*हरि ॐ श्रीराम अंबज्ञ*
*प्रश्न:- भगवद्गीतेतील श्लोकाच्या आधारे नानासाहेब चांदोरकरांना श्रीसाईबाबानी कोणता अनुग्रह दिला हे ५० व्या अध्यायाच्या आधारे लिहा.*
हा प्रश्न खरेच खुप गहन आणि अभ्यासकास प्रयास करण्यास उद्युक्त करणारा आहे. खरे तर या मध्ये लिहिण्यासारखे खुपच आहे म्हणून मला असे वाटते हा पंचशील परीक्षेतील १०० गुणांकरिता महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचे उत्तर तेवढेच व्यापक व विस्तृत, भावार्थप्रणित आणि शिकवण देणारा आहे. जेवढे शक्य होईल तेवढे देण्याचा बापुकृपेने प्रयास करते. प्रयास करते म्हणण्यापेक्षा बापुच लिहुन घेतील असे म्हणणे उचित आहे.
*उत्तर :- गीतेतील मुळ श्लोक*
*तद्विद्धि प्रणिपातेन,*
*परिप्रश्नेन सेवया l*
*उपदेक्ष्यंति ते ज्ञानं,* *ज्ञानिनस्त्त्त्वदर्शिन: ll*
*कथा :-* अध्याय ५० मध्ये हेमाडपंत लिहितात की
नानासाहेब चांदोरकर श्रीसाईनाथांचे पादसंवाहन करीत असताना गीतेतील ओव्या हळूहळू पुटपुटत होते. बाबांचे तिकडे लक्ष होते. *बाबा म्हणाले, नाना काय पुटपुटतोस? जरा मोठ्याने बोल. बघु तुला काय कळते ते.* नाना नमस्कार करुन वरील श्लोक म्हणुन दाखवतात. बाबा म्हणाले, याचा अर्थ काय रे? नाना अर्थ सांगतात
*श्लोकाचा सरलार्थ*
*शब्दांचे विग्रह:-*
*तद् =* ज्ञानाला उद्देशुन
*प्रणिपात =* नमस्कार दंडवत
लोटांगण
सर्वस्व झोकून
देउन पुर्ण
शरणागतीने
(काया वाचा मनाने)
केलेला नमस्कार.
*परिप्रश्नेन =* प्रश्न विचारुन
गुरुसेवे संदर्भात
जाणुन घेणे.
प्रश्न पुन्हा पुन्हा
विचारणे.
(गुरुकृपा प्राप्तीसाठी) खऱ्या जिज्ञासाने आणि शंका नीट समजुन घेण्यासाठी विचारलेले प्रश्न. समाधान होइपर्यंत पुन्हा पुन्हा प्रश्न विचारणे.
*सेवया :-* आपले सर्वस्व म्हणजे तन मन धनाने अर्पण केलेली सेवा.
*ज्ञानिनस्त्त्त्वदर्शिन: =* ज्ञानीजन (तत्त्ववेत्ते )ज्ञानाच्या अर्थासहित
*उपदेक्ष्यंति ते ज्ञानं =* ज्ञानाचा उपदेश करतील.
*श्लोकाचा सरलार्थ:-*
💞गुरुचरणी जो दंडवत घालतो गुरुसेवेकरिता प्राणही वेचतो आणि गुरुंना त्याबाबत आदरपुर्ण प्रश्न विचारतो त्याला ज्ञानीजन ज्ञानाच्या अर्थासह उपदेश करतात. म्हणजेच गुरुसेवा व गुरुवंदन हेच ज्ञान प्राप्त करुन देणारे आहेत.
💞 *बाबा म्हणाले अर्थ बरोबर आहे पण नाना ज्ञान या शब्दाआधी ' S ' असा लोप लाव आणि अज्ञान हा शब्द घेउन अर्थ लाव. :-)*
*बाबांचा नानांसाठी अनुग्रह :-*
💞 बाबांच्या कृपेमुळे या श्लोकाचा भावार्थ सर्वांच्या लक्षात येतो. आपल्या भक्तांनी अज्ञान नष्ट करुन ज्ञान कसे प्राप्त करावे हे नानांचे निमित्त करुन बाबा विषद करीत आहेत.
