Friday 20 November 2020

Adhyay 33 Horses as God's blessings , Udi , for Nanasaheb Chandorkar and Ramgeer Bua ( Group Discussion)

 [10/07, 4:45 pm] Dr Nishikant  Vibhute: #SSCD 33 

भाड्याचे घोडे :- 

भाडे देऊन घेतलेले म्हणजे तात्पुरते कोणाकडून तरी आणलेले आणि त्या बद्दल त्या मालकास मोबदला देणे । 


घोडे म्हणजे परमात्म्याची कृपा हे आपण सौदागराच्या कथेत वाचले आहे । 


घोडा प्रतीक आहे । गतीचे । 

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचे । 

जी जिमदारी बाबांनी घेतली होती ती त्यांनी पूर्ण केली ।


त्या रामगीर श्रद्धावानाला वाहन बनवून उदी आणि आरती योग्य ठिकाणी पोहनचवली ।


आर्त भावनेने हाक घालणाऱ्या श्राद्धावानाकडे पोहचवले । 


इथे घोडा शिपाई टांगा सर्वच 

उदीचे कार्य करीत आहेत।


उदी म्हणजे परमात्म्यापासून श्रद्धावानापर्यंत होणारा कृपेचा प्रवास । 

घोडे भाड्याचे अर्थात लौकिक नियमांनी बांधील नव्हते आणि ते गुरू वचनावर आरूढ होणाऱ्या भक्तांसाठी धावत होते ।


बाबांना ज्यांनी बाबा पिता म्हणून मानले त्यांच्यासाठी धावत होते ।


म्हणजे ते आपल्याच मालकीचे 

आपले एकमेव आप्त होते । 


म्हणून हेमाडपंत त्यांना ते भाड्याचे नव्हते असे सांगतात ।


अंबज्ञ

[10/07, 4:46 pm] Supriyaveera More: बापूंच्या मित्राच्या वडिलांना hospitalise करायचे होते...

तेव्हा मित्राची वाट न पाहता...

बापूंनी सुद्धा अशा वेगात car चालवली होती की...

 एक तासाचे अंतर...

बापूंनी १० मिनिटात cover kele hote...

Driver hota pan तरीही... सदगुरू बापूंनी स्वतः ड्रायव्हिंग केले होते...

 मुंबई च्या traffic madhun suddha १० मिनिटात गाडी हॉस्पिटल स्थळी घेऊन गेले होते...

त्यांच्या मित्राच्या वडिलांचे प्राण वाचले...

सद्गुरू माऊली...

आपल्या लेकरासाठी कितीही वेगवान होऊ शकते...

आपण *१* पाऊल चालावे...

*तो* *९९* पाऊले आपल्यासाठी धावतो...

[10/07, 4:47 pm] Dr Nishikant  Vibhute: बापूंनी सांगितले होते की नानासाहेब सर्वांना आपल्या जवळील उदी निस्वार्थ पणे देत असत म्हणून त्यांच्याकडे उदी शिल्लक राहिली नव्हती । 


अशा भक्तासाठी बाबा सर्व लीला घडवून आणतात । 


आणि श्रद्धा भक्ती आणखी वाढवतात ।

[10/07, 5:40 pm] Suneetaveera Karande: ह्याच नानासाहेबांनी दुसऱ्या भक्ताच्या संकट समयी साईनाथांचे नाव घेऊन मातीची उदी झालेली कथा आपण वाचतो. पण नानांनी आपली उदी संपली म्हणून तसा वापर केला नाही. हा विवेक खूप महत्त्वाचा आणि म्हणूनच साईनाथ स्वतः धाव घेतात. जेथे सद्गुरू माऊली स्वत: हस्तक्षेप करत आहे तेथे भाड्याचा प्रश्नच उद्भवत नाही. टांगा घोडे सारी गुरुमाऊली ची लीला !!!

