Sunday, 31 January 2016

PHASES OF LIFE AND BHAKTI

बाळपणि क्रीडा सक्त
तरुण पणि तरुनिराक्त
वृद्धाप काळी ज़रा ग्रस्त
सदैव त्रस्त व्याधिंनी ।

मनाची ओढ़ आसक्ति सतत  सहज सुलभ प्रेरनान्कडे असते ।
सुखाची आवड असते ।
विविध गोष्टी आपल्याला सुख देतील अशी मनाची वेडी धारणा असते ।
बालपणि क्रीडा सक्ती चालु होते ती आयुष्या भर चालूच रहाते । रूप मात्र वेग वेगळे घेते ।
आणि दूसरी टोकाची भूमिका ज़रा ग्रस्त ।
परमात्म्याने दिलेल्या वेळेचा दुरुपयोग करून झाल्यावर उरते जरा अवस्था ।
म्हणजेच इच्छा असून ही काहीही करण्यासाठी कमी क्षमतेची स्थिति ।
मनाच्या आहारी जाउन श्रेय काय आणि प्रेय काय ह्याची जनीव असून देखिल आम्ही फ़क्त प्रेयाच्या मागेच धावातो ।
प्रत्येक मानव आदिमातेचा नातू आहे आणि परमात्म्याचा अंश आहे ।
अफाट वृक्ष बनन्याचे बीज घेउन जन्म घेतो पण क्रीडा करण्यात वेळ घालवून बसतो ।
अध्याय 8 मधे हेमाड पंत त्यांची तलमल व्यक्त करत आहेत आमच्या साठी ।
ऐसा अमंगल आणी  नश्वर । नरदेह जरी क्षण भंगुर ।तरी मंगल्धाम श्री परमेश्वर ।
हाती येणार एणेची ।

ह्या देहा ला आपण कितीही नावे ठेवली तरी हा देहच पुढे चालून मंगलधाम परमात्म्याचे निवास आणि त्याला प्राप्त करूँ घेण्याचे साधन बनणार आहे ।

शाश्वत परमात्म्याला प्राप्त करून घेणे नित्य निर्भयता आणि सामीप्य मिळवने ह्या साठी नियमित हरि गुरु संकर्तनी असावे ।
ही हेमाड़ पंतांची इच्छा आहे ।
हरि ॐ श्री राम अम्बज्ञ ।
डॉ निशिकांत सिंह विभुते ।

--

No comments:

Post a Comment