अनिरुद्ध अनिरुद्ध आमुचा प्रकाश
अनिरुद्ध अनिरुद्ध उर्जेचा स्त्रोत
आंधारात मार्ग अनिरुद्ध
एकान्तिचा सोबती
जन्मो जन्मीचा चा सखा अनिरुद्ध
बुडताना आधार खंबीर
देवांचा हो देव ठगांचा हो ठग
जीवाचा जीवलग अनिरुद्ध
प्रेमाचा प्रवास नित्याचा सहवास अनिरुद्ध
भुकेल्याचा घास ,तहानल्याची तृप्ती अनिरुद्ध
मातेचे ह्रदय प्रेमाचा पहाना
बापाचीही प्रीती अनिरुद्ध
दुखियांचा राजा पापियांचा कैवारी
पिड़ीतान्ना तारी अनिरुद्ध
अनिरुद्ध आमुच्या जीवाची हो शांती
आनंदाची मुक्ती अनिरुद्ध
अनिरुद्ध भावे जावु या हो शरण
अनन्य माझा अनिरूद्ध
अनन्य हो आमुचा अनिरुद्ध ।।
हरि ॐ श्री राम अंबज्ञ
डॉ निशिकांत सिंह विभुते ।
--
Sent from Fast notepad
No comments:
Post a Comment