Monday 22 July 2019

बापू सारे नाथसंविध् घडू दे - poem by डाॅ.नयनावीरा परदेशी

हरि ओम 
बापू सारे नाथसंविध् घडू दे... 

बापू पुन्हा एकवार
प्रत्यक्षात प्रत्यक्षपणे
तुझा हस्त माझ्या डोई येऊ दे
बापू सारे नाथसंविध् घडू दे 

बापू फक्त तुझ्यावरी
प्रेम माझे जडू दे
बापूनाम देहात भिनू दे
बापू सारे नाथसंविध् घडू दे 

बापू तुज पुन्हा पुन्हा 
पाहण्याचे व्यसन मज लागू दे
तुझ्या चरणांशी सदैव एकनिष्ठ राहू दे
बापू सारे नाथसंविध् घडू दे 

बापू तू मज कधीच टाकणार नाही 
माझे बोट कधीच सोडणार नाही 
हे भान सदासर्वदा राहू दे
बापू सारे नाथसंविध् घडू दे

बापू मज पामरा नित्य 
तुझ्या आज्ञेत राहू दे
तुज विसरण्याची चूक 
जीवनी कधी न होऊ दे
बापू सारे नाथसंविध् घडू दे 

बापू सारे नाथसंविध् घडू दे....
हे मागता कधी न वाचा अडखळू दे
माझिया मनाचे नमः होऊ दे
बापू सारे नाथसंविध् घडू दे...!!

•डाॅ.नयनावीरा परदेशी 
(नंदूरबार उपासना केंद्र)
श्रीराम!!अंबज्ञ!!नाथसंविध्!!

No comments:

Post a Comment