💞लोप लावल्यावर त्याचा अर्थ तत्त्व जाणणारे अज्ञानाचा उपदेश करतील असा होईल. कारण ज्ञान हा काही बोलण्याचा विषय नाही, तर अनुभवण्याचा विषय आहे. सत म्हणजे ब्रह्म म्हणजे ज्ञान. याचाच अर्थ जे असत आहे ते ज्ञान नाही. ज्ञान हा वाणीचा विषय असु शकत नाही पण वाणी म्हणजे ज्ञान नाही म्हणजेच वाणी अज्ञानचा विषय होऊ शकतो. याचाच अर्थ वाणी ब्रह्म किंवा ज्ञान नव्हे. म्हणूनच तत्त्ववेत्ते जे बोलतात ते अज्ञानाविषयी. कारण ज्ञान हे जाणण्यासाठी आहे त्याचा उपदेश होऊ शकत नाही. अज्ञान काय समजले की ज्ञानाचा आविष्कार होतो. कारण अज्ञान म्हणजे ज्ञानावरचे आवरण. गुरुंचा अशाप्रकारे उपदेश सुरु झाला की शिष्याचे अज्ञानाचे आवरण बाजुला सरुन ज्ञान प्रकट होते.
💞गुरुने अज्ञानाबाबत केलेल्या उपदेशाची परीणती शेवटी ज्ञानातच होते. ज्ञान मुळातच असते. ते उत्पन्न केले जात नाही. त्यावरचे आच्छादन फक्त बाजुला सारायचे असते.
💞देहाभिमान म्हणजे शरिराची आसक्ती अभिमान असणे म्हणजे देह म्हणजे मी हे समजणे अज्ञान आहे. तर अहं ब्रह्मास्मि l म्हणजे मीच ब्रह्म आहे हे मानणे म्हणजे ज्ञान. अयमात्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्म आहे हे जाणणे म्हणजे ज्ञान.
💞शब्द स्पर्श रुप रस व गंध या विषयांच्या मागे इंद्रिये लागली तर सुख मिळते हे अज्ञान. व विषयाच्या आसक्तीची परिणिती शेवटी दुखात होते हे जाणणे म्हणजे ज्ञान. या अज्ञानातुन मागे फिरुन म्हणजे विषयातुन मागे फिरुन मनाला मिळणारा शाश्वत आनंद म्हणजे ज्ञान.
💞अंत:करणात मानसन्मान किर्तीची लालसा हे अज्ञान तर गुरुचे चिंतन, गुरुचा ध्यास हे ज्ञान.
म्हणून आधी अज्ञान समजुन घ्यावे. त्याच्या निरसनाने मन शुद्ध होताच ज्ञान प्रकट होते.
💞ज्याचे ध्यान सदा वैभव द्रव्य पत्नी पुत्र याकडे असते ते अज्ञान. म्हणजे विषय सेवनी जो सदा स्वत:ला निरत ठेवतो म्हणजे मीच कर्ता आणि भोक्ता म्हणतो ते त्याचे अज्ञान तर नित्य अनित्य वस्तुचे वर्गीकरण करुन श्रवण मनन निधिध्यासन तसेच शम दम उपरति तितिक्षा श्रद्धा आणि समाधान या षटक समुदायाच्या संपादनाने जेव्हा अज्ञानाचा नाश होइल तेव्हा खरे ज्ञान प्रकटेल.
💞ज्ञानाचा गड्डा समोर असला तरी मुर्खाला अज्ञानाचा ओढा असतो जसे बेडकाला कमळा खालच्या चिखलाची ओढ आणि गोचिडाला नासक्या दुधाची. मुर्ख अज्ञानालाच ज्ञान समजत असतात.
💞अविद्येने मलीन झालेल्या चित्ताचे शुद्धीकरण ईशभक्तीवाचुन होत नसते आणि भक्तीशिवाय ज्ञान उपजत नसते. म्हणून आधी अज्ञान जाणुन घ्यावे.
💞स्वच्छ आरसा जसा मळाने झाकला जातो, अग्नीचा प्रकाश धुराने व्यापला जातो, जसे शैवाल पाण्याला झाकते. तसेच काम व क्रोध यानी ताब्यात घेतलेले ज्ञान अज्ञाने झाकलेले असते.
💞जसे ज्ञानी ज्याचा तिरस्कार करतात पण मग त्याचाच नंतर स्विकार करतात. प्रयत्न पुर्वक पाप टाळतात पण दैवयोगाने पुन्हा खेचले जातात याला ज्ञानी कसे म्हणता येइल? हीच कामवासना जी त्याला उद्युक्त करते. जेव्हा कामाच्या परिपुर्तीला अडथळा येतो तेव्हा क्रोध उत्पन्न होतो.
💞म्हणुन काम व क्रोध हे ज्ञानाच्या आड येतात हे जाणणे म्हणजे अज्ञानाला नष्ट करणे.
