Wednesday 10 July 2019

पाय अल्गोरिदम आणि 21 वा अध्याय

पाय अल्गोरिदम आणि 21 वा अध्याय
पाय अल्गोरिदम म्हणजे नेमके काय हा प्रश्न आम्हा सगळ्यांना परत परत पडत राहतो .
जिस जिस पथ पर भक्त साई का वहा खडा है साई .
ह्या नंदामाता ने लिहिलेल्या आरती मधल्या ओळीचा अर्थ म्हणजे पाय अल्गोरिदम .

पाय म्हणजे एका वर्तुळाचे परिघ आणि त्याची त्रिज्या यांच्यामध्ये असणारे गुणोत्तर . गुणोत्तर म्हणजे एकाचे प्रमाण वाढले असता दुसऱ्याचे प्रमाण देखील वाढते .
तेव्हा वर्तुळाचे परिघ वाढतो त्यासोबतच वर्तुळाची त्रिज्या देखील वाढत जाते . आणि ह्या वर्तुळाच्या परी परिघ आणि त्रिज्या ह्यांमधील वाढण्याच्या गुणोत्तर आस पाय असे म्हणतात .
म्हणजे एवढ्या गतीने परी वाढतो तेवढ्याच गतीने त्रिज्या पण वाढत जाते आणि ही गती म्हणजे पाय . हे गती अर्थात पाय ह्याचे संख्या मात्र सतत कायम राहते .ते बदलत नाही .

ज्या मार्गावर सद्गुरु श्री साईनाथांचे भक्त राहतो त्या मार्गावरती त्या भक्तांसोबत सद्गुरु साईनाथ असतातच. त्यांचे रूप कधी आम्हाला समजते कधी समजत नाही. त्यांचे रूप कधी वेगळे असते.
श्री साई सच्चरित्र मधील 21व्या अध्यायामध्ये हे आपण पाहतो की विनायक हरेश्वर ठाकूर हे भक्त जेव्हा फक्त बीए पास असतात तेव्हा कामानिमित्त बेळगाव जवळील वडगाव येथे ते पोहोचले असता कानडी अप्पा यांबद्दल माहिती मिळताच ते दर्शनासाठी पोहोचले.
हा या भक्ताचा सद्गुरु तत्वाला शोध घेण्याचा भाव सदगुरू श्री साईनाथ तात्काळ ओळखतात आणि म्हणूनच कानडी आप्पा यांची भेट घडवून आणतात.

कानडी आप्पा हे ह्या वर्तुळातील एक बिंदू आहेत. असेच अनेक बिंदू मिळून वर्तुळ बनतो.

कानडी अप्पांनी विनायक ठाकूर यांना आपल्या हातातील निश्चळ दास यांनी लिहिलेला विचारसागर हा ग्रंथ दाखविला आणि तो नियमित अध्ययन करण्यास सांगितला .
पुढे चालून तुमची भेट कामानिमित्त उत्तर दिशेला बदली झाल्यानंतर एका महापुरूषा सोबत होईल हे देखील सांगितले .
पुढील तुमच्या आयुष्यासाठी योग्य ती सूचना आणि मार्गदर्शन ते महापुरुष देतील हेदेखील स्पष्टपणे सांगितले.

ह्याच वर्तुळातील पुढील बिंदू बद्दल स्पष्ट माहिती कानडी अप्पा येथे देत आहेत .


Pi algorithm and Shree Saisaccharit Adhyay 21
Pi Algorithm and Adhyay 21 Shri Saisaccharit

पुढील बिंदू आहेत सद्गुरु श्री साईनाथ स्वतः.

कानडी आप्पा यांच्या भेटीनंतर विनायक ठाकूर यांना जुन्नर येथे काम करत असताना रेड्यावर प्रवास करावा लागला .

या प्रवासाबद्दल कानडी आप्पा बोलले नाहीत पण त्याचा संदर्भ साईनाथ यथायोग्य पणे देतात ।

आणि हा संदर्भ म्हणजे च अनुग्रह आहे ।
बाबांनी दाखविलेली दिशा आहे ।
आध्यात्म म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नाही पण आपले आयुष्य परमात्म्याच्या सेवेत झिजवावे लागते । ते रेड्यावरून केलेल्या प्रवासापेक्षा कठीण आहे ।

येथे दोनही संतांचे त्रिकाल ज्ञान असणे आम्हाला स्पष्टपणे दिसून येते । तसेच त्या दोघांचे अभिन्नत्व देखील दिसते ।
दोघे फक्त सद्गुरू तत्वाचे विविध रूपे आहेत । मुळात ते दोघेही एकच आहेत ।

अशा प्रकारे एक वर्तुळ परमात्मा आपल्या भक्तांसाठी निर्माण करत असतो ।
त्याच्या केंद्रात असतो तो आणि त्याची आई आदिमाता जगदंबा । त्याची त्रिज्या असतो तोच । परिघावर उभा असतो तोच । आणि त्या दोन्हींचा समन्वय बनवून ठेवतो तो देखील तोच । तोच पाय अल्गोरिदम आहे ।

हेमाडपंत स्पष्टपणे सांगत आहेत -

यथाकाल - वर्तमान । जया जें जें आवडे स्थान । अवतार घेती कार्याकारण । परी ते अभिन्न परस्पर ॥१४॥
देशा - काल - वस्तु भिन्न । परी एकाची जी ऊणखूण । दुजा संत जाणे संपूर्ण । अंतरीं एकपण सकळिकां ॥१५॥
जैसीं सार्वभौम राजाचीं ठाणीं । वसविलीं असती ठिकठिकाणीं । तेथ तेथ अधिकारी नेमुनी । अबादानी संपादिती ॥१६॥
तैसाच हा स्वानंदसम्राटा । जागोजागीं होऊनि प्रकट । चालवी हा निजराज्यशकट । सूत्रे अप्रकट हालवी ॥१७॥
- श्री साईसच्चरीत अध्याय 21 वा

अर्थात हा सार्वभौम राजा अनिरुद्ध
ना ना विविध रूपे घेऊन आमच्यासाठी येत राहतो हे ओळखणे म्हणजे च पाय अल्गोरिदम ओळखणे ।

हरि ओम श्री राम अंबज्ञ 
नाथसंविध ।

No comments:

Post a Comment