[10/07, 6:16 pm] Bakulveera Merchant: हरिओम,घोडे हे ईश्वरी कृपेचे प्रतिक म्हणून साईंचरित्रात आलेले आपण पाहतो.घोडे हाकणारा सारथी आणि त्याचे घोडे नेहमी तयारच असतात भक्ताच्या साहाय्यासाठी धावण्यासाठी. तसाच सदगुरू आणि त्याची कृपा ही अनंत,अविरत आणि अनिरुध्द बरसण्यासाठी तत्पर असतेच.प्रश्न असतो माझ्या विश्वासपूर्ण आर्ततेने त्याला साद घालण्याचा.भक्ताच्या या हाकेच्या ताकदीने तो हाक देतोच,त्याची कृपा भक्ताच संकट रक्षण होण्यासाठी वाहू,धावू आणि बरसू लागतेच तीच ती वेळ साधण्यासाठी दिशा,वेग,अंतर यांना वाकवण्याची लीला करत.महान शास्त्रज्ञ टेसला यांच्या प्रयोग संदर्भात बापूंनी साई चरित्रातील या कथेचा उल्लेख केला होता.विश्वाचे नियम निर्माण करणाऱ्या जगदंबेचे सारे अल्गोरिदम हा त्रिविक्रम जाणतोच आणि हवे तेंव्हा ते वापरुही शकतो त्याच्या भक्तावरील अकारण कारूण्याने.सामान्य मानव फक्त ज्ञात वैज्ञानिक नियम जाणतो पण साऱ्या अज्ञातातिल नियम,ते वापरण्याची क्षमता फक्त जगदंबा पुत्राकडेच असते.आणि आपल्या श्रद्धावान भक्ताचा विश्वास आणि अनन्यता यांनीच हरला जाणारा हा सदगुरू त्याचे संकटमोचक कार्य सिद्धीस नेतोच,कोणत्याही मार्गाने असेल,ते मार्ग फक्त त्रि नाथच जाणोत.पण भक्त जाणतो एकच_

एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु एेसा!

आणि हा सदगुरू सुद्धा एकच जाणतो_

मी माझिया भक्तांचा अंकिला,आहे पासीच उभा ठाकिला,प्रेमाचा मी सदा भुकेला,हाक हाकेला देतसे!

मग त्याला कोणताच अडथळा नसतो,ना भक्ताच्या ऐहिक स्थितीचा ना भक्ताच्या अंतराचा.तो धावून येतोच आपल्यावर प्रेम करणाऱ्यासाठी.

या कथेत नानासाहेब जे नेहमी सर्वांना साईची उदी देवून त्यांचे संकट हरण होण्यात सहाय्य करतात त्यांच्या स्वतः कडे मात्र मुलीच्या कठीण प्रसंगात तिला लावायला,चाखायला द्यायला उदी नाही .कदाचित घरात अजिबात उदी नाही हे तेही जाणत नसतील पण बाबांना ते माहीत आहे .बाबा हेही जाणतात की एरव्ही दुसऱ्यास बाबांचं नाव घेवून लावलेल्या मातीचा उदिस्वरुपात परिणाम साधणारे नाना स्वतः च्या बाबतीत कठीण प्रसंग येवुनही असं कधीच वागणार नाहीत.अशा परिस्थितीत मनापासून नाना एकच भाव धरून बसले असतील_

सांभाळ आपुली ही भाक! 

आणि आपली भाक साईनाथ सांभाळतो च .

कर्तृम,अकर्तृ्म,अन्यथा कर्तृ्म या आपल्या तत्वाने हा त्रिविक्रम आपली चाल चालतोच.

या कथेत साई स्वतः कर्ता बनून उदी आणि आरती रामगिर बुवांना देतात.

अकत्रृम बनून घोडगाडीचा गाडीवान बनतात आणि अन्यथा कर्तुम बनत रामगिर बुवा करवी हे कार्य करवून घेतात.

