Sunday 27 August 2023

" रेस न हाले समाधी "अध्याय 4 साईसच्चरित

  Ambadnya: #SSCD ADHYAY4 



अध्याय4 मध्ये "जग जागता -जया ये निद्रा , गोष्टी सांगे सतराशे साठ- मौनाची गाठ सोडेना , लेंडी वर आणि चावडीस जाती - आत्मस्थिती अखंड " ओवी 49 ते 53 , 
विरोधाभासी विधान दिसत आहेत । 
काय कारण असू शकते  ? आपले विचार लिहा ।

[] Sharadaveera : जरी इथे विरोधाभासी विधाने दिसत असली तरी,आपण एक लक्षात घेतले पाहिजे की खरे संत,खरे संत असतात ते कोणत्याही गोष्टीने विचलित होत नाहित,ते समाधी भंग न होवू देता नाच,गाणी  ऐकताना त्याचा आनंद घेवून डोलत असतात,जेव्हा सर्व  जग झोपते,तेव्हा  जगाच्या कल्याणार्थ  जागत असतात ते आचार विचार यांचे नियम न पाहताही ,एकाच जागी बसुन जगात काय चालले आहे हे जाणत असतात.त्यांचा दरबार सदैव भरलेला असुनही आपले मौन न सोडता ते भक्तांना एकाच वेळी तीनशे साठ गोष्टी सांगत असतात.मशिदीच्या भिंतीला टेकून जरी उभे असले तरी,सकाळी व दुपारी भिक्षेकरी गावात जात ,तसेच लेंडे बागेत किंवा चावडीवर जात असताना  सदगुरूची आत्मस्थिती अखंड  असते,या वरून असे कुठे की सदगुरूहे आत्मस्वरूप आहेत,त्यांच्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही.ते आपले सदगुरूतत्व सांभाळून  प्रत्येक  गोष्टीचा आनंद  घेवून भक्तांना शिकवण देतात की,किंतू परंतु,यश अपयश,सर्व  षड्रिपू चा त्याग करून ,आपले कार्य  करता करता आनंद  घेत रहा

अंबज्ञ  नाथसंविध 🙏🏻

[] Sharadaveera : जरी इथे विरोधाभासी विधाने दिसत असली तरी,आपण एक लक्षात घेतले पाहिजे की खरे संत,खरे सदगुरू असतात ते कोणत्याही गोष्टीने विचलित होत नाहित,ते समाधी भंग न होवू देता नाच,गाणी  ऐकताना त्याचा आनंद घेवून डोलत असतात,जेव्हा सर्व  जग झोपते,तेव्हा  जगाच्या कल्याणार्थ  जागत असतात ते आचार विचार यांचे नियम न पाळताही ,एकाच जागी बसुन जगात काय चालले आहे हे जाणत असतात.त्यांचा दरबार सदैव भरलेला असुनही आपले मौन न सोडता ते भक्तांना एकाच वेळी तीनशे साठ गोष्टी सांगत असतात.मशिदीच्या भिंतीला टेकून जरी उभे असले तरी,सकाळी व दुपारी भिक्षेकरीता गावात जात ,तसेच लेंडे बागेत किंवा चावडीवर जात असताना  सदगुरूची आत्मस्थिती अखंड  असते,या वरून असे कळते

 की सदगुरूहे आत्मस्वरूप आहेत,त्यांच्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही.ते आपले सदगुरूतत्व सांभाळून  प्रत्येक  गोष्टीचा आनंद  घेवून भक्तांना शिकवण देतात की,किंतू परंतु,यश अपयश,सर्व  षड्रिपू चा त्याग करून ,आपले कार्य  करता करता आनंद  घेत रहा

अंबज्ञ  नाथसंविध 🙏🏻

[] Dr : 

"रेस न हाले समाधी " 

अर्थात बाबा दत्तगुरु आणि आदिमातेच्या स्मरणात नित्य तल्लीन आणि आनंदित असतात की बाह्य घटना त्यांना हलवू शकत नाहीत । 

अंतरीचा जप नित्य चालत राहतो । 


आपण आजकाल म्हणतो "Grounded" किंवा म्हणतो "बैठक" .

