Friday, 5 February 2016

NANASAHEB CHANDORKAR - SOME IMPORTANT QUALITIES )

एक प्रश्न जो discussion साठी होता
"पंढरपूरला जायचं कथा "जेव्हा एक भक्त परमात्म्या कडे चालत जात असतो तेव्हा खरे पाहता परमात्मा त्या भक्ताकडे चालत येत असतो । त्याच्या जीवनाचा सूत्रधार केवळ "तो एक "
"कर्ता करविता तो एक " असतो .
बाबांच्याच इच्छेने नानाची पंढरपूरला बदली झाली आणि बाबांनी च त्यांना दर्शनासाठी खेचून देखील आणले .
जेव्हा भक्त "परवानगी देतो " तेव्हा परमात्मा भक्ताच्या जीवनात हस्तक्षेप करतो .
तिन्ही काळावर त्या "त्रिविक्रमाचीच" सत्ता असते . श्रद्धावान पिता बनून तो भक्ताच्या शुद्ध संकल्पांना पूर्ण करतो .
नाना येणार , त्यांना पुढे पंढरपूर( भार्गलोक ) मधे राहायचे आहे हा  बाबांचाच "दैवी plan" . नानांनी आयुष्यात उतरवला ।
नानांचे शिरडीला "बाबांना सांगण्यासाठी येणे " हा  'आत्मनिवेदन" श्रद्धेचा एक भाग आहे . माझ्या जीवनाच्या केंद्र बिन्दुस्थानी परमात्मा आहे असे जाणून जगणे म्हणजेच श्रद्धा असे सद्गुरु अनिरुद्ध बापू आम्हाला कित्येक वेळा सांगत असतात .
नानांप्रमाणे " प्रत्येक प्रसंगी आम्ही जर परमात्मा सद्गुरुला सोबत घेतले तर आमच्या देखील जीवनाचा सुत्रधार "तो" बनू शकतो .
"त्याला पिता म्हणून मान्य करताच त्याचे संपूर्ण कुटुंब ,चण्डिका कुल आमच्या पाठीशी उभे राहते ."

कारण तो "भक्तवत्सल राम भक्तांची भक्ती वाढविण्यासाठीच परत परत अवतरीत होतो .
गरज आहे आम्हाला "त्याला "हाक मारण्याची । श्री हरिगुरु गुण संकीर्तन करण्याची । ।

।। हरि ओम् श्री राम अम्बज्ञ ।।

डॉ निशिकांतसिंह विभुते

--

No comments:

Post a Comment