Sunday, 31 January 2016

BHAGOJI SHIEEND

पूर्व जन्मीचा महा पापिष्ट । सर्वांगी भरले रक्त कुष्ट। भागोजी शिंदा महा व्याधिष्ट । परि भक्त वरिष्ट बाबांचा । ।
रक्त पितीने झडली बोटे ।
दुर्गंधिनें सर्वांग ओखटें।
ऐसे जयांचे दुर्भाग्य मोठें ।
भाग्य चोखटें सेवा सूखे ।।

बाबा स्वतः च्या आचरणातुन आम्हाला शिकवत आहेत खरे भाग्य कोणते आणि खरे दुर्भाग्य कोणते ।

आम्ही बाहेराल्या ढोंगाला भुलतो पण सर्वेश्वर परमात्मा आमच्या आत्म रंगाला जाणतोच ।
भागोजी शिंदे ह्यानी कधीही आपल्या सेवा कार्यात माघार घेतली नाही ।
बाबांना उन लागू नए म्हणून सतत छत्र घेउन पाठी मागे चालणारे भागोजी शिंदे ।
आपल्या शरीराच्या व्याधिचा काहीही विचार करत नाहित ।
बाबांनी मला त्यांच्या हाताची सेवा करायची संधी दिली आहे म्हणून अत्यंत कृतज्ञतापूर्वक पने आपल्या देवाची सेवा प्राण जाऊ पर्यन्त चालु ठेवली होती ।
बाबांचा हात आता बरा झाला आहे आता कशाला परत परत तूप लावा असा विचार कधीही त्यांच्यामनाला शिवला नाही ।
भागोजी आम्हाला कसे अम्बज्ञ व्हायचे कसे कृतज्ञ व्हायचे कसे स्वतः ला आपण भाग्य वान आहोत ह्याची आठवण करून द्यायचे हे शिकवत आहेत ।

 बाहेरून जरी महा पापी वाटत असले तरी भागोजी शिंदे खर्या अर्थाने पुन्यवान आहेत ।

 जरी रक्तामधे विषाणु फिरत असले तरी मना मधे सदगुरु वर प्रेम फिरत असेल तर ते अशुद्ध रक्त देखिल मानवाला जीवनाच्या सर्वोच्च शिखरा वर नेउन पोहंचावाते । ह्याचे उदाहरण भागोजी शिंदे ।
सदगुरु चा निरंतर सहवास
त्याची निरंतर आठव
त्याचा निरंतर विरह
हेच खरे निरोगी आयुष्य
नाही तर फ़क्त शुद्ध रक्त शरीरात असून आपण स्वतःला निरोगी म्हणवुन घेउ शकत नाही ।

मी अम्बज्ञ आहे ।

No comments:

Post a Comment