आपल्या मनाची सद्गुरू आणि त्यांच्या शब्दांवर असणारी निष्ठा । 


तेवढी आत्मस्थिती अढळ । 


अंबज्ञ नाथसंविध ।।

[] Dr Jyotiveera : ।।हरि ॐ श्रीराम अंबज्ञ ।।

।। नाथसंविध् ।।

जनासवे चालेबोले.....साईबाबा भक्त मंडळींना गोष्टी रूपाने बोध करीत,व्यव्हाराच्या गोष्टी सांगत, ब्रम्हज्ञान, गीतेतील श्र्लोकाचे विवेचन करीत,सद्वृतीचे नियम सांगत ( फुकट घेऊ नका, निंदा करू नका, इ.इ.).भक्तांना उपदेश / अनुग्रह करीत......इ.इ.आपण बाबांच्या लीला श्रीसाईसच्चरितात वाचतो.

काय बाबांचे चमत्कार ।

किती वर्णू मी पामर ।।


जग जागता जया ये निद्रा....

बाबा काया जरी मानवाची ।

करणी अपूर्व देवाची ।

शिरडीत प्रत्यक्ष देव तो हाचि ।।

बाबांच्या लीला कृती अतर्क्य आहेत.विरोधाभासी विधाने असली तरी बाबांची करणी तेच जाणती । मानवी वृत्ती नाही ती ।।

परमपूज्य बापूंनी तुलसीपत्र मध्ये सांगितले होते.... दोन टोकांवरील व्यक्ती, परिस्थिती, गुण -दोष, सुख- दुःख,सद्गुण- दुर्गुण, पाप-पुण्य , ज्ञान-अज्ञान , भय-धैर्य ,आस्तिकता- नास्तिकता सर्व स्थितींमध्ये एकमेव त्रिविक्रमच सेतू बांधू शकतो.दुसरे कुणीही नाही.

जग निद्रेत असता बाबा जागे रहात ....

काय देवाची अतर्क्य लीला ।

कोण जाणेल याची कळा ।

अंत नाही याच्या खेळा ।

खेळूनि खेळा निराळा ......

परंतु भक्तांनी कधीही प्रेमाने विश्वासाने हाक मारली तरी ते सदैव तत्परच असतात.

मी माझिया भक्तांचा अंकिला ।

आहे पासीच उभा ठाकला ।

प्रेमाचा मी सदा भुकेला ।

हाक हाकेला देत असे ।।

सदैव अनिरुद्ध भक्तीभावचैतन्यामध्ये राहणे हा भगवंताशी शुद्ध व जीवंत नाते कायम राखण्याचा मार्ग आहे.(तुलसीपत्र)

विरोधी कृती  फक्त भगवंतच करू शकतो.जसे....वाण्याने तेल दिले नाही तेव्हा बाबांनी पाण्याने दिवे पेटविले.विरोधाभास वाटेल अशी बरीच उदाहरणे श्रीसाईसच्चरितात आपण पाहतो...जसे बिब्ब्याने डोळे बरे केले, भीमाजी पाटील ओलसर जागी भीमाबाईंच्या घरी बाबांनी रहाण्यास सांगितले म्हणून राहतात व त्यांचा क्षयरोग बरा होतो, बापूसाहेब बुट्टींना जुलाब होत असता बाबा त्यावर उपाय सांगतात की दूधामध्ये बदाम आक्रोड, पिस्ते घालून 

प्या...बाबांचा शब्दच औषध (शब्दांचा दरारा )व भक्तांनी विश्वासाने केलेले आज्ञापालन.

कळाच आमुची आहे न्यारी ।

ही एकच गोष्ट जीवीं धरीं ।

फार उपकारी होईल।।

भोळा भावचि सिद्धीस जाई ।


अल्ला नामाची जया मुद्रा.... बाबा सतत अल्ला मालिक म्हणत.. बाबांना भक्ती प्रिय...अल्ला-मालिक चैतन्यघन। यावीण चित्ता नाही चिंतन ।शांतनिरपेक्षसमदर्शन ।तयाचे मीपण ते कैचे।।(आत्मस्थित)

सर्व मार्गांमध्ये मज असे भक्ती प्रिय ।(१८ वचने)

मज जो गाई वाडेकोडे.......


गावकरी बाबांकडे रोहिल्याची तक्रार करायला येतात तेव्हा बाबा गावकऱ्यांना सांगतात त्याला सतावू नका. तो मज अतिप्रिय ....

मद्भक्ता यत्र गायंति ।

तिष्ठे तेथें मी उन्निद्र स्थिती ।

जयासी हरिनामाचा कंटाळा ।

बाबा भिती तयाच्या विटाळा ।।

परमपूज्य बापूंनी उपासना,ग्रंथ, मंत्रगजर इ.खूप खूप खजिना दिला आहे.मंत्रगजर कुठेही कधीही करू शकतो असे डॅडनी सांगितले आहे.

