Sunday 31 January 2016

IMPORTANCE OF HUMAN LIFE , ADHYAY 8

अध्याय ८
नर जन्माचे महत्व
जो देह हाडा मान्साचा बनलेला आहे त्याचे पालन पोषण करने योग्यच आहे पण त्याला डोक्यावर बसवू नक़ा असे हेमाड़ पन्त आम्हाला संगत आहेत .
त्याला आपल्या आध्यात्मिक उन्नती साठी चाकर बनवा आणी जर आपण त्याचे चाकर बनलो तर ह़ा देहच नरकाचे द्वार बनतो .
आयुष्य नित्य कार्य करत करत भराभर कसे निघून गेले ते देखील कळनार नाही आणि जसा मच्छीमार जाळे ओढतो तसा आपला काळ जाळे ओढ्णार आणि तेव्ह़ा तड फ़डून फ़ायदा नाही .
पुढील जन्माचा भरोसा काय नर जन्म मिळेलच असे सांगता येत नाही । मोठ्या भाग्याने हा नर जन्म देवाने नरा पासून नारायणा पर्यन्त चा प्रवास करण्या साठी दिलेला आहे ।
देवाची इच्छा आहे की मी बनवलेला हा सुन्दर खेळ कोणी बघावा आणि तो बघत बघत मलाही बघावे ।
म्हणून तर सद्गुरु बापू आम्हाला सतत सांगत असतात की मोक्ष मागण्या पेक्षा भक्ति मागा । भक्ती पाठी सर्व तुम्हाला मिळेल ।
गुरु ब्रह्म नव्हेत दोन ।
झाले जया हें अभेद ज्ञान ।
हीच भक्ती घडतां जाण ।
माया तरण सुगम जें ।।

गुरुची आठवण गुरुचे ध्यान गुरुचे गुण संकीर्तन ह्या पेक्षा मोठे ज्ञान ही नाही आणि साधन ही नाही ।मायेच्या सागरात बुडनार्या आम्हाला तारणारा केवळ तो एकच आहे ।

बापुना नामनो हिचको
लै जाय भव सागारनो पार ।

आम्ही अम्बज्ञ आहोत ।

हरि ॐ  श्री राम अम्बज्ञ ।

डॉ निशिकांतसिंह विभुते

--

No comments:

Post a Comment