Sunday, 31 January 2016

BABA BURNT TURBAN OF TATYA KOTE PATIL (ADHYAY 6)

बाबांनी फेटा जाळ्ला आणि एक रुपया पण खड्ड्यात टाकला
हया बद्दल कोणाला काय वाटते ?
मात्रु वात्सल्य विन्दानम पहिल्या अध्यायामधे
भगवान् परशुराम म्हणतात की मानव काम आणि क्रोध ह्यानी मारला जात आहे ।

जेथे फेटा पगड़ी हे माथ्यावर आपली माणसाची उंच स्थिती status दाखविते । ह्यातच अहंकार लपलेला असतो । मथ्याचा म्हणजेच बुद्धीच आधी आहंकार येतो । ही कृति माझ्या मुळेच झाली असा पोकळ भ्रम म्हणजे हां अहंकार । आणि हा च क्रोधाला जन्म देतो । "मी कोण आहे माहीत नाही का तुला ? "असे रागात आपण बोलतो । बाबा अहंकाराला निसते फेकत नाहित तर जाळुन टाकतात ।
ही भर्जन शक्ति आहे साईं सच्चरिताचि।

आणि दूसरी गोष्ट बाबांनी रुपया त्या खड्ड्यात टाकला ।
हा भगवान् परशुरामान्नी सांगितलेला काम । ही वस्तु माझ्या साठी बनलेली आहे । मला पाहिजेच । म्हणजे काम ।
हाच परमात्म्याचे अधिष्ठान नसल्यावर घात करतो ।
ह्या रुपया च्या रुपाने बाबा आम्हाला मोहाचा त्याग हेच आपल्या कार्याच्या पाया भरणी आरंभि घडले पाहिजे असे शिकवत आहेत ।
त्येन त्यक्तेन भुञ्जिथा।
त्याग करुनच उपभोग घेणे ।
वैराग्याची ईमारत उभी करणे ।

अम्बज्ञ।

No comments:

Post a Comment