Friday 20 November 2020

Adhyay 35, BALA NEVASKAR VRAT (Group Discussion)

 [01/10, 4:43 pm] Dr Nishikant  Vibhute: #SSCD ADHYAY 35 

दर वर्षी बाळा नेवासकर शेतात धान्य पिकल्यावर कोणते व्रत चालवत असे ? 

त्या मागे त्यांचा काय भाव असावा ?

[01/10, 6:13 pm] Sharadaveera Padwale: दर वर्षी  बाळा  नेवासकर शेतात धान्य पिकल्यावर ते धान्य आधी  बाबांच्या  चरणी  आणून  ठेवण्याचे व्रत चालवत  असत. आणि  त्यातून  बाबा  जे काही  देत त्या  वर आनंदाने  वर्ष भर गुजराण करत.                             इथे  नेवासकर  यांच्या  कडून  सर्वात महत्वाची गोष्ट  शिकायची  आहे, ती म्हणजे  प्रेमभाव.....भक्ती.....सेवा .......      हे सर्व  करतानाचा भाव  कसा हवा याचे उत्तम  उदाहरण  म्हणजे  नेवासकर. नेवासकरांचा भाव  असा होता  की,जे काही  मी माझ्या  शेतात पिकवले आहे, ते आधी  साईनाथांचे,कारण  त्यांच्याच कृपेने हे पिकलेले  आहे.            इथे  आद्द्य पिपा दादांच्या अभंगातील  ओळी आठवल्या           "माझे तरी  काय असे सर्व  तुझेच रे देवा I                              तुला  तुझे देतानाही  मीच  होय तुझा II                                          हे सर्व  तुझेच आहे  आणि  तुझ्या  ईच्छेने त्यातले जे काही  देशील,तेच फक्त  मी घेणार.माझे स्वामी कशावरही नाही. अगदी  स्वतःवरच नाही. माझे काहीही नाही.  माझ्या सह जे सर्व  काही  आहे, ते  फक्त  साईनाथांचे आहे,हा उद्दात्त भाव.इथे  नेवासकरांचा  साईनाथाय चरणी  एकनिष्ठतेचा भाव आहे.                   "बापू  पायी ठेवू एकविधा भाव "         साईनाथा सव॔  काही  तुमचेच आहे, हे केवळ  तोंडाने  बोलणे वेगळे  आणि  काहीही न बोलता  साईचरणी  अर्पण  करणे  वेगळे. नेवासकरांच्या  प्रत्येक  कृतीतून  त्यांची साईचरणी असणारी अनन्य निष्ठा दिसुन  येते.                  आद्य पिपा  दातांच्या "मोगर्याचा गंध" या अभंगातील  तिसर्या  काव्यातील या ओळीतून नेवासकरांची आठवण  येते        "धन,तन,मन, वाहतो तुझिया  चरणी I                                         प्रसाद म्हणून तुमची जे द्यावे II         या ओळीतून आद्य  पिपा  दादा थोर साईनाथाय भक्त  नेवासकरांचा भाव  आम्हा श्रद्धावानानां सांगतात                   "ते न त्यक्तेन  भुज्जीया"                 आणि  हाच भाव आम्ही  पण ठेवायला  हवा.                              फक्त  तो एकच माझ्या सह सर्व  काही  त्याचेच                                    अंबज्ञ  शारदावीरा पडवळे 🙏🙏

[01/10, 6:52 pm] Seemaveera Karkhanis: अध्याय ३५ मधेआपण साधारण १७५ ओवी पण सून पुढे नेवासकर या बाबांच्या भक्ताबद्दल  समजून घेऊ शकतो. ते बाबांची खूप भक्ति करत, सेवा करत अगदी बाबांना दगड लागू नये म्हणून रस्ता झाडणे वगैरे काम करीत. काही जणांच म्हणण अस की भक्ती म्हणजे म्हातारपणी करावी. पण जर शिक्षण. अर्थार्जन, संसार, मनोरंजन हे तरूणपणी करायच मग भक्तिच म्हातारपणी का? हे बरोबर नाही हे आपण बापुंच्या प्रवचनातून पण ऐकलय.आपला सगळ जर तो परमेश्वर करत असतो तर आपण हात पाय थकल्यावर त्याची भक्ती करण बरोबर नाही हे नेवासकर पुर्णपणे जाणून होते, त्या मुळे त्यांना बाबा हे. सर्वस्व होतेते शेतात पिकलेल सगळ धान्य ते बाबांकडे आणून ठेवित त्यातुन बाबा देतिल तेवढच घरी नेत.

आपल्या परमेश्वराच्या हातातून मिळालेली कुठलाही गोष्ट कधिच कमी पडणार नाही हा विश्वास. होता. "एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरू ऐसा" हा दृढ भाव त्यांच्या मनात होता, म्हणूनच त्यांच्या श्राध्दाला जेवण कमी पडतोय की काय हा विचार सुनेच्या मनात आला तेव्हा नेवासकरांच्या मिसेस यांनी जेवणात उदी टाकली उदी म्हणजे ऊर्ध्व दिशा बाबा नेहेमी उचित काय तेच सांगत उचित दिशाच दाखवत हे नेवासकरांच्या बायकोला माहीत होते कितीही माणस जेवली तरी अन्न कमी पडणार नाही कारण ते बाबांच्या घरच आहे.