रामगिर बुवांना त्यांनी आपलं ऐकलं म्हणून पेढे आणि आंब्याचा कृपा प्रसाद खावू घालत त्यांचाही प्रवास सुखाचा होण्याची प्रेमाने काळजी घेतात.

कारण इथे मोजमाप,व्यवहार,उसनवारी आणि भाडे देण्याघेण्याची गोष्टच नाही.त्याची कृपा सदैव आहेच फक्त ती ग्रहण करण्यासाठी भक्तविश्वास आणि भक्तप्रेम हवं.

हे पाय आमुच्या सत्तेचे असं बापूंच्या पणजी द्वारकामाई म्हणतात ते याच प्रेमाने आणि विश्वासाने.आणि ही भक्ती पुरुषार्थ करून कमावलेली ,कायम मालकीची असणारी खूप मोठी संपत्ती आहे,तिथे भाड्याचे काय काम? जर साईनाथ तुमच्याकडून कायमचा बांधला जायला तयार आहे मग त्याच्या कृपेचे घोडे तुमच्यासाठी अमर्याद गतीने धावणारच.कधी,कोणती आणि कशी कळ दाबायची हे मात्र तोच नक्कीच जाणतो हा विश्वास फक्त हवा आणि सांभाळ आपुली ही भाक ही आर्ततेने आलेली हाक हवी.

म्हणूनच बाबा या कथेत नानांच्या हाकेचा प्रतिध्वनी म्हणून आरती आणि बाबांच्या कार्यशक्ती च रूप म्हणून उदी पाठवतात आणि नेमकी अचूक वेळ साधत ही आरती आणि उदी पोचते.भक्ताच्या हाकेला प्रसाद आणि प्रतिसाद मिळतो.साईनाथ भक्ताचा योगक्षेम वाहाण्याची आपली भाक सांभाळतात कर्ता हर्ता गुरु बनून.

अंबज्ञ नाथसंविध!

बकुलवीरा मर्चंट.

[10/07, 7:45 pm] Mohiniveera Kurhekar: भाड्याने आपण आपण वस्तू घेतो व देतो म्हणजे नक्की काय घडत असते?

मूळ प्रश्न -ते काय होते भाड्याचे थोडेच ?असे हेमाडपंत कां

 म्हणतात?

हरिसे कोई नही बडा़ ।

दिवाने क्यूँ गफलतमें पडा।

मनुष्य बुद्धीने कितीही श्रेष्ठ झाला,तरीदेखील तो पूर्णपणे कुठलीही नवीन वस्तु पदार्थ व जीव स्वतंत्ररित्या निर्माण करु शकत नाही.

कारण मानवाला एक तथाकथित नवीन गोष्ट बनविण्यासाठी काही साहित्य लागतेच.व ते काही त्याने बनवलेले नसते.अगदी सैतानसुद्धा अर्थात् वृत्रासूर व महिषासुरसुद्धा स्वतःहून नवीन काहीच उत्पन्न करू शकत नाहीत.त्यांनासुद्धा परमात्म्याने निर्माण केलेल्या वस्तूंचे ,पदार्थांचे व मातृकांचे (अक्षरे) व शब्दसमूहाचे आश्रय घ्यावे लागतात.परंतु केवळ चण्डिका व तिचा पुत्र सद्गुरुच कुठलीही नवनिर्मिती (केवळ)त्यांच्या संकल्पातूनच करू शकतात.संदर्भ प्रत्यक्ष तुलसीपत्र dt.4/9/2014

प्रत्येकजण त्रिविक्रमातच आहे .

