Sunday 5 March 2023

JATE DALAN GRINDING BY SAINATH DISCUSSION : साईनाथांची गहू दळणे कथा आणि भक्तांवर अनुग्रह : संवाद (अध्याय 1)

 

[] Priyaveera : Hari Om!

पहिल्या अध्यायमध्ये दळण्याच्या देखाव्याची लीला बाबांनी दाखवली, तर यासाठी  बाबांनी जातेच का वापरले?

JATE DALAN GRINDING BY SAINATH DISCUSSION :


[] Sharadaveera : कारण हे जाते सुदर्शन  चक्राचे रूपक आहे

हे सुदर्शन  चक्र  अशांती रूपी महामारी  आणि भयरूपी  वैरी  यांचा नाश करते.

जाळ्यातून निघणारे पीठ म्हणजेच  ह्या सद्गुरू साईनाथांच्या चक्रातून स्रवणारा मध जो देहाच्या सर्व सीमांपर्यंत,सद्गुरू साईनाथ  प्रवाहित करतात. 

म्हणून  बाबांनी भक्तांच्या देहातील महामारी घालवण्या साठी जाते वापरले  असावे असे मला  वाटते

अंबज्ञ  नाथसंविध 🙏🏻

[] Supriyaveera : जत्याला दोन तळी

खालची तळी म्हणजे  *श्रद्धा,*

वरची तळी म्हणजे *सबुरी*


खालची तळी म्हणजे *सेवा*

वरची तळी म्हणजे *भक्ती*

[] Suman Veera : जाते हे त्याकाळी घरोघरी वापरली जाणारी गोष्ट होती .त्यामुळे जात्याच्या उदाहरणावरून या गोष्टीचा अर्थ समजणे थोडे सोपे होते. जात्याच्या दोन तळी असतात. मला वाटते वरची तळी म्हणजे मन आणि खालची तळी हे  बुद्धीचे रूपक आहे आणि वरून जे धान्य घातले जाते ते म्हणजे मनात येणारे असंख्य विचार- चांगले वाईट सगळेच जे जात्यात भरडले जातात आणि जात्याचा खुंटा हे प्रतीक आहे स्वतःला सुधारण्याची प्रबळ इच्छा शक्ती. आपल्या मनात वाईट ,चुकीचा विचार येता क्षणीच बुद्धी तो थोपवण्याचा प्रयत्न करीत असते. मात्र अनेकदा मन बुद्धीचे ऐकतच नाही .बुद्धी अनेक प्रकारे प्रयत्न करत असते व जर आपली स्वतःला सुधारण्याची इच्छा असेल तर आपले मन बुद्धीचा सल्ला ऐकते आणि क्षणिक मोहातून,लोभातून होणारा अविचार आपण दूर करतो व त्यानंतरचे आयुष्य म्हणजे खाली पडलेले त्या दोन तळींच्या संघर्षातून, मन बुद्धीच्या वैचारिक लढाईतून प्राप्त झालेले शांत आयुष्य ,षडरिपू मुक्त आयुष्य .मनात येणारे संकल्प विकल्प, खरेपणा खोटेपणा, तर्ककुतर्क यातून मुक्त झालेले सुखी आयुष्य. जात्यातून बाहेर पडलेला भरडा मात्र सदैव स्मरणात ठेवून बुद्धी जे सांगते त्यातच आपले भले आहे ,तेच आपल्यासाठी योग्य आहे याचे भान प्रत्येक श्रद्धावानाने ठेवले पाहिजे.

[] Sandeep : One point more I would like to make in addition to all above valid ones is that the bottom disc of the Jaata is fixed and stationary where as the above one moves around the dhuri by the effort put on the khunta! To move the heavy stone disk without the khunta is nearly an impossible task…. Though u can move the stone disc but ur hands will get blistered. Wooden khunta is smooth and easy and like the pulley makes the task easier and soft on the hand.


The khunta nevertheless madhun madhun nighat jato and then one has to keep tightening it …..

[] Anjanaveera: And the khunta ghatt karane is keeping our faith firm at Bapu's lotus feet and do not let it becoming  loose in any case .

[] Sandeep : The two stones of the Chakki are Sansar or grihasthi and Parmarth! There is always a friction between these two stones but the movement is what Sadguru helps in doin through khunta! And what is grain? Gahu or Jondhale are our prarbdha which u cannot consume as it is. The grains have to be converted into edible peeth or flour! That’s how when parmarth rupi stone gruhusthi rupi stone ver Bhakti rupi khuntya mule phirta tevha that khadtar prarbdha peethachya rupat phalit hota!

[] Rasikaveera : अजून एक आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे,  जात्या ची दोन्ही पाती दगडी आहेत.  म्हणजे मजबूत कणखर, 

या उलट लाकडी खुंटा... लाकूड जे सारखं सारखं तुटत रहात. ज्याला सतत घट्ट करावे लागते

[] Priyaveera : Hari Om!

 दळण दळताना दोघीच व्यवस्थित पणे दळण दळू शकतात. या यामध्ये चार बाया दळण दळीत आहेत असे का?

