Sunday 31 January 2016

ADHYAY 8 , BAYAJABAI SHRADDHAVAN

बापूंनी बहु भाषिक मराठी क्लास मधे सांगितलेले 8 आध्याया शी निगडित notes -
एकदा बायजाबाईला खुप ताप आला होता .तिला उठून बसता पण येत नव्हते .
घरात दूसरी कोणी स्त्री पण नव्हती .
बायजाबाई विचार करू लागली : "माझ्या साईं बाण
बाबाला आज जेवण कसे बरे पोहंचावता येईल ? "
तेवढ्यात तिला खुप घाम येवु लागला व ताप उतरु लागला  .
बायजाबाई ला थोड़े बरे वाटु लागताच तिने भाजी भाकरी बनवली .
परंतु तिच्या शरीरात चालत जाण्याचे मात्र त्राण नव्हते .ती उम्बरठ्या वरच बसून कोणी येण्याची वाट पाहू लागली .एकही मनुष्य घराजवळ आला नाही .
दुपार झाली ,सूर्य डोक्यावरून खाली उतरू लागला .
शेवटी काळज़ी वाटुन बायजाबाई स्वतः खुरडत खुरडत टोपली घेउन निघाली .
घराच्या सहा पायारया उतरतानाच तिचा तोल गेला व तिच्या हातून टोपली पडली .
(सहा पायरयाsix steps:
1. मालकत्व (स्वामित्व )
2.निशुल्कता ( कम क्षम में ज्यादा फ़ायदा चाहना )
3.आलस्य (laziness)
4.शोक धारिणी वृत्ती
5.अधीरता (impatience)
6.शक (doubt)
}
ती टोपली कोणीतरी पकडली आणि बायजाबाई ला हात दिला .
तो हात होता साईं चा .
साईं :आई , एवढे कष्ट कशाला ? मला निरोप पाठवायाचा, मी आलो असतो .
बा : निरोप पाठवला होता
साईं: मला कोणी आणून दिला नाही
बा: "तुला निरोप देणारा तूच ." पाठव णारी मी नव्हते .
साईं : तू कशी आहेस ?
बा : तुला खुप भूक लागली असेल ना देवा ?
साईं : तू काल पासून काहीच खाल्लं नाहीस ना ?
बा : माझं म्हातारीच काय ते मोठं .?
सा : मोठ्या मुलाने आईला जपायचे की म्हातारया आईने मुलाला ?
बा : मुलगा कितीही मोठा झाला , तरी आई साठी लहानच ना ?
साईं : बोलाचीच कढ़ी आणि बोलाचाच भात वाढणार काय ?
बा : टोपली कोणाच्या हातात आहे ?
साईं : पण तू खाऊ देशील तेव्हा ना ? प्रश्न विचारायचे थाम्बवाशील तर मी खाईन ना ?
बा : तू कधी पासून प्रश्नांनी अडायला लागलास ?
आता हां घास घे बरं !
असे म्हणून बायजाबाई साईं ना भरवू लागली .
जेवण झाल्यावर साईं ना म्हणाली "थोड़ा वेळ विश्रांति घे ".
साईं : असं सांगणार दुसरं कुणीही नाही .
बा : आणि  असा स्वतः हुन धावत येणारा तुझ्या  सारखा देव नाही .
साईं : पण मी स्वतःच्या पोटासाठी धावत आलो .
बा : तुझं पोट काय माझ्या भाकरीने भरणार आहे ?
तू माझे कष्ट बघून धावत आलास , माझे व्रत मोडु नये म्हणून .
हरि ॐ श्री राम अंबज्ञ

Typed by dr nishikantsinh vibhute


--

No comments:

Post a Comment