सद्गुरु साईं नाथ कित्येक वेळा आपल्या भक्तांवर रागवताना दिसतात आणि दुसऱ्याच क्षणी प्रेमाने सर्वांना जवळ घेऊन लाड करतानाही दिसतात । माऊलीचे अकारण कारुण्य आम्हाला कळण्यापलिकडचे असते । तो जे पाहतो ते आम्ही पाहू शकत नाही । आमचा क्रोध आमच्या स्वतःच्या स्वार्थामधुन उत्पन्न होतो । तर सद्गुरूंचा क्रोध आमच्या देहाच्या अभिमानाला जाळण्या साठी सिद्ध होतो । आम्ही मशिदीची फरशी बांधतो आहे असा विचार देखील अहंकाराला जन्म देऊ शकतो । सद्गुरु अहंकाराला जन्म घालणारे विचार रूपी खांब हलवुन उखडून टाकतात । बाबांच्या सटक्या मधे श्रद्धावानाला मर्यादेत ठेवणारी ताकद आहे । ह्याच सटक्याने छापी भिजाविण्या साठी जल जमींनी तुन काढले आणि प्रमाणा बाहेर जाऊ पाहणारा धुनितिल अग्नि मर्यादेत आणिला होता । फेटा हे अभिमान अहंकाराचे प्रतिक आहे आपल्या पूर्व अर्जित संस्कारानी बनलेला फेटा बाबा जाळतात आणि नविन रेशमी फेटा (भरजरी शेला=त्याची असीम कृपा ) स्वतःच्या हाताने घालतात । नवीन फेटा डोक्यावर येण्याआधी आपला जूना फेटा कायमचा नष्ट झाला पाहिजे । सम्पूर्ण समर्पण ।स्वतःचे सर्वस्व त्याच्या हाती सोपवणे आवश्यक आहे ।जेव्हा आम्ही शरण येतो तेव्हाच ते शक्य आहे । शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी ही सहज लीला साईनाथ आमच्या साठी खेळतात । आपण अंबज्ञ आहोत । we are ambadnya. Dr Nishikantsinh Vibhute
No comments:
Post a Comment