संदर्भ ---प्रत्यक्ष (तुलसीपत्र)1634

बापूगिरांसाठी आणलेला टांगा ,घोडे,फराळ,टांगेवाला, ह्या सर्व गोष्टी साई त्रिविक्रमाने द्वारकमाईत बसून संकल्प केल्यानेच निर्माण झाल्या.रामु सत्यसंकल्प प्रभु सभा कालबस तोरि।सुंदरकांड

संदर्भ तुलसीपत्र 1633--

कांचनवरम्याच्या घोडागाडीत प्रत्येक टप्प्यावर माणसे बसतात.प्रथम 5 वृद्ध 

नंतर 5 वृद्ध स्त्रिया मग धनदास नंतरही पुजारी ,त्याची कन्या माधुरी ,त्याचे बालमित्र त्याचे आप्त,त्याची बायको, राजा नरोत्तम , अशी बरीच माणसे बसली तरी घोडे दोनच होते. परंतु कितीही मोठे वजन ओढू शकत होते.

संदर्भ तुलसीपत्र 1636 --

आपल्या भक्ताचे हित वाहण्यासाठी स्वयंभगवान ,नील व नल ह्यांची असंख्य रुपेसुद्धा एकाच वेळेस कार्यरत करू शकतोव ते सुद्धा अशा रीतीने की ,एकीकडची गोष्ट दुसरीकडे कधीच समजणार नाही.

पण हे कधी घडू शकते--जेव्हा श्रद्धावान भक्तिभाव चैतन्यात राहताना अहंकार व मोह सोडून देऊन डुंबत राहतो तेव्हाच .

नानांकडे उदी संपली होती.तेव्हा ते शांतपणे रिकामी डबी त्यांच्या मुलीच्या डोक्याला लावतात व सांगतात,आई आई म्हणून ओरडू नकोस प्रत्येक कळांबरोबर बाबा बाबा हाक मार.बाबा नक्की धावून येणार.खरा भक्त संकट कधी संपेल ह्याची वाट तो बघतच नाही.कारण त्याची खात्री असते.की,ते संकट संपणारच आहे.

कारण त्याच्याकडे प्रतीक्षा हा गुण असतो.तुलसीपत्र 1554---प्रतीक्षा म्हणजे निष्ठा व सबुरी.

नानासाहेबांकडे विवेक,

 वैराग्य,अनन्यता ह्यांच्याबरोबर प्रतीक्षा हा गुणही होता.म्हणून त्यांना बाबांचा प्रसादही मिळाला व प्रतिसादही.हेमाडपंत जाणत होते की ते घोडे भाड्याचे नव्हते.त्यांच्या प्रश्नातच उत्तर आहे असे मला वाटते.

Mohiniveera Kurhekar.


[11/07, 1:10 pm] Bhausahebsinh Titme: *ते काय होते भाड्याचे थोडे !*

पंचमुख हनुमंत कवच अग्रलेख मालिकेत बापुंनी भगवानहयग्रिवांच व त्यांच्या वेगाचं वर्णन केले आहे .  हा अंनत नावे रुपे असलेला *साई त्रिविक्रम* व्दारकामाईत बसुन आपल्या

 भक्ताचे संकट निवारण्यासाठी 

भगवान् हयग्रिवरुप घेऊन धावत होता. म्हनून *हेमाडपंत*  घोड्यांच्या बद्दल वर्णन करताना *ते काय होते भाड्याचे थोडे* असे वर्णन करतात.

*अंबज्ञ*

[11/07, 1:27 pm] Sonaliveera Bellubi: हरी ओम. *तो हाक न मारताही येतोच* याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. *त्याची इच्छा imp*


मी भक्ती करतो सेवा करतो आणि मला काय हवं ते सद्गुरू चरणी मागत राहतो. बापूने हेच पितृवचन मध्ये सांगितलं की, *जे तुमच्या साठी अनुचित असेल ते तो तुम्हाला देत नाही आणि जे उचित असेल ते उचित वेळी तो देत असतो.*


इथे या कथेत आपण पाहू शकतो की, नानासाहेब चांदोरकर यांची कन्या प्रसूती वेदनेत आहे आणि त्यांनी बाबांना या साठी पत्र पाठवलेले नाही. मग हे बाबांना समजलं कस?


