उत्तर (शोभावीरा सातपुते )
श्रीसाईसच्चरीत यातील
अध्याय ८ यातील ओवी ११२
फकीरी अव्वल बादशाही l
फकीरी चिरंतन राही l
अमीरी क्षणभंगूर पाही l
सदा बाबा म्हणावे ll
अशीच १ ओवी
अध्याय ५,ओवी ६८,
शब्दात फरक आहे. अर्थ एकच.
गरीबी अव्वल बादशाही l
अमिरीसे लाख सवाई l
गरीबोंका अल्ला भाई l
अक्षयी साई वदत ll
हेमाडपंत एक श्रेष्ठ भक्त.
ते जेव्हा एखादे वाक्य/ओवी पुन्हा पुन्हा सांगतात तेव्हा त्याचा काही महत्वाचा अर्थ असतो. हा प्रयत्न करु या.
दोन्ही ओव्यां मिळून एकत्र अर्थ असा ...
खरी सर्वोत्तम सत्ता ही गरिबीतच लाभते, तसेच ती फकिरीतच लाभते.ऐश्वर्या पेक्षा लाख पटीने उत्तम असलेली ही गरिबीच चिरंतर टीकणारी आहे.
ऐश्वर्य तर क्षणभंगूर आहे. परमेश्वर सदैव अशा,गरिबांचा पाठीराखा असतो.
अध्याय ८, यात 'नरजन्माची सार्थकता' हेमाडपंतांनी सुंदर रितीने वर्णनकेले आहे.
ज्या भौतीक सुखांना आम्ही 'ऐश्वर्य व अमिरी' समझतो,
ती सर्व क्षणभंगूर आहेत.
मोहापासून , 'फकिरी' घेतलेल्या 'गरिबाला' परमात्मा कसा प्राप्त होतो हे दिलेले आहे .भौतीक मोहांपासून आपल्या भक्तांना परावृत्त करण्याच्या अनेक कथा या ग्रंथात आहेत.
दामूअण्णांना कापसाच्या व्यापारापासून कसे परावृत्त करुन त्यांना कसे वाचविले ती कथा आपण जाणतो.
स्वतः हेमाडपंतांना निवृत्ती नंतर
दुसरी नोकरी करण्याची इच्छा होते, पण मिळेल 'मेली' तयास नोकरी आसे सांगून अत्य अल्प काळ टिकणारी नोकरी बाबांनी त्यांना दिली. त्यानंतर हेमाडपंत साईचरणी कायमचे स्थिरावतात.
अशा अनेक कथांतून 'अमिरीसे लाख सवाई' असलेली फकिरि/गरिबी कशी दिली हे समजते,
माझ्या मानवी मर्यादा मानून,'त्या' अमर्यादाच्याच मर्यादेत राहण, कर्मस्वातंत्र्या पेक्षा त्याच्या 'पारतंत्र्यात' स्वतःला बंदीस्त करुन घेणं म्हणजेच खरी फकिरी !
'राम माझा राजा आहे.' हे स्विकारण म्हणजेच ती अव्वल बादशाही उपभोगण होय. 'त्या' एकाशिवाय अधिक काही नको असणे.....हीच खरी फकिरी/गरिबी, शारण्यभाव, लीनता,आज्ञांकीता.
रावणाचे ऐश्वर्य नाकारुन बिभीषणाची गरिबी स्विकारण म्हणजेच श्रीरामाच्या आणि हनुमंताच्या चिरंतर चिरायू प्रभावाचा स्विकार करणे. म्हाणजे त्या त्रिवीक्रमाचा स्विकार करणे.
ही 'गरिबी' जेवढी तिव्र,
तेवढाच मी संकुचित व
'मी' जेवढा संकुचित तेवढाच 'तो' प्रसरणशीला !
त्याचा प्रभाव प्रसरणशील !
आणि हाच त्रिवीक्रमाचा प्रसरणशील प्रभाव म्हणजेच चिरंतर अशी फकिरी/गरिबी,
हाच त्रिवीक्रमाचा प्रसरणशील, सतत वाढत जाणारा प्रभाव म्हणजेच "अव्वल बादशाही" !
हेच बा समजावून सांगितले आहे.
अव्वल बादशाहीचा चिरंतन लाभ व्हावा, यासाठी मला मोहवणार्या अमिरीकडे पाठ कशी फिरवावी , त्या फकिरीच्या फकिरीत कसे रमावे याचे उत्तर ग्रंथराजाच्या पहिल्या खंडात बापूंनी लिहीलेच आहे.
:- शोभावीरा सातपुते
.
हरि ॐ , श्रीराम , अंबज्ञ.
अप्रतिम अंबज्ञ nathsamvidh
ReplyDelete