[] Sandeep : One point related to this is that Baba has sat down to grind wheat…. Many bystanders are watching in amusement that why and what Baba is doing. But out of so many only these 4 women come forward and take charge and authoritatively take charge of the grinding!

[] Supriyaveera : *चार बायका*

ह्या

१) शुद्ध आहार

२)शुद्ध विहार

३) शुद्ध आचार

४) शुद्ध विचार

चे प्रतीक आहेत

[] Supriyaveera : Ho, and ह्याचा स्वामी *गणपती* आहे

[] Anjanaveera: Yes ...and this also tells us that in the work of our Sadguru we should also join hands and be a part of it,even if we do not know the reason behind His work.As we are common human beings and can think only about material things but Baba knows all about the benefits of His children,His real motive of grinding  wheat was to keep away the cholera panademic   from Shirdi and save His children....This order of Baba was obeyed by these 4 women later on. As per Baba's command they put the wheat on all 4 direction at the borders of Shirdi. Shirdi remains protected in Baba's छत्रछाया.Ambadnya

[] Anjana veera: Wheat flour*

[] Supriyaveera : *मात्रुवात्सल्य विंदानम*

मध्ये आपण पाहतो की जेव्हा बाळ गणेश, अनसूया मातेकडे भिक्षा मागतो तेव्हा माता त्याच्या झोळीत *२१* मोदक आणि *४* हातात, 

१) मोदक : आहार चे प्रतीक

२) पाश : आचार चे प्रतीक

३) परशू : विचार चे प्रतीक

४) दांत : विहार चे प्रतीक


ह्या *४* साधनांचे दान करते....

[] Chhayaveera : ह्याच्यात उत्तर आहे

मुलाधार चक्राचा स्वामी गणपती


गहू दळण्याची कथा

हा अध्याय साईचारित्रचा उगम आहे

हा देखावा पाहिल्यावर हेमाडपंत ह्यांना saisacharitra लिहिण्याची इच्छा निर्माण झाली

मुलाधार चक्र

गणपती

Saisacchritracha उगम 

कोणत्याही गोष्टीची सुरुवात 

गणेश पूजन करुन करतात

[] Chhayaveera : साईसच्चरित्र लिहिणे ही काही सोपी गोष्ट नाहीय

त्यात हेमाडपंत बाबांकडे येण्यापूर्वीची त्यांची मनाची अवस्था सांगतात


हेमाडपंतांची निवड बाबांनीच केली आहे

All priplanned

Saisacharitra लिहिण्याची इच्छा होण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी मन:  चे नम: होणे गरजेचे असते

त्यासाठीच जात्याचा खटाटोप


जातेच का?


भक्ताची पूर्व तयारी

त्यांच्या हातून चांगलं कार्य घडवायचे असेल तर मन: प्राण: प्रज्ञा (एक होणे) शुद्ध होणे गरजेचे

म्हणूनच जाते

जत्याची

एक पारी मन:

दुसरी प्राण:

आणि

खुंटा प्रज्ञा:

प्रज्ञा म्हणजे बुद्धी

हे सर्व एकरूप होण्यासाठी जात्याची च गरज

ईथे जाते प्रतीकात्मक आहे


फक्तं महामारी घालवण्यापूर्ता नसून

जात्यातून पिठाचा स्त्रोत अव्हयात वाहत राहणे गरजेचे आहे

म्हणजेच साईसच्चचरित्राचा उगम जसा नदीचा उगम तसाच जत्यातून वाहणाऱ्या पिठाचा उगम

हे सर्व जुळवून आणण्यासाठी च बाबांनी हा जात्याचा देखावा केला असावा असं मला वाटते

🙏🙏🙏

[] Supriyaveera : मनः प्राणः प्रज्ञा चां जात्याशी relate केले

It's really too good


खरतर जात हे फक्त दळण दळण्याचे पूर्वीच्या काळातील एक साधन

पण त्या साधनाला इतका सुंदर भाव

[] Supriyaveera : म्हणजेच जात्याचा खूंटा आता somewhat stable झाला आहे...

कारण हा खुंटा म्हणजे आपले आयुष्य आपण आपल्या बाबांच्या हाती सोपवले आहे...

जात्यचा हा खुंटा कसा फिरवायचा, हळू की जोरात हे बाबाच ठरवतील...

आणि आम्ही निश्चिंत झालो आहोत ...

बाबांना आमच्या आयुष्याचे प्रारब्ध भरडून वस्त्र गाळ पीठ करुदे...

कारण असे वस्त्र गाळ पीठ फक्त बाबाच करू शकतात, आम्ही नाही...

आम्हाला म्हणूनच बाबांच्या आज्ञेत राहून, बाबांच्या पीठ भरडण्या मध्ये सेवा करायची आहे नक्कीच पण जसे बाबा सांगतील त्या प्रमाणे सेवा घडूदे...

[] Supriyaveera : जसे त्या चार बायकांनी बाबांचे ऐकले...

तसेच मलाही यापुढे बाबांच्या मार्गावरून चालायचे आहे...

बाबांचे बोट घट्ट पकडून चालायचे आहे...

खुंटा loose झाला की पुन्हा घट्ट करायचा आहे...

