Wednesday 5 April 2017

Shree Aniruddha Gurukshetram , श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम

*हरि ॐ*

आजपासुन आपण गुरुक्षेत्रम मधील प्रत्येक सेवेचा अभ्यास करु. तत्पुर्वी क्षेत्राची थोडक्यात माहिती.

या क्षेत्राचे नाव श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम असे आहे. *या तिर्थक्षेत्राची अधिष्ठात्री देवता आदिमाता अनसूया आहे.* ही आदिमाता स्थुलतत्त्वाची जननी आहे. अनसुया हे आदिमातेचे  स्थुलरुप. या क्षेत्रातच सूक्ष्मरुपात महिषासुरमर्दिनी
म्हणजे आपली मोठी आई अश्विन नवरात्रीत २००९ मध्ये अवतरली. (वर्ष जसे लक्षात राहिले तसे देत आहे कदाचित चुकु शकेल.)


*हे क्षेत्र या विश्वातील सर्वात पवित्र तिर्थक्षेत्र असुन, १०८ तिर्थक्षेत्र करुन जेवढे पुण्य पदरी पडते तेवढेच पुण्य फक्त एकदाच श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम मध्ये  आल्यावर मिळते. यावरुन लक्षात येईल की डॅडनी आपल्यासाठी पुण्याचे भांडार कसे खुले केले आहे.*

इथे येताच सर्वात पहिले नजरेस येतात ती या गुरुक्षेत्राची दोन  प्रवेशद्वारे. *ज्यावर  दिगंबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा* हे आपल्या प्रिय व लाडक्या *डॅड*च्या हस्ताक्षरात लिहिलेली कमान दृष्टीस पडते.

या क्षेत्रात संपुर्ण चण्डिकाकुलाचे वास्तव्य असुन परमात्म्यत्रयीच्या चरणस्पर्शाने इथली धुळ पावन झालेली असते. म्हणुनच या प्रवेशद्वारातुन प्रवेश करण्यापुर्वी प्रवेशद्वाराच्या आतील धुळीने कपाळावर त्रिपुण्ड्र काढावे अथवा धुळ माथी लावावी. श्रीरामरसायन मध्ये डॅड नी लिहिल्याप्रमाणे परमात्म्यत्रयीच्या चरणाची धुळ माथी लावल्याने अनंत जन्माचे पुण्य पदरी पडते. (हा माझा भाव आहे. प्रत्येकाचा वेगळा असु शकतो )

आत प्रवेश करताच डावी/उजवीकडे  दोन ध्वज दिसतात. त्यांना माथा टेकुन नमस्कार करावा. (या ध्वजाची माहिती डॅडनी सांगितलेली आहेच) तिथुन पुढे आहे दीपस्तंभ.

*दीपस्तंभ*=जिथे जिथे म्हणुन परमात्म्याचे वास्तव असते तिथे त्याच्या अंगणी दीपस्तंभ असतोच. (उदा. सर्व प्रार्थना स्थळामध्ये म्हणजे देउळ) या दीपस्तंभाला स्पर्श करुन नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी, *हे परमेश्वरा या दीपस्तंभाप्रमाणे तू मला तुझ्या अंगणात ठेव.* म्हणजेच आपण या प्रार्थनेने आपल्या सदगुरुंकडे या जन्मीच नव्हे तर जन्मोजन्मी तुझ्या सोबत ठेव असे आळवीत असतो.

भाग............... १

 - स्वातीवीरा कुडव
[03/04, 12:13 a.m.] स्वातीवीरा कुडव: *श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम भाग ....२*

*दीपस्तंभ ....... continue*

या दीपस्तंभातील दिवे संध्याकाळी ७ च्या सुमारात प्रज्वलित केले जातात. दीप प्रज्वलित करण्याचीही सेवा असते. *काय होते या दीपस्तंभातील दीप प्रज्वलित केल्याने?*

कोणताही दिवा म्हणजे प्रकाश देणारे साधन. म्हणजे अंधकार दुर करणारे साधन. *हा दीप जसा प्रकाश देतो तसा प्रकाश आपल्या जीवनात पडावा. अंधकाररुपी अज्ञान, विभक्ती, अभक्ती, अपयश हे सर्व जाऊन माझ्या जीवनात ज्ञानाचा, भक्तीचा, यशाचा दीप तेवत रहावा अशा भावाने हा दीप प्रज्वलित करावा.*

