*हरि ॐ श्रीराम अंबज्ञ*
💐 *चांदोरकर, हेमाडपंत, दीक्षित, माधवराव देशपांडे आणि म्हाळसापती यांना मिळाले तसे साई जर आता मिळाले तर मी माझ्या जीवनात काय काय करणार?*
💐वर नमूद केलेल्या सर्व साईभक्तांवर असलेल्या साईनाथांच्या असीम कृपेबरोबरच पुर्व पुण्याई आणि त्यांची या जन्माची भक्तीही सोबत होती म्हणूनच साई भेटले. पण मला तर ना पुर्व पुण्याईची जाण आणि याजन्मीच्या भक्तीचीही जाण. तरीही साईअनिरुद्ध भेटले ही केवळ त्यांची असीम कृपा. दर गुरुवारचे डॅडबरोबर असणे, त्यांच्याशी आणि चण्डिकाकुलाशी संवाद साधणे, त्यांच्याबरोबर गजरात ताल धरणे, उत्सवात त्यांच्या बरोबर जेवणे, भजनात आनंदाने डोलणे, सगळेच तर साईनाथांसारखे आहे. बापू म्हणाले होते मी साईंबरोबर असतो तर? असा प्रश्नच पडता कामा नये. तुम्ही बोला मी साईंबरोबर आहे. ही तर प्रचितीच आहे. एक ओवी आहे ग्रंथामध्ये .....
*साई सवे जे हसले बोलले l*
*जेवले कावले रागे भरले .........भाग्यागळे ते सगळे ll*
(ओवी नीट आठवत नाही ) म्हणून आपण सर्वच भाग्यवंतच आहोत.
💐 वरील भक्तांप्रमाणे मला आचरित नाही जमले तरी, त्यांचा आदर्श ठेवुन माझ्या जीवनाची वाटचाल करणे हे ध्येय मात्र निश्चितच राहील. चांदोरकरानी समोर येणाऱ्या प्रत्येकाला साईनाथ भेटावे म्हणून केवळ महिमाच गायला नाही, तर साईना भेटण्याचा प्रेमळ आग्रहही धरला. म्हणून हेमाडपंत साईंपर्यंत पोचले. हे मला विसरून चालणार नाही. मलाही माझा अहंभाव बाजुला सारुन माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येकाला असाच प्रेमळ आग्रह करायचा आहे आणि सदगुरू महिमा वर्णन करुन, सगुण साकाराची प्राप्ती जशी मला झाली, तशी सर्वाना होवो ही इच्छा धरायची आहे. जे प्रेम मला डॅड करुन मिळत, त्याचाच उचित वापर करुन, सर्वाकडे हा अनिरुद्ध महिमा गायचा आहे. त्याच् या गुणांचे वर्णन करताना, त्यांच्याकडून मिळालेले प्रेम मी इतरांवर कितीही लुटले, तरी मीही पुन्हा तशीच प्रेमाने भरुनच रहाणार आहे.
*कारण हा आहे*
*पुर्णमद: पुर्णमिदं.............पूर्ण मेवावशिषते l*
*आणि मला पुरविणे तर याचा धर्म आहे*
मग त्याच्या गुणांचे वर्णन करताना, मी हे प्रेम लुटताना, का मागे रहावे? कर्म करणे माझे काम यशदाता मंगलधाम. हा भेटला त्याच्याच अकारण कारुण्याने पण त्याचे हे कारुण्य मला टिकवता आले पाहिजे स्वत:च्या कर्मस्वातंत्र्याचा उचित वापर करून.
