Sunday, 31 January 2016

HEMADPANT

आधी सोडून आपली स्वतंत्रता का स्विकरावी परतंत्रता बोलणारे हेमाड पंत

आपले सर्वस्व साईं नाथांच्या चरणी अर्पण करतात

हा साईं नाथाच माझा पकडून पानी (हात) स्वतः च्या चरित्राला गिरवतिल । माझ्याकडून लिहून घेतील । असे म्हणतात ।
मी तो केवळ निमित्त मात्र ।
बाबा माझ्याकडून स्वतः त्यांचे कार्य करुन घेत आहेत असे ते म्हणतात ।
गीतेतिल कर्म अकर्म ब्रह्मार्पण करणे ते हेच आहे ।
आपल्या प्रत्येक कार्याचा कर्ता हा मी नसून "तो " आहे हा दृढ भाव भक्ताला त्या कर्माच्या फला पासून , फलाशे पासून , अहंकारा पासून दूर ठेवतो ।
 हा देहचि नाही जेथे अपुला ।
तोचि साईं चरणी समर्पिला ।
मग तयाच्या चलन वलनाला ।
काय अपुला अधिकार ।

देहातिल सूक्ष्म अति सूक्ष्म हालचाल त्यांच्या इच्छेने च होते ह्याची जाणीव ।
माझी प्तत्येक कृती त्याच्या इच्छेने च ह्वावी ही इच्छा ।
कृती करण्यासाठी धड्पड़ाने ।
साचार वानर सैनिक बनण्याचा प्रयत्न करणे । आणि ती कृती पूर्ण झाल्या वर ती सदगुरु ने च माझ्या कडून करुन घेतली ही जाणीव (रावण वध रामच करणार मी फ़क्त वानर सैनिक बनुन राहणार )
हाच भगवान श्री कृष्णाने सांगितलेला निष्काम कर्म योग ।
हेच हेमाड पंतांचे भक्ती शिखरी चढ़ विने ।

अंबज्ञ

No comments:

Post a Comment