Thursday, 6 April 2017

Mī tumaciyā bhāvā sarisā l rātrāndisā ubhāch
( written by - स्वातीवीरा कुडव.)

तुम्ही कोणी कुठेही असा l
भावे मजपुढे पसरिता पसा ll
मी तुमचिया भावा सरिसा l
रात्रांदिसा उभाच ll६७ll

माझा   देह जरी इकडे l
तुम्ही साता समुद्रापलीकडे ll
तुम्ही काहीही करा तिकडे l
जाणीव मजकडे तत्काळ ll६८ll

कुठेही जा दुनियेवर l
मी तो तुम्हाबरोबर ll
तुम्हा हृदयीच माझे घर l
अंतर्यामी तुमचे मी ll६९ll
 अध्याय - १५ वा

सदगुरु श्रीसाईनाथांच्या मुखीचे हे बोल म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. सदगुरुमुखीचा शब्द म्हणजे सदगुरु वचन. प्राण जाय पर वचन न जाय. याची अनुभुती सदगुरुंच्या लिलांमधून आपण वाचतो /अनुभवतो. एकदा देव मामलेदारानी बाबांवर आरोप केला की बाबा तुम्ही शब्द देउन श्राद्धाला आला नाहीत. तेव्हा  देव मामलेदाराना बाबा म्हणाले, " पहा माझिया वचना कारणे मरुनि जाईन जीवेप्राणे. मी आलो होतो, तु मला ओळखले नाहीस." आपणही अशी चुक करतो.  आपल्याही त्याचे आगमन ओळखता येत नाही. म्हणूनच आद्य पिपादादा म्हणतात " सकाळी आला उपाशी .............."

असे हे आपले लाडके सदगुरु. खरं तर यांच्या कार्यासाठी आपण आपला प्राण वेचला तरी कमीच आहे. पण हा अकारण कारुण्याचा दाता असे काहीही अपेक्षित नाही, तर त्याच्या प्रत्येक कार्यासाठी श्रद्धावानाना सवलतीच देत असतो. आपल्याला वाटते आपण सेवा करतो तर तसे नसतेच मुळी बापू करितो अमुचि सेवा, आपल्याला प्रारब्ध कमी करण्याची संधी देउन. प्रत्येक अवतार याचा अनीतीशी, अन्यायाशी आणि असुरांशीच लढण्यात गेला. याने स्वत: कसले व कितीसे सुख उपभोगले आहे. साई काय, स्वामी काय, राम काय किंवा कृष्ण काय आणि आता बापू काय !

भक्ताने हाक मारताच उडी मारण्यासाठी हा अठ्ठावीस उगे वीटेवर आणि कटीवर हस्त घेउन उभाच आहे. तसेच आपले बाबाही सांगतात तुम्ही ज्या भावाने मला हाक मारता, माझ्यापुढे पसा पसरता, त्याच तुमच्या भावासारखा मी उभाच आहे. यात बाबानी *भाव* हे वचन उच्चारले आहे. *म्हणजेच भक्तीप्रेमात भावच अनन्य असावा. देव भावाचा भुकेला. असा हा भक्तीभावाचा भुकेला विके कवडी मोला.*

इथे सेवेचा किंवा योगसाधनांसारख्या साधनांचा उच्चार केलेला नाही. देवाला भावाविण इतर गोष्टी म्हणजे कवायतीच आहेत. आणि हे पहायला *त्याला* काही जागा सोडण्याची आवश्यकता नाही कारण बाबाच सांगतात अंतर्यामी तुमचे मी.

देहाने जरी बापु खार येथे असले तरी कृपासिंधु अंकातील अनुभव आपल्याला जाणीव करुन देतात की बापु संकटकाळी कसे साता समुद्रापलिकडे पोहोचतात. काही अनुभव असे असतात की त्याना बापुना हाक मारण्याचाही अवधी मिळत नाही तरी बापु त्याना वाचवण्यासाठी तिथे पोहोचलेले असतात. एकदा फाल्गुनीवीरा फाटक यानी बापुना प्रश्न विचारला होता. *बापु जब मेरा accident हुआ तो मुझे आपका नाम लेनेका भी समय नही मिला l फिरभी आप वहा कैसे पहुचे?* अशा वेळी बापु बापूनी जे उत्तर दिले त्यावरुन त्यांचे भक्तांवरचे अपार प्रेम आणि अकारण कारुण्य दिसुन येते. बापु म्हणाले, *_जो मेरा हर रोज दिलसे नाम लेता है उसने  संकट समय मेरा नाम लेने की जरुरत नहीं l मै पहलेही वहा पहुचता हु l_*

तुम्ही काहीही करा तिकडे l जाणीव तात्काळ जाणीव मजकडे. *आपले  बाळ काय करते हे आईला कुणी सांगायला जाते का ?* ती कितीही कामात असली तरी तिची नजर मात्र बाळाकडेच असते. ते पडत नर नाही ना. चुकीचे काही तोंडात तर घालत नाही ना. नाहीतर आजारी पडेल. फक्त बाळाची प्रेमयुक्त काळजी. कासवीची पिल्ले केवळ दृष्टीने पोसते तेच तर सदगुरु माउली करत असते.  म्हणुनच ती जसा बाप तशी आई सुद्धा आहे. आईलाच बाळाच्या कर्तृत्त्वाची जाणीव असते.

*अशा या माउलीला स्वताचे असे घर नाही.* बापु सांगतात *मी पुरुषार्थी श्रद्धावानाच्या हृदयात* रहातो. म्हणजेच अंतर्यामी, म्हणुनच *जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. चालवितो हाती धरुनिया.* मी त्याचा हात धरला तर तर्क कुतर्काच्या येरझा-यात माझ्याकडुन हात  सुटु शकतो. पण  जर त्याने माझा हात धरला तर  *तो कधीच सोडणार नाही. त्यासाठी मला हात देता आला पाहीजे. हेच ते पहिले पाउल.* बाकीची पावले बापुच चालताहेत. अनेक उपासनांच्या स्वरुपात, तपस्यर्येच्या स्वरुपात.

दुराचारी वामाचारी यांच्याशी अखण्ड युद्ध पुकारलेला हा माझा बाप कितीशी सुखे उपभोगतो. त्याच्या इतर अवतारांप्रमाणे या अवतारातही त्याचे कार्य तसेच आहे. वाईटाशी लढणे आणि चागल्याचे संरक्षण करणे हे ब्रीद घेउनच त्याचे प्रत्येक अवतरण असते.

*अवधाचि संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. त्याचा ध्यास त्याच्या श्रद्धावानांचा आनंद.*

*हे मोठी आई, कधीतरी आमचाही ध्यास आमच्या सदगुरुंचा आनंद असा असु दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना.*

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ.
अंबज्ञ स्वातीवीरा कुडव.

No comments:

Post a Comment