साईसाईति नामस्मरण ।

करील सकल कलीमलदहन ।।


बहुधा बसल्या ठायीचा न ढळे....

शिरडीत जरी वसतिस्थान ।

अलक्ष्य प्रस्थान कोठेंहि ।।

साई भरला स्थिरचरीं ।

साई सर्वांच्या आंतबाहेरी ।

साई तुम्हां-आम्हांभीतरीं ।

निरंतरी नांदतसे ।।

जरी चर्मचक्षुसी न दिसती ।

तरी ते तों सर्वत्र असती ।।

बाबा म्हणतात कुठेहि असा काहीहि करा....बाबांना सर्व त्याचक्षणी कळतेच.ह्यासंबंधी साईसच्चरितात  कथा आहेत....


साईबाबा नित्यक्रम नेमाने पाळत.धुनी पाशी बसणे,भिक्षेसाठी ५ ठिकाणी जाणे, लेंडीवर /मशिदीत जाणे.भक्तमंडळी कडून पूजाअर्चा,आरती तसेच गहन विषयांचे विवरण,उपदेश करीत भक्तांचे अज्ञान दूर करीत.

बाबा...असें मी भरलों सर्वांठायीं।मजवीण रिता ठाव नाही।कुठेंही कसाही प्रकटें पाहीं ।भावापायी भक्तांच्या।।

बाबा शिरडीत व भक्त कुठेही असला अगदी साता समुद्रा

 पलिकडे असला तरी बाबा त्या भक्ताच्या हाकेसरशी धावत जाती.बाबा जगाच्या उद्धारासाठी अवतरले.राग ,द्वेष ,असत्य,अहंकार,अभिमान, भेदभाव, शत्रू ,मित्र बाबांकडे अजिबात नाही. राव रंक सगळेच सारखे...

क्षमा,अकारण कारूण्य व लाभेवीण प्रेम..फक्त बाबाच देतात...

 सद्गुरू चरणी अनन्य शरण राहून  नामस्मरण ,मंत्रगजर करीत राहू.

एक विश्वास असावा पुरता।

कर्ता हर्ता गुरु ऐसा ।।


मला जसे समजले ते लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.

अंबज्ञ नाथसंविध्🙏

अंबज्ञ डॉ. ज्योतीविरा 

[] Saurabhsinh : दैवी तत्व हे विरोधाभासीच असत|


सर्व विरोधी तत्व समानपणे एकाच वेळेस धारण केली जातात|


जस रहाट खाली फिरवला की पोहरा वरवर येऊ लागतो|


तस देवाघरी उलटी खूण असते|


भक्त च ती जाणू शकतो|


बरेच लोक या उलटेपणाचा उलटा अर्थ लावतात आणि खर्या देवापासून दूर जातात|


ही सुद्धा त्याचीच योजना असते जी खोट्या लोकाना खर्या भक्तापासून नेहमीच दूर ठेवते|


म्हणूनच परिस्थिती कितीही विरोधी भासत असली तरीही त्याच परिस्थिति त आपण सुरक्षित राहू शकतो|


जस सोने चांदी पैसे चोराच्या उशीखालीत सर्वात सुरक्षित असतात कारण चोर तिथे शोधायला जात नाही तस भक्त प्रतिकूल परिस्थिति त अधिक सुरक्षित असतात|


म्हणूनच भक्ताच्या जीवनात सतत प्रतिकूल परिस्थिति असते ती त्याला त्रास देण्यासाठी नव्हे तर त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी|


हे सत्य जेव्हा उमगत तेव्हा सदगुरू ची खरी करुणा कळते|


त्याच खर प्रेम कळत|


सुचल ते लिहिल|🙏😊


अंबज्ञ

[] Mohiniveera : *अ.४ओव्या ४९ ते ५३.*


ह्या ओव्या, श्रद्धावानांनी भक्ती 

कशी करावी, हे बाबांच्या आचरणांतून

शिकावे ह्या उद्देशाने लिहिल्या गेल्या आहेत असे मला वाटते.


बाबा भक्तांमध्ये भक्तांबरोबर राहून,

मुरळ्यांचे नाच पाहात,गज्जल गाणे ऐकत.गोष्टी सांगत, उपदेश करत.तरीही *अल्ला मालिक* (शिवशक्ति)   हा जप त्यांच्या मुखी अखंड चालू असे.