*आज्ञापालन सेवानियमन l नामसंकिर्तन अधिध्यासन l*
*हेचि जाणावे तपसाधन l*
*सुगम संपन्न सहजची l*
💐 आम्हाला साई भेटले अनेक अनुभुती दिल्या तरीही जरा जरी मनाविरुद्ध झाले की आमच्या तर्क कुतर्काचे येरझारे सुरु होतात. हेमाडपंतही शिरडीस येण्यापुर्वी म्हणायचे
*बुडवुनि आपुली स्वतंत्रता l*
*ओढवुनि घ्यावी का परतंत्रता l*
*जेथे नीज कार्य कर्तव्य दक्षता l*
*काय आवश्यकता गुरुचि ll*
💐 असे म्हणणारे हेमाडपंत ज्याक्षणी साईनाथांचे सत्य स्वरूप कळते त्याच क्षणी, लेखणी मस्तक चरणी ठेवतो म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत नतमस्तक राहिले. इतकेच नाही, तर साईच्या लिला आज असंख्य लोकांपर्यंत ग्रंथाच्या माध्यमातून पोचवल्या. हे तर मला शक्य नाही पण पंचशील परिक्षा देउन साईभक्तांचे चरीत्र जीवनी नक्कीच उतरवू शकते. मला साईअनिरुद्ध भेटले आहेत तर हे मला करायचे आहे.
💐 इथे २३व्या अध्यायांत शिष्य कसा असावा आणि त्याचे प्रकार किती याचे सुंदर विवेचन हेमाडपंत देतात आणि काकासाहेब दिक्षितांच्या आज्ञापालनाची कथाही आपल्याला त्याचा बोध देते. मला त्यांच्याप्रमाणेच आज्ञापालन हा माझा धर्म बनवायचा आहे. त्यासाठी मला सर्वांची लाज बाळगणे सोडता आली पाहीजे. थोडक्यात सात्त्विक निर्लज्ज व्हायचे आहे. सात्त्विक निर्लज्ज व्हायचे म्हणजे माझ्या सदगुरुंच्या सांगण्याप्रमाणे वागताना मला कसलीही आणि कोणचीही भीडभिती वाटता कामा नये. माझ्या सदगुरुंकडुन आलेली कोणतीही वस्तू धारण करताना मला अभिमानच वाटला पाहीजे.
💐 कधीही मांसाहार न करणारे काका, धर्माप्रमाणे वागणारे काका, ब्राह्मण धर्माचे पालन करणारे काका, नित्यनियमाने वाचन पठण करणारे काका, बाबांच्या आज्ञेसरसी बोकड कापायला निघतात. अगदी तसेच मलाही माझी प्रतिष्ठा, विद्वत्ता, पेशा. साधन, संपन्नता बाजुला सारुन कर्मस्वातंत्र्याचा सदुपयोग करुन जास्तीत जास्त आज्ञापालन करण्याचे प्रयास करायचे आहेत. सदगुरु मुखीचा शब्द झेलायचा आहे. त्यासाठी मला काका दीक्षित हा माझा आदर्श ठेवायचा आहे. माझ्यासारख्या विगताला कोणत्याही प्रयासाशिवाय आदीमातेने अर्ध्या वाटेवर आणलेच आहे, आता उत्तम शिष्य बनण्याचे प्रयास करायचे आहेत. कारण
*केल्याने होत आहे रे l आधी केलेचि पाहिजे.*
यशदाता मंगलधाम आहेच.