[01/10, 7:34 pm] Sharadaveera Padwale: इथे  अजून  एक सांगावेसे  वाटते, ते म्हणजे  आम्ही  नेहमी  मला  जे आवडते तेच करत असतो, पण आम्ही  नेवासकरां प्रमाणे  माझ्या  सदगुरूना  काय आवडते  हे जाणून  वागलो तर आमचे जीवन  खूप  सुंदर होईल. माझा भाव  कसा असला पाहिजे तर "दुजा परमार्थ  मजसी  न उमगे I तुला  आवडते तेचि  मी करावे II                           नेवासकरांचा  भाव असा  होता  की "जे जे मज साठी  उचित Iतेचि  तू देशील  खचितII                हे मात्र मी नक्की  जाणित I नाही  तकरार  राघवा II                             हाच नेवासकरांचा  भाव  आमच्या  मध्ये  सुद्धा  येवू  दे  हीच साईनाथा चरणी  याचना 🙏🙏

[01/10, 9:58 pm] Seemaveera Karkhanis: नेवासकर ने म्हणजे घेऊन जा वास कर म्हणजे वस्ती कर बाबांनी भू मातेच्या म्हणजे शेतातिल जमिनीच्या माध्यमातून धान्य घेऊन जा आणी ते मशिदीत  वस्ति करू दे असा इशारा तर नसेल दिला ना? (अस आपण म्हणू शकतो का?) नावातच सगळ कही आहे जसे म्हाळसापतिंनी आवो साई म्हंटल

सा=साक्षात ई=ईश्वर

[01/10, 11:28 pm] Mohiniveera Kurhekar: काया वाचा मन चित्त।

साईपदी जो समर्पित।

ऐसा जो साईंचा अनन्य भक्त।

आवडे अत्यंत साईस।

बाळा नेवासकर म्हणजे संपूर्ण समर्पित भक्त.

त्यांनी बाबांना काया- वाचा- चित्त- वित्ताची भिक्षा अर्पण केली.

*काया अर्पण*                     बाबांच्या येण्याजाण्याचे

रस्ते झाडणे.

*वाचा अर्पण*

मुखात सदैव बाबांचे नाम 

*चित्त अर्पण*

मनांत सदैव बाबाच.बाबांपासून एकही क्षण त्यांचे मन विभक्त झाले नाही.

*वित्त अर्पण*

केवळ धन नव्हे.धर्मानुसार, न्यायनीतीच्या मार्गाने ,पुरुषार्थ करुन

जे कमावले ते वित्त, त्यानी बाबांना 

अर्पण केले.

त्यांचा भाव असा होता की,

बाबा हा देह तुम्ही दिलेला आहे.

वाचा तुम्हीच दिलेली आहे.

माझे मनही तुमचेच आहे.

व मी जे न्यायाने कमावले त्यासाठी

सामर्थ्य तुम्हीच दिले आहे.

सर्व तुमचेच आहे.इदं न मम.

जया मनीं जैसा भाव ।

तया अनुभवही तैसाच।श्री.सा.स.च.३५/१९६.

[02/10, 12:11 am] Rohitsinh Pimpale AK: अत्यंत बरोबर...   म्हणून आद्य पिपा विरचित अनिरुद्ध चलीसे मध्ये ओळ  येतेना.    *तन मन धन सेवा द्रीढ नेमा* तेच इथं काया वाचा मन चित्त.  ...    वाचा म्हणजे वाक अर्थात बुद्धी आणि चित्त म्हणजे उत्क्रांतीत मन...  मानवासाठी हेच खरं धन आहे..    नेवासकर हे असेच साई प्रेमात डुंबून गेलेले सच्चे श्रद्धावान..

[03/10, 5:11 pm] Dr Nishikant  Vibhute: #sscd 35 


बाळा नेवासकर , हे नेवासा या गावचे एक श्रद्धावान होते । त्यांचे व्रत , दर वर्षी पिकाची सवंगणी झाल्यावर , सर्व धान्य साईनाथांच्या समोर मशिदीत रचणे , आणि त्यातून बाबा जे धान्य देतील तेवढेच स्वतःसोबत घरी घेऊन जाणे आणि त्यावर पुढील संपूर्ण वर्ष काढणे । 

भयंकर अवघड असे हे व्रत , बाळा यांच्या संपूर्ण समर्पणाचे प्रतीक । 


माझे तरी काय असे ....सर्व तुझेची रे देवा .... 


हा त्यांचा भाव होता । 


(भारतीय भाषा संगम मध्ये बापू एकदा म्हणाले ) 


एके वर्षी बाबांनी फक्त एक मूढ धान्य दिले । 


नेवासकरांनी एक वर्ष फक्त फळे आणि पाणी ह्यांवर काढले । 


जिथे बाबांच्या आंघोळीचे आणि हेच आमच्यासाठी तीर्थ हा भाव , बाळा नेवास्करांकडे होता तिथे , 


*तू आणि मी मिळून शक्य नाही 

असे ह्या जगात काहीच नाही* 


हे सदगुरु कृपेने शक्य होते । 



अंबज्ञ

नाथसंविध

No comments:

Post a Comment