आणि म्हणूनच श्रद्धावान आपल्या जन्मदिवशी लग्नाच्या दिवशी ही सेवा आवर्जून करतात. परंतु याही पेक्षा अधिक सेवा आणि प्रेम तेव्हाच व्यक्त होते जेव्हा आपण इतरांच्या जन्मदिवशी, शैक्षणिक अथवा इतर यशा साठी, दीप प्रज्वलनाची सेवा घेतो. *मग बापुंनी म्हटल्याप्रमाणे जर आपण दुसऱ्यासाठी मागितले तर आपल्याला स्वत:साठी काहीच मागावे लागत नाही.*

या सेवेसाठी बुकींग करावे लागते. मोजक्या देणगी मुल्याने आपल्याला हव्या असलेल्या दिवशी ही सेवा मिळु शकते. ज्या दिवशी या सेवेचे बुकींग नसते, त्या दिवशी गुरुक्षेत्रममध्ये सेवेस असणाऱ्या सर्व श्रद्धावानाना ही सेवा करता येते. यामध्ये एक दिवसाची सेवा करणारे श्रद्धावानही असून त्यानाही दिप प्रज्वलित करण्यास देतात.

आपण कोणाच्याही वाढदिवसानिमित्त अथवा कोणत्याही प्रकारच्या यशा नंतर त्यांना भेट वस्तू देतो. ती वस्तु त्या व्यक्तीच्या जीवनात किती उपयोगी आहे अथवा नाही हे आपल्याला माहीत नसते. आजकाल तर प्रत्येकाकडे सर्वकाही असते. त्यामुळे त्या व्यक्तीसाठी दीप प्रज्वलित करून त्याच्या जिवनात यशरुपी प्रकाश पाडण्यास भगवंताला प्रार्थना केली तर हे नक्कीच त्यांच्यासाठी आगळे वेगळे असे गिफ्ट असेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाण्याचा मार्गही.

कदाचित तुमचे दिलेले गिफ्ट त्या व्यक्तिला दिसणार नाही. पण सदगुरुना तर सर्व कळते ना?
मात्र त्यांना यश मिळाल्यानंतर अत्यंत प्रेमाने सांगायचे,  तुला हे यश मिळावे म्हणून मी गुरुक्षेत्रममध्ये दीप प्रज्वलित केले होते. यामुळे त्याना तुमचे प्रेम कळेल, सदगुरु लिला कळेल आणि गुरुक्षेत्रमचे महत्त्वही.

अशा तीन गोष्टी एकाच वेळी जर कळल्या तर मग नकळत का होईना खऱ्या अर्थाने ही गुणसंकिर्तन सेवाही  होईल.

अंबज्ञ .........🙏

सौ. स्वातीवीरा कुडव
[03/04, 12:13 a.m.] स्वातीवीरा कुडव: *हरि ॐ*

🙏💐

*श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम भाग ........३*

या क्षेत्रात नवीन केलेल्या बदलात आता दीपस्तंभ नाही त्यामुळे आपण आता पुढील दर्शन घेउया.
उजव्या बाजुला सुंदर देव्हाऱ्यात दर्शनी श्रीमुलार्क गणेशाची मुर्ती आहे.

गणेशाच्या उजव्या बाजुस श्रीकिरातरुद्र व श्रीशिवगंगागौरी यांच्या मुर्तीची स्थापना केली आहे. वरच्या बाजुस श्रीचण्डिकाकुलाची प्रतिमा दर्शनासाठी आहे.

*श्रीमुलार्क गणेश*

 एका पवित्र ठिकाणी नदी काठी असलेल्या मांदार वृक्षाच्या मुळाशी   प्रकट झालेली  गणेशमूर्ती शास्त्रोक्त पद्धतीने ही  बाहेर काढून त्याची स्थापना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम मध्ये करण्यात आली. या गणेशाचे नित्य पूजन व अर्चन होते. दररोज ११ दुर्वांची  १ जुडी याप्रमाणे २१  जुड्यांचा हार व प्राप्त फुले गणेशास अर्पण केली जातात. तसेच सकाळ संध्याकाळ श्रीगणेशास नैवेद्यही अर्पण केला जातो. दर महिन्याच्या संकष्टीला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. या गणेशास नैवेद्य  म्हणुन आपणही लाह्या, हरभरे (चणे) व दाणे एकत्रित अर्पण करु शकतो. तसेच अष्टगंध व शेंदूरही एकत्रित रित्या अर्पण केला जातो.

