Thursday, 26 June 2014

MIND AND CHAND PATIL चाँद पाटिल

पाठी वर खोगीर घेउन फ़िरणारे चाँद भाई हे आमचेच प्रतिक वाटतात । आम्हचा मनाचा एक हिस्सा घोड्या प्रमाणे कुठे तरी क्षुल्लक शा गोष्टिन्मागे भरकटत राहाते । आमच्या मनाच्या उरलेल्या हिस्स्याला ही जाणीव असतेच । ही जाणीव म्हणजेच खोगीर पाठीवर घेउन फिरणे । जो दोन महिन्यां पासून घोड़ी शोधत फिरतोय त्या चाँद भाई ला बाबा क्षण भर बसायला सांगत आहेत । थोड़ी चिलीम पिण्यास स प्रेमाने सांगत आहेत । आपण वीनकारण दहा ठिकाणी धावाधाव करण्यापेक्षा एका सदगुरु चरणी काही क्षण बसताच आमचे सर्वस्व आम्हाला सापडते । कोठे तरी जवळच घोड़ी सापडते त्या प्रमाणे । जी गोष्ट आम्हाला चमत्कार वाटते ती परमात्म्याची नित्य सहज कृती आहे । Quontum physics मधे बापुन्नी सांगितले की उर्जांचे पुन्जके हे मुलभुत घटक आहेत दृष्य सृष्टीचे । आपले लक्ष त्याच्यावर पडताच ते दुसरया जागी जाउन पोहंचातात । हां एक चमत्कारच आहे । आणि हां स्रुष्टिचा नियम आहे आम्हाला माहित नव्हता तेव्हापासून पण आम्हाला माहित झाल्यावर तो चमत्कार वाटतो । आग्नि मूलतः ज्याने निर्माण केला त्या परमात्म्याला चिमटा वापरण्याची देखिल गरज नाही । पण आमच्यासाठी तो चिमाट्याने अंगारा उचलतो हाताने नाही । सटका ही स्तम्भन शक्ति आग्नि ला स्तम्भन करणारे जल निर्माण करते । जो आग्नि निर्माण करतो तो जल ही निर्माण करतो । अगदी दररोज तो अग्नि आणि जल आमच्या देहात निर्माण प्रवाहित आणि स्तंभित करत असतो म्हणून तर आम्ही जिवंत आहोत । आमच्या शरीरातील आग्नि नाहीसा होता च शरिर थंड पड़ते । पण आम्ही तो अग्नि आमच्या शरीरात आला कोठून हे ओळखु शकत नाही । तो चिमटा जो आमच्या शरीरात अग्नि टाकतो तो दिसत नाही म्हणून तो दिसन्यासाठी तो सगुन रूप घेउन अवतरतो । त्याच्या अकारण कारुण्या मुळे । प्रत्येक चमत्कार हे त्यानेच निर्माण केलेले असतात । नव्हे आम्हाला ते चमत्कार भासतात । अम्बज्ञ। -- Sent from Fast notepad

No comments:

Post a Comment