साई स्वयें *द्वंद्वातीत* ।

कधी ना उद्विग्न वा उल्लसित।

सदैव निजस्वरूपी स्थित।

सदोदित सन्मात्र।४/६६


साई सदैव सुख -दु:ख, प्रेम- क्रोध,

राजा- रंक, श्रीमंत- गरीब ,मान -अपमान ह्या सर्व द्वंद्वापलिकडे असत.कारण ते मायेच्या पलीकडे म्हणजे मायामुक्त होते.ते मायेचा वापर करत असले तरी मायेच्या अधीन नव्हते.


ते सकाळ दुपार फिरून येत,कधी लेंडीवर तर कधी चावडीवर.बसल्या जागेवरून सर्व व्यवहार करीत.कधी

त्यांच्या दरबारात हास्य विनोद करीत,

उपदेश करीत पण हे सगळं करत असतानाही त्यांचं दत्तगुरुंशी अनुसंधान अखंड असे.त्यांचे दत्तगुरुंचे ध्यान कधीही सुटत नसे.दत्तगुरुचरणी

लागलेली *समाधि* कधी सुटत नसे.


*रेस न हाले समाधि*

👆

 सर्वलोकांच्या भल्यासाठी अखंड कार्यरत राहून सुद्धा त्यांचे *त्यांच्याच मूळ तत्त्वाशी,स्वस्वरूपाशी अखंड अनुसंधान असे*. 


*स्वस्वरूपी राहे दंग।*

बाबा स्वत:च्या मूळ (ब्रह्म परमात्मा)

ह्या रूपाशी अनुसंधान राखून आनंदात असत *कारण ते  मायातीत असल्यामुळे कशातही‌ गुंतत नव्हते*


*अखंड नामस्मरण* केल्याने आपल्या मूळतत्त्वाचे स्मरण राहते.


हे सर्व आपण बापूंच्या आचरणातून बापूंकडून शिकत आहोत.


 बापूंनी आम्हाला *ॐ ग्लौं अनिरुद्धाय नमः* हा जप अखंड करायला सांगितला आहे कारण आपण त्याचे अंश आहोत ह्याचे आम्हाला प्रत्येक सरत्या क्षणाला त्यांचे स्मरण राहावं म्हणून.


हा आपला सद्गुरु बापू, भक्ताच्या भूमिकेत राहून स्वतः

मोठ्या आईची व दत्तगुरुंची भक्ती

कशी करतो, अनुसंधान कसे राखतो ते आपण पाहतो.

 

बापू सांगतात, तुम्ही तुमची प्रापंचिक कर्तव्य करा, मौज-मजा करा पण *माझ्याकडे देव माझा पाहतो आहे* ह्याचे स्मरण सतत ठेवा.

आपण त्याचा अंश आहोत,त्याची बाळं आहोत  व ह्या नात्याने तो आपला मायबाप आहे ह्याचे स्मरण

ठेवण्यासाठी व त्याचे अनुसंधान राखण्यासाठी त्रिविक्रमाचा मंत्रगजर सतत करणे आपल्यासाठी गरजेचे आहे.


ह्या अध्यायांत काकासाहेब दिक्षीतांची

गोष्ट येते.


*मोठा पळपुट्या बरे तो विठ्ठल।*

*मेख मारूनही करी त्या अढळ।*

*दृष्टि चुकवूनि काढील पळ।*

*होता पळ  एक दुर्लक्ष।।*


इथे बाबांनी दिक्षीत काकांचे निमित्त करून आम्हाला बोध दिला आहे.की,

एक पळ जरी नामस्मरण थांबले तरी हा पळपुट्या दृष्टी चुकवून पळ काढेल.म्हणून त्याला मेख मारून अढळ करा.

ही भक्तीची मेख आहे.

भक्तिशिवाय तो हाती येत नाही.त्याला

अढळ करावयचा असेल तर भक्तमातेचाच पदर धरला पाहिजे.निष्ठा अढळ पाहिजे.

*आपुला बाप तो आपुला बाप.*

त्याचे चरण घट्ट पकडून ठेवायचे.


भक्ती वाढवून,निष्ठा बळकट करून, परमात्म्यावर  प्रेम करून,त्याला  प्रेमाच्या धाग्यांत  गुंतवून, अढळ

करण्यासाठी नामस्मरण हाच एक मार्ग

आहे. म्हणून बाबा आपल्याला ते कृतीतून शिकवत आहेत.

No comments:

Post a Comment