या गणेश मुर्तीचे दर्शन घेताना खालील मंत्राचा जप करावा.
*ॐ गण गणपते l श्रीमुलार्क गणपते l वरवरद श्रीआधार गणेशाय नम: l सर्व विघ्नान नाशय l सर्वं सिद्धी कुरु कुरु स्वाहा l l*

श्रीगणपती हा आपल्या मूलाधार चक्राचे स्वामी म्हणून प्रार्थना करताना *हे गणराया तु माझ्या मुलाधार चक्राचा स्वामी आहेस. माझ्या या चक्राच्या चार पाकळ्या म्हणजे माझे आहार विहार आचार विचार. ह्या चार पाकळ्याच  माझे सर्वांगीण विकास घडवून आणतात. म्हणून यांचे तु रक्षण कर* असे म्हणून वरील जप करावा.

२. गणेशाच्या उजव्या बाजुस श्रीकिरातरुद्र यांची मुर्ती आहे. श्रीकिरातरुद्र आदिमातेचे द्वितीय पुत्र आहेत. श्रीकिरातरुद्र आपल्या मनरुपी जंगलात वास्तव्य करतात. या  मनरुपी जंगलात नको असलेल्या झाडाझुडुपाना म्हणजे वाईट विचारांना ते मुळासकट काढुन टाकतात. म्हणजे माझे मनरुपी जंगल हा देव स्वच्छ करतो. म्हणून श्रीकिरातरुद्रांचे दर्शन घेताना -

 *ॐ महावैश्वाराय विद्महे l राघवाय धीमही l तन्नो किरातरुद्र: प्रचोदयात l*  हा किरातरुद्र गायत्री जप करुन प्रार्थना करायची.

*हे राघवा माझे मन मी तुझ्या ठायी समर्पित करते. माझ्या मनात नको असलेल्या विचाररुपी झुडपाना तु मुळासकट उखडून काढ आणि चांगल्या रोपांची म्हणजे विचारांची जपणुक करुन माझ्या या मनरुपी जंगलाचे रुपांतर तु उपवनात कर*

*तसेच मनातले भय नाहिसे करणाऱ्या तसेच दुष्टप्रभावाना नाहिशा करणाऱ्या किरातरुद्रांबाबत उपनिषदामध्ये २१ व्या अध्यायात सविस्तर माहिती दिली  आहे.*

*३ श्रीशिवगंगागौरीदेवी*

गणेशाच्या डाव्या बाजुस असणारी शिवगंगागौरीदेवी. श्रीकिरातरुद्र व  श्रीशिवगंगागौरीदेवी हे दोघे पति पत्नी आहेत.

*ॐ त्र्यंबकाचे विद्महे l अरिष्ट स्तंभनकारिण्य च धीमहि l तन्नो शिवगंगागौरीदेवी प्रचोदयात् ll* हा शिवगंगागौरीदेवी गायत्री जप करीत दर्शन घ्यावे.

शिवगंगागौरीदेवी चे दर्शन मनाला एकप्रकारची प्रसन्नता देते. आपल्या बाळांकडे येणाऱ्या वाईट शक्तीचे  स्तंभन करणे व चांगल्या शक्तीचे वर्धन करणे अशी दोन विरूध्द टोकाची असलेली कार्ये शिवगंगागौरीदेवी एकाच वेळी करते. यावरून उपनिषादात वर्णिलेली *शिवगंगागौरीदेवी अष्टोत्तर शतनामावली* आपल्याला किती लाभदायक आहे याची कल्पना येते. हिला हरिद्रा प्रिय आहे. आयुर्वेदात याचे अनन्य महत्त्व सांगितले आहे. आपल्या शरिरातील रक्त शुद्धीकरणाचे काम हरिद्रा करते. त्याप्रमाणेच आपले प्रभामंडलाचे  शुद्धीकरण शिवगंगागौरीदेवीच्या नामस्मरणाने होते.

*मातृवात्सल्य उपनिषदामध्ये २० व्या अध्यायात शिवगंगागौरीदेवीबाबत अधिक माहिती दिली आहे.*

किरातरुद्र व  शिवगंगागौरीदेवी यांचेही नित्य पूजन व अर्चन होते तसेच सकाळ संध्याकाळ श्रीगणेशास नैवेद्य अर्पण केला जातो.

अंबज्ञ सौ. स्वातीवीरा कुडव.

🙏💐

No comments:

Post a Comment