💞म्हणून कान क्रोध मोह ही नरकाची तीन द्वारे म्हटले आहे. म्हणूनच अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय मन भयमुक्त होत नाही. म्हणून अज्ञान निरसन हे ध्येय असावे. आस्तिंक्य बुद्धीने उपासना करताच आत्मा प्रसन्न होतो. पण आत्म्याच्या ठिकाणी परमात्म्याचे ध्यान केले असता म्हणजे अभेद रुपाने उपासना केली असता तेलियाचि भिंत पाडली असता आत्मा स्वत:च आपल्यावर प्रसन्न होतो.
💞 *म्हणूनच आन्हिक मध्ये आपण म्हणतो नायमात्मा .... हिनेन लभ्य: l परमात्मा एवं ......... दाता ll*
💞परमात्मा आपल्याला सर्व मिळवून देतो हे जाणणे म्हणजे ज्ञान.
*बाबांची शिकवण:-*
*बाबांनी या उपदेशासाठी नानांच का निवडले*?
💞नानासाहेब चांदोरकर संस्कृत विषय घेउन मुंबईच्या एल्फिंग्स्टन कॉलेजातुन पदवीधर झाले. संस्कृत भाषेचा आणि गीतेचा त्यांचा गाढा अभ्यास होता. या विद्वतेचा आपल्या भक्तास अहंकार होऊ नये व त्याची आध्यात्मिक प्रगती खुंटली जाउ नये तसेच मोक्ष प्राप्तीचे द्वार खुले व्हावे यासाठी बाबांनी नानासाहेब चांदोरकरांची निवड केली असावी असे वाटते तथापि श्रीसाईनाथ करुणेचे सागर आहेत. इथे नानांचे निमित्त करुन बाबा आपल्या सर्वाना गीतेचे वचन शास्त्र समजवुन सांगत आहेत.
🔸बाबांनी ज्ञानाच्या जागी अज्ञान घेउन गुरुने ज्ञानापेक्षा अज्ञान समजवल्याने त्याचे आवरण दुर होऊन त्याचे ज्ञान कसे प्रकटते हे शिकवले.
🔸प्रणिपात म्हणजे नुसता नमस्कार नव्हे तर हातातील काठी जशी जमिनीवर पडते तसे गुरु चरणांवर झोकुन देणे. म्हणजे काया वाचा मनी असलेली शरणागती.
🔸सेवा म्हणजे गुरुचे फक्त पादसंवाहन नसुन त्याच्या कार्यात पुर्णपणे झोकुन देणे. तन मन धन सर्वस्वी अर्पण करता आले पाहीजे.
🔸ज्ञान हा उपदेशाचा विषय नसुन ते स्वयंप्रकाशित आहे. अज्ञानाचे आवरण काढताच ज्ञान प्रकटते.
🔸गुरुंचा उपदेश हे ज्ञान नसुन शिष्याने काय टाकायचे? त्या अज्ञानाचे उपदेश
▪दृष्टीला दिसणारे जग मायेचा खेळ आहे त्याला खरे मानणे हे अज्ञान.
▪देहबुद्धीने राहणे हे अज्ञान. तर देहाभिमान सोडणे हे ज्ञान.
क) जीवात्मा परमात्मा याना वेगळे मानणे हे अज्ञान. तर सर्वं खविदं ब्रह्म यावर विश्वास म्हणजे ज्ञान.
▪वरवरची शांती व सात्त्वीकता परंतु मनात संशय आणि एक क्षणही अपमान सहन न होणे. मनात मानसन्मान व किर्तीची लालसा ही सर्व अज्ञानाची चिन्हे आहेत.
▪विषयसुखाच्या मागे धावणे आणि द्रव्य वैभवाकडे ओढा असणे हे ही अज्ञानच आहे
फ) काम क्रोध मोह यात अडकणे हे ही अज्ञान.
▪स्वत:ला ज्ञानी म्हणुन मिरवणे व वर्णाश्रम न पाळणे हे ही अज्ञानच.
▪गुरुच्या उपदेशाबद्दल साशंक राहणे त्याच्यावर श्रद्धा व बोलावर विश्वास नसणे हे ही अज्ञानच.
💞 *लिहिण्यासारखे खुप आहे. अत्यंत गहन आहे. डॅडची प्रवचने व ग्रंथराज यामधून खुप काही घेता येइल. डॅडनी जे लिहुन घेतले त्याबद्दल अंबज्ञ ........*💞
*सदगुरु श्रीअनिरुद्धार्पणमस्तु ll*
*ll हरि ॐ ll श्रीराम llअंबज्ञ ll*
*अंबज्ञ सौ. स्वातीवीरा कुडव.*

No comments:
Post a Comment