💐 हा मला भेटला तर आहेच पण मला ह्याचे लाडकेही व्हायचे आहे. लाड करुन घ्यायचे तर त्यासाठी मोठे होऊन चालणार नाही. मला लहानच होऊन राहायचे आहे. मुंगी होऊन साखर खायची आहे. हे लहान होणे म्हणजे मनाचा बालभाव. जो शामाकडे आहे. "नाथांची भक्ती असेना प्रबळ, आपली भक्ती नाही का प्रेमळ? " असे काका दीक्षिताना ठणकावुन सांगणारे शामा आपल्याला एक गुढ संदेश देत आहेत तुलना न करण्याचा. असा बालभाव मनात जागृत करुन मला खऱ्या अर्थाने मनाचा नम: करायचा आहे. मला तुलना करणे थांबवायचे आहे. शामा अनेक भक्तांना बाबांपर्यंत आणायचे. प्रत्येकाला बाबा वेगळा अनुग्रह द्यायचे पण माधवरावांच्या मनात असा कधीच विचार आला नाही की मी इतके भक्त आणतो पण बाबा माझ्यावर कधी अनुग्रह करत नाहीत. तर प्रत्येक भक्तावर केलेला अनुग्रह जर माझ्यासमोर आहे तर ती शिकवण मलाही आहे. म्हणजे प्रत्येकाच्या अनुग्रहावरुन शामा शिकत गेले. तसेच मलाही बापुंच्या प्रवचनातुन आणि बापुंचे इतरांना आलेल्या अनुभवातून शिकायचे आहे की मला काय करायला हवे. दुसऱ्याची प्रचिती मला माझी अनुभुती बनवता आली पाहिजे. फक्त एकाच तत्त्वावर जर हा माझ्यासाठी आलाय तर
*एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता बापू ऐसा l ........*
बाबांचे असे अनेक भक्तांच्या लीला ग्रंथात वर्णिल्या आहेत. सर्वांचे गुण घेणे शक्य नाही पण त्यातल्या एकाचा तरी गुण अंगिकारता आला पाहिजे.
*बापु मला भेटले तर ......? ही कल्पनाच सुखावह आहे. मग मला शुद्ध भावाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे.*
💐 म्हाळसापती हा साईंकडे जाण्यासाठी मार्ग आहे. साईंमध्येच असलेले साईंचे रुप वेगळे होऊन आलेले. तेलियाचि भिंत काढुन टाकणे म्हणजे काय हे म्हाळसापतींकडुन शिकावे. जिवाशिवाची भेट म्हणजे काय हे म्हाळसापतींकडे पाहुन कळते. देव भक्त एकात्मता काय हे म्हाळसापतींकडे पाहुन कळते. साईसच्चरितात उल्लेख जरी कमी असला तरी प्रत्येक शब्द साई असेल तर त्यावरची रेघ म्हणजे म्हाळसापती. अशा म्हाळसापतींचे आचरण किंवा आदर्श ठेवणे शक्य नाही पण साईनाथांकडे जाणाऱ्या या पाऊलवाटेवरुन चालण्यासाठी बाबांच्या बाकी भक्तांचा आदर्श मात्र मला नक्की ठेवयचा आहे.
💐 म्हणून या साईअनिरुद्धांचे सामीप्य आणि अनुसंधान कायम राखण्यासाठी मला या साईभक्तांच्या आचरणाचा अभ्यास करायला हवा. ज्या ज्या भक्तांचा उल्लेख झाला आहे ते साईनाथांच्या इच्छेनेच. म्हणुनच साईसच्चरितातील प्रत्येक भक्ताचे आचरित अभ्यासण्याजोगे असून जीवनात उतरवणे त्याहुनही प्रयासपुर्ण असावे असे मला वाटते.
💐 *बापु भेटले ते त्यांचे आपल्यावर असलेल्या प्रेमामुळे. पण मला माझे जीवन खऱ्या अर्थाने बापूमय करायचे आहे. म्हणूनच बनवायचे आहे ........*
*बापु माझा श्वास*
*बापू संकीर्तन माझा घास*
*पंचशील माझी प्यास*
*साईभक्तांच्या आचरण माझा ध्यास*
*आणि अखंड बापु चरणाची आस*
*आपण पाण्याशिवाय काही महिने राहु शकतो*
*घास म्हणजे अन्नाशिवाय काही दिवस राहू शकतो*
*पण श्वास ??????*
*त्याच्याशिवाय एक क्षणही राहु शकत नाही..........*
*ध्यास जीवनाला दिशा देते.*
*तर आस मला उचित कृतीचा मार्ग देते. कर्मस्वातंत्र्याचा उचित वापर तो हाच.*
*माझे डॅड माझा श्वास व्हावे हेच माझे ध्येय करायचे आहे.*
*ll सदगुरु श्रीअनिरुद्धार्पणमस्तू ll*
*अंबज्ञ सौं स्वातीवीरा कुडव*

No comments:
Post a Comment