बाबांनी एवढ्या सगळ्या गोष्टी पटापट घडवल्या. रामगिर बुवांना उदी आणि आरती घेऊन चांदोरकर यांच्या घरी देऊन यायला आज्ञा करतात बाबा. 


बघताना कसे दिसते की, रामगिर यांचे गाव चांदोरकरांच्या गावाच्या जवळून लागते आणि बाबांनी या साठी त्यांना संगितले की जाता जाता तेवढं उदी आरती देऊन पुढे जा. पण खरंच तस आहे का?


सद्गुरू तत्व सदैव जागृत अवस्थेत असते. जशी माऊली बाळा साठी गरजेप्रमाणे झटत असते अगदी तसेच किंबहुना त्याहूनि जास्ती सद्गुरू लेकरांसाठी धावत असतो. 


*माझा चालता, बोलता धावता साई🙏🏻💐*


*No msg, no phone call and nothing any information but sai is there. Because sai is everywhere.* 


*याच उत्तर एकच.* 

*चांदोरकर सतत साईंचे करत असलेले नाम स्मरण.*


आपला भक्त अडचणीत आल्यावर त्या साई माउलीला तरी चैन पडेल का हो!!


भौतिक दृष्टया जरी साई मशिदी मध्ये दिसत असला तरी त्या रामगिर सोबत *साई उदी व आरती चा वाहक आणि चालक बनुनू कधीच बाहेर पडला होता*. 


तिथे पसुती वेदनेने तळमळणारी मुलगी, कन्येच्या काळजीने चांदोरकरांच्या जीवाची होणारी घालमेल आणि इकडे *दोन घोड्यांच्या टांग्यावर आरूढ झालेला साईनाथ🙏*


*एक पूर्ण रात्र त्या माझ्या साईनाथांनी चालवलेला टांगा* आणि रामगिर च्या हस्ते पाठवलेली *उदी आणि आरती*


साई येऊ शकला असता ना उदी घेऊन पण त्याने ते कार्य एका श्रद्धावाना कडून करून घेतलं कारण तो आहेच तसा. 

*भक्त कल्याणाचे काम झाले की तो एक क्षणभरही तिथे थांबत नाही.*


*उदी साई आज्ञानुसार मुलीला पाण्यात घालून पाजली आरती म्हणले आणि काही वेळात सुखरूप प्रसूती झाली.*


*किती हे त्याचे अकारण कारुण्य*


*न लगे यास बोकड कोंबडा*

*न लगे यास टका दोकडा*

*एक भावाचा भुकेला*

*हाक हाकेला देतसे*


*माझी साई माऊली नटनाटकी आहे* तिला भक्तकल्याना शिवाय दुसरं काही दिसतच नाही.


रामगिर कडे raiway तुन उतरल्यावर चांदोरकरांकडे जायला पैसे कमी पडतात तर हा तात्काळ हजर. *मला चांदोरकरांनी पाठवलंय*.


कुठलं काय!! 


*सगळी याचीच लीला*

*यांनीच रचलेली*


मी नव्हता पाठवला टांगा. 


*तो आला नामावर आरूढ होऊन.*


*एक विश्वास असावा पुरता*

*कर्ता हर्ता गुरू ऐसा*


*हे फक्त बोलण्या पुरते नाही हो!*

*हे खरोखर जगलेत आपले साईभक्त*


अस म्हणतात की घोडा अर्थात Horse power अर्थात खूप जास्त ताकद असते घोड्याच्या धावण्यात.

पूर्वी च्या काळी राजे युद्धात घोड्यांचा वापर करायचे.


सर्वात शक्तिशाली घोडे फार वेगात धावू शकतात. या साठी साईंनी धोडे वापरून भरधाव धाव  घेतली आपल्या भक्ताचे संकट निवारण करण्यासाठी. 


हा साई अनिरुद्ध क्षणार्धात कुठेही पोहचू शकतो आणि तो पोहोचतोच आवश्यकता असते ती आपला त्याच्या वरील विश्वास ठाम असण्याची आणि दृढ सबुरी असण्याची जशी चांदोरकर यांची होती.