बाबा तो ठोकून घट्ट करतात...

बोट सोडायचे नाही आहे...

घट्ट पकडून ठेवायचे आहे...

माझ्या चुकांना तो पदरात घेतच आहे...

मी माझ्या बाबांचे लहान बाळ आहे...

पण माझे देवयान मार्गावरील प्रयास नक्कीच आहेत...

माझ्या प्रयासंना तो यश नक्कीच द्यायला समर्थ आहे...

दुधाची वाटी घेऊन तो सतत मागे उभाच आहे...

[] Supriyaveera : *जीस जिस पथ पर भक्त साई का*

*वहा खडा हैं साई*

[] Sharadaveera : उत्तर द्यायला उशीर  झाला.

जरी दळण दळण्या साठी दोन बायका लागतात,तरी ईथे चार बायका आहेत.हीच तर साईनाथांची लिला आहे 

आम्हा श्रद्धावान बोध देण्याची

या चार बायका 

उत्कट  प्रीती

खात्री

सक्रियता

आज्ञापालन निष्ठा

अशा चार गुणांचे प्रतिक आहेत.

या चार बायका आपल्या मनाच्या गावी दळणाची कथा जीवंत करतात.

या चार बायकांकडून  बाबांनी दळण देऊन घेतले,म्हणजेच  आमच्या चित्त,अहंकार, बुध्दी,व मन ह्याच्याकडून  हे कार्य  साईनाथानी करून  घेतले.

अंबज्ञ  नाथसंविध 🙏🏻

[] Ambadnya: पूर्ण साई सच्चरीत हेच जातं आहे

[] Sharadaveera : पुर्वी देवी,प्लेग सारख्या साथीच्या रोगाने माणसे दगावत होती,गावाच्या गाव उध्वस्त  होत होती.त्याला महामारी म्हणत.

ईथे महामारी  शब्द  वापरला आहे तो वेगळ्या अर्थाने.

महामारी म्हणले की रोग आणि रोग जंतू आलेच.

इथे मोह हा रोग आणि अहंकार हा रोग जंतू आहे.साईनाथानी दळणाच्या कथेतून श्रध्दावानच्या मनातील मोह आणि  अहंकार रूपी रोग आणि रोगजंतुची  महामारी घालवली.

आणि ह्या महामारीचा नाश करण्या साठी बाबांनी दळणाची क्रिया घडवुन आणली.

अंबज्ञ  नाथसंविध 🙏🏻

[] Supriyaveera : आत्ता आपण Corona मधून बाहेर आलो आहोत...पण जेव्हा अचानक हा disease spread झाला तेव्हा अनेक जण मृत्यू मुखी पडले तेव्हा जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहून नेहमी भीती वाटायची...

पण जसे Vaccine introduced झाले and we all are Vaccinated now, so the *Fear* of Corona has totally vanished...

Same way this was the period of *100* years back, when the disease of Cholera had attacked the people of Shirdi ... There was no cure on this disease...

असेच खूप लोक एका पाठोपाठ एक मृत्युमुखी पडत होते ...ह्यामुळे शिर्डी करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ...

महामारी म्हणजे भीती Fear of the disease...which leads to termination of progress...

मना मध्ये *शिरलेली* भीती...

ज्यामुळे मनाचे सामर्थ्य खचून जाते ...

आणि माझा बाबा हाच आणि केवळ हाच फक्त ह्या महामारीचा, ह्या भयाचा बीमोड करण्यास आरंभ करतो...


बापू नेहमी म्हणतात की 

*मला माझ्या बाळांना निडर झालेले पाहायचे आहे*

[] Supriyaveera : *कलियुगी एकची साधन*

*श्रीहरीगुरूचरणस्मरण*

*तेनेची होय भवभयहरण*

*हे एक निजशरण शरणागता*

[] Supriyaveera : *लागण लागावी ती फक्त भक्तीची*

[] Supriyaveera : *मर्म बंधाचे मागणे फक्त भक्तीचे लागणे*


महामारी म्हणजे लागण

इथे लोकांच्या मनात भीतीची लागण लागली आहे...

भीती तसे पाहता अनेक प्रकारची असते...

बॉस ची भीती, शाळेत शिक्षकांची भीती, after Lockdown many people became jobless, financial stress etc ...

Baba expects us to Trust the almighty and become Fearless...

हे कधी होईल जेव्हा आम्हाला *भक्तीची लागण लागेल तेव्हाच*


म्हणजेच दुबळ्या मनाचे नमः होणे...


माझा बाबाच फक्त मनः सामर्थ्यदाता आहे...


*त्याचा हस्त शिरावरी*

*कैसी उरेल आता भीती*

[] Ambadnya: जात्याची खालची पाळी ही अनंत काळ निर्गुण निराकार दत्तगुरु ,

फिरणारे चक्र कालचक्र : परमात्मा कर्ता : खुंटा धरून फिरवतो 


जीवन : मृत्यू : गहू 


पीठ : जीवन मृत्यू चक्रातून मुक्ती 


पीठ वेशीबाहेर टाकणे : फलाशेचा त्याग


।। हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथसंविध ।।

No comments:

Post a Comment