Sunday, 29 May 2016

VIJAYANAND SANYASI STORY EXPLANATION ,Adhyay 31 (MARATHI)

तुटला जनक जननीचा लळा ।
"जनक जननी " हे आम्हाला भौतिक विश्वामध्ये घेऊन येतात ।
भौतिक विश्व म्हणजे जे विश्व आम्हाला दिसते ते विश्व । ह्या विश्वातच मन गुरफटत जाते । हे माझे ते माझे । असे म्हणत म्हणत जे माझे आहे ते माझ्या पासून कधीच दूर जाऊ नये हि भावना मनात घर करू लागते । आणि एक दिवस " मृत्यू" मानवाला "माझ्या सर्वापासून " दुर करते । कायमचे ।
सन्न्यास्याच्या कथेत त्याचे मातेवरील "ममत्व " हे गेलेले नाही । आणि अशा प्रकारे  घेतलेला सन्यास बाबांना बिलकुल आवडला नाही । असा सन्यास घेणे म्हणजे भगव्याला कलंक लावणे आहे असे बाबा स्पष्ट सांगतात ।

जेथे माता त्याची आठवण काढत आहे आणि बोलावत आहे , त्यालाही परत घरी जाण्याची ओढ आहे ,, मग सन्यास कसला ?

बाबा त्याला सांगतात कि पूर्व कर्मानेच तू येथे येऊन पोहचला आहेस ।

बाबा आपले वचन  पुर्ण करतात "शरण मज आला आणि वाया गेला , दाखवा दाखवा ऐसा कोणी "

"अपघाते जरी हे चरण पाही , त्यासही रक्षती संकटी "

जरी हा मद्रासी वाट चुकून बाबांजवळ आला असला तरी बाबा त्याला खरोखर सन्मार्गावर नेतात ।
शेवटचे क्षण आलेले असताना त्याला भागवाताचे पारायण करवून घेतले । निष्काम कर्मयोग शेवटच्या क्षणांमध्ये मनन चिंतन अणि निधीध्यासन  करून विजयानंदाचे उरले सुरले मोह देखील विरून गेले ।
"राम विजय " पावला म्हणजेच विजयानंदाचा शेवटी विजय झाला आणि तो रामाच्या नित्य सहवासात पोहंचला ।

वैराग्य शब्दाचा चुकीचा अर्थ लावून कित्येक जण आपल्या जबाबदाऱ्या झटकून दूर निघून जाताना दिसतात ।

म्हणूनच आम्हाला बापू मध्यम मार्ग देतात
निष्काम कर्मयोग , म्हणजे कार्य करत राहायचे आणि मनी परमात्म्याला स्मरत राहायचे ।

वैराग्य म्हणजे सर्व भावनांच्या पलीकडील भाव । सर्व आनंदांच्या पलीकडील अवीट आनंद । भक्ती रस । भक्ती मध्ये आपोआप ईतर षड्रिपू मोह ममतेपासून श्रद्धावान दूर जाऊ लागतो आणि नकळत वैराग्य अर्थात पवित्र भक्तिरसात रममाण होऊ लागतो ।

गुरुची शाळा म्हणजे गुरुचे आमच्यावरील असणारे निरंतर प्रेम । अकारण कारुण्य । आणि ह्या कारुण्याच्या वर्षावामुळे मानव भौतिक विश्वातील मोहापासून (जनक-जननीचा लळा ) पासून सुटत जातो ।

"पावलो अवलीळा मुक्तता " म्हणजेच काहीही विशेष न करता -- अगदी सहज आपोआप मुक्त झालो ।
मी काही केले नाही । त्याने केले ।

आणि असा रससागर परमात्मा अनिरुद्ध दोन्ही बाहू पसरून आम्हाला कवेत घेण्यास
उभाच आहे । आम्हाला फक्त होकार द्यायचा आहे ।

हरि ॐ श्री राम अम्बज्ञ ।
डॉ निशिकांतसिंह विभूते

No comments:

Post a Comment