।। *हरी ओम*।।
।। *आत्मबल महोत्सव*।।
काय वदावे या आनंदाला,
उत्साह - उर्मिचा हा प्रपात ।
गिरीसप्पालाही लाजवेल,
आनंदाचा हा खळखळाट।।
जणू सागर हा उल्हासाचा,
भिडे थेट हा गगनाला।
लाटे मागुनी लाट उसळे,
नसे अंत - पार आनंदाला।।
अविस्मरणीय स्मृती अशा या,
स्पर्शती जेव्हा हृदयाला।
रोमांचित हे तन - मन होते,
नवी प्रेरणा जगण्याला।।
महोत्सव हा आल्हादाचा,
संकल्प नवा *आल्हादिनीचा*।
स्वप्न - गंध देऊनी लेकींना,
सुप्त *राजहंस* जागविला।।
सान -सानुले निर्झर - ओढे,
प्रवाह छोटे अथवा मोठे।
वाहू लागले एक "मना -दिलाने",
समरसती *प्रेम जान्हवीला*।।
अनेकेतही पाहता एकता,
*वंदन* आमुच्या आई *नंदाईला*।।
कसे असावे, कसे दिसावे,
कसे हसावे, जरा पहा।
देहबोलीतून - आचरणातून,
*आदर्शचा ग्रंथ* असा।।
कारुण्य - क्षमा अन वात्सल्याची,
नंदाई आमुची *गंगोत्री*।
आनंदाला उधाण येते,
पाहता ही *प्रेमळ मूर्ती*।
स्मृती - गंधाची आंदण ओंजळ,
जपेन मी अंतर्यामी।
दरवळ त्याचा मनी *वसा* हा,
उर्मि - प्रेरणा प्रति क्षणी।।
।। हरी ओम ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।।
🌹🙏🏻🌹
रूपालिवीरा हेगिष्टे
आत्मबल पुष्प ९ वे
५ नोव्हेंबर 2020
No comments:
Post a Comment