Tuesday 28 March 2017

bhimaji patil , adhyay 13

l हरि ॐ ll श्रीराम ll अंबज्ञ ll
(Image from Daily Newspaper Pratyaksha 28.03.2017


" शामा हे चोर माझ्या अंगावर का आणुन घालतोस " असे बाबा  म्हणतात जेव्हा  भिमाजी पाटील याना झालेल्या आजारातुन बरे व्हावे म्हणुन बाबांकडे घेउन येतात.

उत्तर :- बाबा त्यांना चोर का म्हणतात?

चोरी म्हणजे काय?  जे माझे नाही ते कळत वा नकळत. मालकाच्या इच्छेविरुद्ध व परवानगी शिवाय घेणे / वापरणे. व्यावहारीक दृष्ट्या आपण अनेक चोऱ्या करत असतो परंतू आपल्याला काही शिक्षा भगवंताच्या इच्छेविरुद्ध वागल्याने मिळत असतात. म्हणजेच त्याने दिलेली प्रत्येक शक्ती त्याच्या इच्छेविरुद्ध, वापरणे किंवा त्याचा गैरवापर करणे ही सर्वात मोठी चोरी.

पण पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या भिमाजी पाटील घरचे सुसंपन्न परिस्थितीचे असुन आले गेलेल्या लोकांना अन्न खाउ घालीत. म्हणजे ते दयार्द्र व सेवाभावी होते. मग त्यांनी नेमकी चोरी कशाची केली?

प्रज्ञापराने आपल्याला शारिरिक व्याधी होत असतात. पाटलाना कफक्षय रोगासारखा दुर्धर रोग झाला होता.  डॉक्टर, वैद्य, हकीम, देवदेवस्की, कुलदेवता, ज्योतिष, सगळे उपाय करुन झाले.

शेवटी पाटलांनी जगण्याची आशा सोडली. हताश होऊन देवाला विनवु लागले. "  देवा  तु तरी कसा रे! सुखात असताना तुझी आठवण येउ देत नाहीस. मग तुच संकटे पाठवुन धावा करायला लावतो. तूच  *"नारायणा धाव"* अशी साद घालायला भाग पाडतो.

*" नारायणा धाव "* असा कळकळीचा धावा करताच भिमाजींच्या बुद्धीला स्फुरण चढते आणि त्याना नानासाहेब चांदोरकरांची आठवण येते. ते नानांना पत्र लिहितात.

यावरुन लक्षात येते की-

१) परमेश्वराने त्याच्या स्मृती या शक्तीचा वापर त्याच्या स्मरणासाठी न करता विस्मृती च्या आहारी जाणे *_ही पहीली चोरी_*

२) सर्व काही ठीक चालले आहे तेव्हा परमेश्वराची आठवण न होणे ही *_दुसरी चोरी_*

आपली प्रज्ञा म्हणजे त्रिगुणात्मिका प्रकृती.
समानपणे सत्त्व रज तम धारण करणारी प्रकृती. याचा अपराध म्हणजे प्रज्ञापराध. रोग उत्पन्न होतो म्हणजे यांचे संतुलन ढळलेले आहे.

सत्त्वगुण = कफ प्रवृती
रजोगुण = पित्त प्रवृती
तमोगुण  = वात प्रवृती

पाटलांना कफक्षय झाला आहे. म्हणजे सत्त्वगुणाचा ऱ्हास झालेला आहे जो परमेश्वराच्या विस्मृतीमुळे होतो.

३) माझ्यावर संकट आल्यावर सुद्धा त्याची आठवण न होता मी इतर ठिकाणी धावाधाव करणे ही *_तिसरी चोरी_*

इथे पाटलांनी डॉक्टर, वैद्य, हकीम, देवदेवस्की, कुलदेवता, ज्योतिष, सगळे उपाय आधी केले मग साईनाथ आठवले. इथे आपण माधवरावांच्या सर्प दंशाची कथा आठवायला हवी. म्हणजे तिसरी चोरी लगेच लक्षात येईल.
- अम्बज्ञ स्वातीवीरा कुडव

No comments:

Post a Comment