ते इतक्या बिकट प्रसंगातही साई वर चिडताना दिसत नाहीत की, इतकी भक्ती केली पण अस झालं. अजिबात नाही.


उलट त्यांचा साई चरणांवरील विश्वास तसाच दृढ असतो व नाम स्मरण सतत सुरू असते म्हणून साईंनी त्यांना संकटमुक्त केले आणि त्यांना आणि पूर्ण कुटुंबाला आनंदित केले. 


उदी म्हणजे उचित दिशा आणि अडकरांनी लिहिलेली आरती अर्थात *प्रसूतीत अडलेल्या मुलीला उचित दिशा अर्थात अर्थात सोपी डिलिव्हरी करण्यासाठी *सा* क्षात *ई* श्वर धावला.


असेच आपला *साई* आपले जीवन  नाम स्मरणाने सोपे करत असतो. 


*।।सोडुनिया लाख चतुराई*

*स्मरा निरंतर साई साई*

*बेडा पार होईल पाही*

*संदेह मनी न धरावा।।*


जस साईंनी लिहुन घेतलं तसं

अंबज्ञ नाथसंविध् 🙏🏻श्रीराम

सोनालीवीरा


[11/07, 10:12 pm] Chhayaveera Janardan Burungule: उदि=   सद्गुरुचा आपल्या भक्तासाठी उचित तेच देण्यासाठी उचित दिशेने केलेला प्रवास

जे जे मजसाठी उचित 

तेचि तू देशिल खचित


तांगा=  मन आणि बुध्दीच्याही पुढे धावणार्या (हनुमंत गतिने)

दोन घोड्यांचा तांगा

(निघती ईतर तांग्याच्या पुढे)


रामगीरबुवा= प्रत्यक्ष राम(स्वत:साईराम)


अडकर क्रुत आरती= प्रसुती मध्ये अडलेल्या मुलिसाठी (अडसर दुर करणारी)आवश्यक आरती

🙏🏼🙏🏼

[12/07, 10:59 am] Roopaliveera Higishte: हरि ओम!!!

  

*ते काय होते भाड्याचे थोडे* असे हेमाडपंत का म्हणतात?

    प्रश्नातच उत्तर लपलेले असते,असे बापू म्हणाले होते.

या प्रश्नाच्या उद्गारातच *नाही* हा शब्द अध्याहृत आहे. ते *स्वमालकीचे* आहेत. कोणाच्या? तर तांगेवालाच्या.

    या प्रश्ना आधी एक ओवी येते.

*शिपाई दिसला मोठा चतुर।दाढी मिशा कल्लेदार।नीट नेटस ल्यालेला इजार। तांगाही सुंदर देखिला।।33/94।*

 

ही ओवी टांगेवाला शिपाई कसा आहे याचे वर्णन करते.

  शिपाई मोठा चतुर, दाढी मिशा कल्लेदार, नीट नेटस विजार घातली आहे, ( *भरघोस मिशा, धिप्पाड उंच हा सार्वभौम राजा* ) .टांगही सुंदर आहे नी मग पुढील ओवीत हेमाडपंत सांगतात *जैसा टांगा तैसेंच घोडे। ते काय होते भाड्याचे थोडे?* 

    म्हणजेच काय टांगेवाला शिपाई रुबाबदार, त्याचा टांगाही सुंदर न त्याप्रमाणे घोडेही सुंदर.!!स्वतःसाठी काहीही घेताना निवड करून चांगले, उत्कृष्ट असेच घेणार.कारण ते त्याला स्वतःसाठी हवे असते.ते त्याचे होते मालकीचे, व  स्वमालिकीच्याच गोष्टींची निगा राखली जाते, काळजी घेतली जाते, व ती कधी भाड्याने दुसऱ्याला दिली जात नाही. न जर ते वाहन असेल,व उदरनिर्वाहासाठी वापरायचे असेल तर तो स्वतः चालवतो व त्याची यथा योग्य निगा राखतो.

