Friday, 3 May 2019

Pi Algorithm Shree Sai Saccharit Adhyay 14

Pi Algorithm
पाय अल्गोरिदम म्हणजे 


Circumference=π× Diameter

परीघ = π × व्यास

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू आम्हाला सांगतात :-

परीघ म्हणजे महाप्राण हनुमंत अर्थात स्वयंभगवान त्रिविक्रमाची कृपा ।

व्यास म्हणजे स्वयंभगवान त्रिविक्रम ।

वर्तुळाचे केंद्रबिंदू : आदिमाता महिषासुरमर्दिनी ।

π पाय म्हणजे परीघ आणि व्यास यांच्या मधील गुणोत्तर (Ratio) सतत जशास तसे ठेवणारे त्रिविक्रमाचे स्वरूप , त्याची लीला।


अक्षर म्हणजे कधीही न बदलणारा असा अंक , जो स्थिर (constant)आहे .


ब्रह्मान्डा भोवती वेढे वज्र पुच्छे करू शके ।
अर्थात महाप्राण हनुमंत हाच संपूर्ण अस्तित्वाचे परीघ व्यापून उरु शकतो ।

महाप्राण हनुमंत म्हणजे श्रद्धावानाच्या जीवनात कार्यरत असणारी जीवनाचा सातत्याने विकास करत राहणारी  स्वयंभगवान त्रिविक्रमाची कृपा । जी भक्ती मुळे आमच्या आयुष्यात सक्रिय होते ।


संपूर्ण विश्वाचे केंद्रस्थान हे आदिमाता चण्डिका हेच असते आणि या केंद्रबिंदू पासून परिघापर्यंत ( महाप्राण हनुमंत = जीवनीय शक्तीचा विकास पर्यंत ) कार्यरत असणारा व्यास असतो स्वतः स्वयंभगवान त्रिविक्रम ।

पाय ही ह्या त्रिविक्रमाचीच लीला आहे । त्याचेच एक स्वरूप आहे जे " कोणत्याही वर्तुळाचे परीघ आणि व्यास ह्यांमधील गुणोत्तर RATIO एकच ठेवते । अढळ constant ठेवते । ह्या पाय ची संख्या आहे 22/7 अर्थात 3.14 .

जरी वर्तुळ छोटे झाले , किंवा अतिविशाल झाले तरी हा पाय बदलत नाही ।

परीघ = π × व्यास

म्हणून

π = परीघ ÷ व्यास

22/7 = परीघ ÷ व्यास

व्यास वाढताच वर्तुळाचे परीघ देखील वाढते ।
पण दोन्ही वाढीमध्ये एक समानता असते । एक नियम असतो । तो नियम आहे पाय । जो बदलत नाही   । म्हणून परीघ आणि व्यास हे एका विशिष्ट प्रमाणातच वाढतात । म्हणून वर्तुळ हे वर्तुळ बनून राहतं ।

ब्राह्मन्ड असो वा अनु असो मूळ रचना वर्तुळ च आहे ।
रक्त वाहिनी चा आकार  असो की मातेपासून गर्भातील शिशू कडे होणारा रक्त प्रवाहाची दिशा असो । वर्तुळ हे असतेच ।

ह्या सर्व वर्तुळांना मर्यादेत ठेवण्याचे त्यांचा विकास व लय करण्याचे कार्य स्वतः स्वयंभगवान त्रिविक्रम करत असतात ।

श्री साई सच्चरित अध्याय 14 मध्ये । पाय ही संख्या येते । 3₹.14 आणे अर्थात 3.14 ही संख्या विविध घटनांना जोडते ।

रतनजी बाबांना भेटतात । तेव्हा बाबा 3.14 मिळाले सांगतात ।

रतनजी दासगणू यांना विचारतात अर्थ ।

दासगणू सद्गुरू प्रेरणेने आधीच्या दुसऱ्या एका संताना दिलेल्या छोटा खानाचा खर्च बेरीज करतात ।

बेरीज देखील 3.14 ।



मौली साहेब आणि सदगुरु साईनाथ रातनजी च्या रूपाने आमच्या विकासासाठी परिघावर उभे आहेत । आमच्यातील भक्ती भाव चैतन्य उदय करण्यासाठी = महाप्राण हनुमंतांचे कार्य करण्यासाठी ।

आणि त्यांची कृपा आमच्या जीवनाला वर्तुळात व्यापून उरत राहते ।

नित्य विविध रूपात अनुभव देऊन आम्हाला आदिमातेच्या चरणांशी (पाय) बांधून ठेवण्यासाठी कार्यरत असतात ।

जोपर्यंत आम्ही सदगुरुना आपले म्हणतो , आपले पिता मानतो तोपर्यंत । अन्यथा तो व्यक्ती नियमाच्या अटळ सिद्धांताच्या प्रांतात फेकला जातो । जसे बाबांचा शब्द न मानता शिर्डीचे वर्तुळ /सीमा उल्लंघून जाण्यासाठी निघाले ते फेकले गेले । (साउळ विहीर = वर्तुळ) .


हा पाय आपल्या जीवनात कार्यरत रहावा म्हणून फक्त आम्हाला एकच करायचे असते बाबांना बाबा (डॅड) म्हणून स्वीकारायचे असते आणि मोठ्या आईला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवायचे असते ।

कारण तो आपल्या बाळांना कधीच टाकत नाही ।

हरि ओम श्री राम अंबज्ञ ।
नाथसंविध ।।

डॉ निशिकांतसिंह विभुते ।

2 comments:

  1. Ambadnya for sharing this information. And making it simple with diagrams. Nathsamvidh

    ReplyDelete