 


जसे Dr. पिल्ले बाबांचे बाळ आहेत तसेच आपण ही सर्व मशिदमाई ची आणि बाबांची पिलेच आहोत. जसा माझा साईनाथ सांगतो तीच माझ्यासाठी पूर्ण दिशा असायला पाहिजे.


पण तिथे माझी चतुराई कामाची नाही. तरच माझा बेडपार होईल यात शंकाच नाही.


जस बाबांनी सुचवल तस

अंबज्ञ नाथसंविध् 💐🙏🏻श्रीराम

सोनालीवीरा

[18/08, 3:33 pm] Jayashreeveera Jadhav SSCD: *हरिॐ नाथसंविध*


छोटासा प्रयास


अध्याय ३४ डॉ. पिल्लेची कथा 


डॉ. पिल्ले नारू व्यथेने त्रस्त झाले .... एकावर एक असे सात नारू त्यांच्या पायावर झाले .... साईबाबांचे त्यांच्यावर फार प्रेम ते त्यांना प्रेमाने भाऊ म्हणत ... 


मुखात साई नामस्मरण चालू होते.... प्रचंड वेदना होत होत्या, त्यामुळे ते बाबांना प्रार्थना करत होते कि पुढे दहा जन्म घेऊन हे भोग भोगेन पण आता मला मरण द्या.... तेव्हा बाबा त्यांना रागावतात कि हाच का तुझा पुरुषार्थ, माझ्याकडे मरण मागतोस आपण दोघे याच जन्मात परस्पर विभागून भोगू यासाठी किमर्थ दहा जन्म का घालवायचे.... 


*मी कोण आहे? मी योद्धा आहे. ज्यांना ज्यांना म्हणून आपल्या प्रारब्धाशी लढायचे आहे त्यांना युद्धकला शिकवणे हा माझा छंद आहे..... हे आपल्या लाडक्या सद्गुरुंच वचन आहे..*


*सात नारू...सप्तचक्र...यामधील काही बिघाड...जे फक्त सद्गुरू कृपेने आणि उपासनेने ठीक होऊ शकतात..मुद्रा...हि सद्गुरूंनी त्यावर दिलेली उपासना...*


सद्गुरुकृपेने प्रारब्ध भोग एकतर त्यांचा नाश होतो किंवा भोग भोगण्याचे सामर्थ्य मिळते तर काही काही वेळा स्वतः सद्गुरू भक्तांचे भोग स्वतःवर घेतात.. तर्खडांच्या मुलाची, लोहारणीच्या मुलीची कथा....


खरं तर जीवावरच संकट पण माझ्या साईनाथांशिवाय कोणी नाही. हा विश्वास. एक विश्वास असावा पुरता...


*माझा बापू बापू हा आसरा जेव्हा जीव होई , जीव होई घाबरा*


डॉ. पिल्ले नारुरोगाने त्रस्त. जेव्हा त्यांना बाबांकडे आणला जातं तेव्हा साईनाथ स्वतःचा तक्या काढून त्यांना देतात आणि सांगतात उगी चिंता करू नको स्वस्त पडून राहा... बस्स साईबाबांचा आश्रय मिळतो..... इथे सद्गुरू दहा जन्माचा भोग परस्पर विभागून स्वतः भक्ताला भोगू लागतात..... इथे स्वतःचा तक्या ह्याचा हा भावार्थ असं मला वाटतं.... 


*गुरुवारी दर्शनाच्या वेळी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या हातात पूर्वी एक लोड असायचा आता एक उशी असते तकिया* हा आधार आश्रय प्रत्येक श्रद्धावानाला तिथे मिळतो. एका हाताने आशीर्वाद, डोळ्यांनी भरभरून प्रेम तर दुसऱ्या हाताचा आधार कोणत्याही परिस्तिथीत असो भक्त *मी तुला कधीच टाकणार नाही* याची ग्याही जणू तो आधार देत असतो.

 

*जीस पथ पर कभी ना भय है, हे वो पथ है बापू का | मायूस ना तू होना कभी भी, ये नाश करे सब दु:खो का ||*


नाथसंविध अंबज्ञ - जयश्रीवीरा जाधव

[18/08, 6:40 pm] Mohiniveera Kurhekar: अ ३४.पिल्ले व सात नारु संबंध.

निघाले सजीव सप्त जंतु।

जखमांमाजील बारीक तंतु।

वेदना दुर्धर झाल्या शांतु।

दु:खासी अंतु जाहला।८८।

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 

नारुची मादी लांब धाग्यासारखी असते.१०० cm to १२० cm× १.५ cm.मादीच्या शरीराचा पुष्कळसा भाग डिंभ ( larva)भरलेले गर्भाशयच असते.सबंध गर्भाशय मोकळे करण्यास तिला १५ दिवस लागतात.त्यानंतर मादी त्या व्रणांतून

आपोआप बाहेर येते.व व्रण बरा होतो.

अ.३४ 3+4=7 गर्भाशयाशी संबंध

 हा ७ आकडा बरेच काही दर्शवतो.आपण सर्व ते जाणतो.

मला हा सात आकडा श्रीमद्पुरुषार्थ

ग्रंथाच्या ७व्या चरणाची आठवण करुन देतो.तसेच श्री सा.स.चरित्रांतील

७व्या अध्यायाचीही आठवण करुन देतो.

*पहा हे भोगणें पडे*

*तुमचें सांकडे मजलागी*७/१०८*

खापर्डे ह्यांच्या मुलाची ग्रंथी ज्वराची कथा -*चरण सात (सत्यप्रवेश) निरुपण७/५-बाबांनी भोग स्वतः वर घेतले.ज्याची नाळ ह्या सदगुरु माऊलीशी जुळलेली आहे.जो ह्या साईमाऊलीच्या उबदार गर्भगृहात असणारा खरा श्रद्धावान आहे,त्याच्या कर्माचे अटळ व खडतर भोग अशा प्रकारे साईबाबा स्वतःवर घेतात व बाळावर आच येऊ देत नाहीत.हेमाडपंत म्हणतात,

बाबांच्या दर्शनाने तीन्ही व्याधीतून 

मुक्तता होई.

(आधिभौतिक ,आधिदैविक,आध्यात्मिक.)व्याधि कोणतीही असो.वेदना व त्याबरोबर दु:खही येतेच.व त्या पाठोपाठ भयही येतेच.

बाबांच्या दर्शनाने त्या व्याधीचा समुळ नाश होतो. शिवाय दु:ख व भयाचाही अंत होतो.


(७ अंक.)


मानवी आईच्या गर्भगृहात गर्भ *७* 

ह्या आकृतीप्रमाणे स्थित असतो.

*सत्यप्रवेश चरण सात /८ निरुपण*

गर्भाला जसे मातेशी जुळणे आवश्यक

आहे. तसेच आमचे परमात्म्याशी निरंतर जुळलेले असणे आवश्यक आहे.नाळरुपी नाळेनेच आम्ही सदैव भगवंताशी जुळलेले राहतो.

डॉक्टर पिल्ले त्या मरणप्राय वेदनेतही बाबांचे नामस्मरण करीत होते.म्हणून

त्यांची नारु व्याधीतून लवकर सुटका झाली.व त्या नारुच्या मादीचीही सुटका झाली.


Mohiniveera Kurhekar

Ambadnya.Naathsamvidh.

No comments:

Post a Comment