      *एकोस्मि बहुस्यांम* या एका संकल्पमात्रे ज्याने विश्व निर्माण केले, तो काहीही निर्माण करू शकतो.

       साई सचारित्र या ग्रंथातील 33व्या अध्यायात ही कथा येते.

लौकिक दृष्ट्या हे चरित्र हेमाडपंतांनी लिहिले असले तरी, *माझी कथा मीच करावी* हे साईंचे प्रत्यक्ष उद्गार ही हेमाडपंतांनी लिहिले आहेत. इतरेतर जीव *मी कोण* जाणू शकत नाही म्हणून देवांनी मानव निर्माण केला, त्याने तरी जाणावे *मी कोण* व  84 लक्ष योनीनंतर सुदैवाने प्राप्त झालेल्या नरदेहाचे सार्थक करावे म्हणून त्याला बुद्धी व विचार स्वातंत्र दिले.

      साईचारितातील भक्तांच्या आचरणातून बोध घेऊन स्वतःचा विकास साधावा हा हेतूनेच या अपौरुषेय ग्रंथाची रचना झाली.

     चांदोरकर हे असेच एक आदर्श भक्त की जे मला मार्गदर्शक आहेत. श्रद्धा-सबुरी-निष्ठा-अनन्यता याचे प्रतीक. साईनाथांच्या विश्वासाने मित्राच्या मुलींसाठी पायाखालची माती उदी म्हणून स्वपत्नीच्या भाळी लावतात. आणि उदी आपले कार्य करते. काय जबरदस्त विश्वास. भक्तीच्या शक्तीने काळ न दिशा वाकली जाते का तर अनन्यता,प्रेम, निष्ठा, विश्वास मग तेथे *विठ्ठल हारी* होतो. मग अशा भक्तासाठी हाक न मारताच धाव घेतो.

      भक्तांच्या घरी श्रीखंड्या, *पाणक्या* होऊन पाणी भरतो,

भक्तांची लाथ *भक्त लांच्छन* म्हणून मिरवतो,कुणासाठी शेले विणतो,दळण दळतो,धुनी धुतो,

असा हा परब्रम्ह राम होऊन शबरीची उष्टी बोरे ही चाखतो.

भक्तांधींन राहणे याला आवडते.


    *कुठेही असा दुनियेवर । मी तो तुम्हा बरोबर । तुम्हा हृदयीच माझे घर । अंतर्यामी तुमचे मी ।*

      नाटनाटकी  साई मग कोणतेही रूप घेऊन आपल्या बाळांसाठी  धावतो. मग या कथेत टांगा,टांगेवाला शिपाई, घोडे आणखी वेगळे कोण असणार?

असे असताना *ते काय होते भाड्याचे थोडे* आपसूकच उत्तर येते नाही.

*स्वयं प्रकाशी, स्वयं तेज तू घन निळा कृष्णां।।असंख्य क्रीडा लीला करुनि पुरवीशी सत्कामा*  हेच सत्य.

  

हरि ओम!! श्रीराम !! अम्बज्ञ!!

             🌹🙏🏼🌹

[12/07, 11:34 am] Bakulveera Merch

सावळा सुंदर,सुंदर रुपड्याचा, भला दांडगा मर्द मराठा कोरीव लावण्याचा!

हा सुंदर,याची प्रत्येक गोष्ट सुंदर,प्रत्येक लीला सुंदर कारण ती भक्तासाठीच निर्माण झालेली स्वयंभू, स्वयंभगवानाची सुंदर करणी! या करणीचा प्रत्येक कण प्रेमातून आलेला म्हणूनच तो आणि भक्त यांच्यातील जोडणीच्या मालकीचा. 

अंबज्ञ नाथसंविध!

No comments:

Post a Comment