Wednesday 11 May 2022

Sai Baba Shirdi Eleven Promises (Sainathanchi akara vachane marathi)

 Here are eleven promises by Sadguru Shree Sainath Majaraj . 

(Abhang lekhak /Author: Shriyut Mohiniraj Pandit.) 

Credits : Shree Sai Saccharit by Shree Govind Raghunath Dabholkar (Hemadpant)

Complete book/ literature is available on official website 

Link https://sai.org.in/en/sai-satcharitra





श्रीसद्गुरुसाईबाबांचे भक्तांना अभय 

अभंग 

|| शिरडीस ज्याचे लागतील पाय l| टळती अपाय सर्व त्याचे ||१||

 ll माझ्या समाधीची पायरी चढेल ll  दुःख हें हरेल सर्व त्याचें ll २ll 

 ll जरी हें शरीर गेलों मी टाकून ll तरी मी धांवेन भक्तांसाठी ll ३ll 

ll नवसास माझी पावेल समाधी ll धरा दृढ बुद्धी माझ्या ठायी ll ४ll 

ll नित्य मी जिवंत, जाणा हेंचि सत्य ll नित्य घ्या प्रचीत अनुभवें ll ५ ll  

ll शरण मज आला, आणि वायां गेला ll दाखवा दाखवा ऐसा कोणी ll ६ ll

ll जो जो, मज भजे,  जैशा जैशा भावें ll तैसा तैसा पावें,  मीही त्यासी ll ७ ll  

ll तुमचा मी भार वाहीन सर्वथा ll नव्हे हें अन्यथा वचन माझें ll ८ ll 

ll जाणा येथें आहे साहाय्य सर्वांस ll मागे जें जें त्यास तें तें  लाभे ll ९ll 

ll माझा जो जाहला कायावाचामनीं ll तयाचा मी ऋणी सर्वकाळ ll १० ll

ll साई म्हणे तोचि; तोचि झाला धन्य ll झाला जो अनन्य माझ्या पायीं ll ११ll 

 अभंग लेखक - श्रीयुत मोहनीराज पंडित, पेन्शनर मामलेदार, नाशिक.


No comments:

Post a Comment